Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

इयत्ता पहिली शाळा प्रवेशासाठी वय शैक्षणिक वर्ष 2023-24 | इयत्ता पहिली प्रवेश व अंगणवाडी (नर्सरी) मध्ये दाखल करावयाच्या बालकांच्या जन्मदिनांकाबाबत स्पष्टीकरण सन 2023-24

शैक्षणिक वर्ष 2023-2024 साठी इयत्ता पहिलीत दाखल करावयाच्या मुलांसाठी मानीव दिनांक म्हणून 31 डिसेंबर  ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. admission date for academic year 2023-2024 (standard -1st, nursery, L.K.G., U.K.G)


31 डिसेंबर 2023 रोजी 6 वर्ष पूर्ण असणारी बालके इयत्ता पहिलीत दाखल करण्यात येतील. 6 वर्ष पूर्ण असणाऱ्या अशा बालकांना सक्ती पात्र दाखल पात्र म्हणून समजण्यात येईल. RTE act  नुसार अशी बालके शाळेत दाखल करुन घ्यावीच लागतील. 

शाळापूर्व तयारी अभियान 2023-24 तयारी कशी करावी? मेळावा तयारीसाठी महत्त्वपूर्ण PDF पहा. - Click Here

शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये इयत्ता पहिलीत दाखल करावयाची तारीख 30 सप्टेंबर ही होती. या वर्षी 31 डिसेंबर ही तारीख निश्चित करण्यात आलेली असल्याने ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर या महात जन्मलेल्या बालकांच्या प्रवेशाबाबत अडचणी निर्माण होत आहेत. मानीव दिनांक बदलल्यामुळे या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणून शैक्षणिक वर्ष 2021-2022 साठी कमाल व किमान वयोमर्यादा निश्चित करण्यात आली होती. या वर्षी सन 2023-2024 साठी कमाल व किमान वयोमर्यादा पुढीलप्रमाणे असणे आवश्यक आहे



शैक्षणिक वर्ष 2023-2024 साठी दाखल जन्मदिनांक/वयो मर्यादा

प्रवेशाचा वर्ग वयोमर्यादा किमान वय कमाल वय
नर्सरी / प्ले ग्रुप 1 जुलै 2019 ते 31 डिसेंबर 2020 3 वर्षे 4व 5म 30दि
ज्युनिअर KG 1 जुलै 2018 ते 31 डिसेंबर 2019 4 वर्षे 5व 5म 30दि
सिनिअर KG 1 जुलै 2017 ते 31 डिसेंबर 2018 5 वर्षे 6व 5म 30दि
इयत्ता पहिली 1 जुलै 2016 ते 31 डिसेंबर 2017 6 वर्षे 7व 5म 30दि


शाळा प्रवेशासाठी जन्मदिनांक व वयाबाबतचे परिपत्रक 2023-24 डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा. 

शंका समाधान

शंका १) शैक्षणिक वर्ष 2023-2024 साठी इयत्ता पहिलीत कोणत्या मुलाला दाखल कराल? 

उत्तर - ज्या बालकाची जन्मतारीख 1 जुलै 2016 ते 31 डिसेंबर 2017 या दरम्यान आहे अशी बालके इयत्ता पहिलीत दाखल करावीत. 

शंका २) जुुुलै 2017 ते डिसेंबर 2018 मधील बालकांचा प्रवेश कसा करावा? 

उत्तर - ज्या बालकाची जन्मतारीख 01 जुलै 2017 ते 31 डिसेंबर 2018 मधील आहे अशा बालकांना सिनिअर के जी मध्ये दाखल करावे.

शंका 3) जुुुलै 2018 ते डिसेंबर 2019 मधील बालकांचा प्रवेश कसा करावा? 

उत्तर - ज्या बालकाची जन्मतारीख 01 जुलै 2018 ते 31 डिसेंबर 2019 मधील आहे अशा बालकांना ज्युनियर के जी मध्ये दाखल करावे.

शंका 4) जुुुलै 2019 ते डिसेंबर 2020 मधील बालकांचा प्रवेश कसा करावा? 

उत्तर - ज्या बालकाची जन्मतारीख 01 जुलै 2019 ते 31 डिसेंबर 2020 मधील आहे अशा बालकांना प्ले ग्रुप / नर्सरी मध्ये दाखल करावे.

परिपत्रक डाउनलोड करा. 

शाळा प्रवेशासाठी जन्मदिनांक व वयाबाबतचे परिपत्रक 2022-23 डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा. 

शाळा प्रवेशासाठी जन्मदिनांक व वयाबाबतचे परिपत्रक 2021-22 डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा. 

Post a Comment

1 Comments

close