NMMS परीक्षेला जाण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी पुढील सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.
विनाअनुदानित / केंद्रीय / जवाहर नवोदय / सैनिक शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थांनी नोंदणी केलेली असल्यास सदर नोंदणीच्या आधारे परीक्षेसाठी प्रवेश हा तात्पुरत्या स्वरूपात देण्यात येत आहे. सदर विद्यार्थी अपात्र असल्याने शिष्यवृत्तीसाठी विचार केला जाणार नाही.
NMMS परीक्षेसंदर्भात महत्त्वाच्या सूचना
- विद्यार्थ्याने परीक्षेच्या वेळी प्रवेशपत्र सोबत आणावे व निकाल घोषित होईपर्यंत जतन करून ठेवावे.
- विद्यार्थ्याने परीक्षा सुरु होण्यापूर्वी किमान तीस मिनिटे आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावे.
- प्रवेशपत्रावरील स्वाक्षरी विद्यार्थ्याने आपल्या मुख्याध्यापकांच्या उपस्थितीत करावी.
- सर्व लेखन साहित्य (पेन, पेन्सिल, कंपास इ.) व पिण्याच्या पाण्याची बाटली विद्यार्थ्याने सोबत आणावी.
- परीक्षा हॉलमध्ये मोबाईल, स्मार्ट वॉच, कॅल्क्युलेटर, लॉगटेबल, रेडी रेकनर इत्यादी साहित्य आणू नये.
- विद्यार्थ्यांना येण्याजाण्याकरीता प्रवास खर्च किंवा प्रवास भाडे दिले जाणार नाही.
- परीक्षेसाठी वजा गुण पद्धतीचा अवलंब केला जाणार नाही.
- परीक्षा हॉल सोडण्यापूर्वी आपली उत्तरपत्रिका संबंधित पर्यवेक्षकाकडे जमा करावी व कार्बनलेस प्रत निकाल घोषित होईपर्यंत स्वतःकडे ठेवावी.
- उत्तरपत्रिकेमध्ये प्रश्नाचे उत्तर नोंदविताना चार वर्तुळांपैकी एक योग्य पर्याय असलेले वर्तुळ काळ्या किंवा निळ्या बॉलपेनने रंगवणे आवश्यक आहे. शिसपेन्सिलने अथवा चुकीच्या पद्धतीने नोंदविलेल्या उत्तरांना गुण दिले जाणार नाहीत.
- उत्तरपत्रिका चुरगळू किंवा दुमडू नये.
- ४०% पेक्षा जास्त दृष्टीदोष असल्यास विद्यार्थ्याने त्याबाबतचे मूळ प्रमाणपत्र केंद्रसंचालकास सादर करावे. केंद्रसंचालकांची खात्री पटल्यानंतरच त्यास जादा वेळेची सवलत देण्यात येईल.
NMMS Exam Question paper
NMMS परीक्षेचा सराव करण्यासाठी प्रश्नपत्रिका डाऊनलोड करा.
NMMS Exam Model Question paper
NMMS परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच
0 Comments