जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेतील बदलीस पात्र शिक्षकांच्या व्याख्या पहा. कोणते शिक्षक बदलीस पात्र असतील❓
जिल्हांतर्गत बदली शासन निर्णय 18 जून 2024 चा शासन निर्णय पहा. - Click Here
आंतरजिल्हा बदली 23 मे 2023 चा शासन निर्णय पहा. Click Here
बदलीस पात्र शिक्षकांच्या व्याख्या सविस्तर पहा.
संवर्ग ४- बदलीस पात्र शिक्षक कोण ❓
बदलीपात्र शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांची सर्वसाधारण क्षेत्रात सलग १० वर्षे सेवा झाली आहे आणि विद्यमान शाळेत ५ वर्षे पूर्ण झाली आहेत असे शिक्षक. तथापी अवघड क्षेत्रातील शाळांमध्ये रिक्त असलेली पदे भरावयाची झाल्यास सर्वसाधारण क्षेत्रात १० वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांना विद्यमान शाळेतील ५ वर्षे सेवेची अट लागू राहणार नाही.
म्हणजेच अवघड / पेसा क्षेत्रातील सर्व जागा भरण्यासाठी सुगम क्षेत्रातील 10 वर्षे सेवेची ची अट 5 वर्षे पर्यंत येवू शकते. सदर बदलान्वये सुगम क्षेत्रातील (संवर्ग ४) मधील शिक्षकांवर अन्याय होवू शकतो. पण अवघड क्षेत्रातील विद्यार्थ्यांचा फायदा होवू शकतो. संपूर्ण माहिती साठी येथे टच करा.
12 ऑक्टोबर 2022 परिपत्रक - बदलीस पात्र शिक्षकांनी फॉर्म भरताना घ्यावयाची काळजी बाबत परिपत्रक - Click Here अ किंवा आ कोणता पर्याय फायदेशीर
संवर्ग ३ - बदली अधिकार प्राप्त शिक्षक कोण ❓
बदल्यांचे अधिकार प्राप्त शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांची अवघड क्षेत्रातील सेवा ३ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त झाली आहे असे शिक्षक.
विशेष संवर्ग शिक्षक भाग १
यामध्ये दिव्यांग शिक्षक, दुर्धर आजारी शिक्षक, विधवा शिक्षिका, कुमारिका शिक्षिका, परित्यक्त्या, घटस्फोटित महिला, ५३ वर्षे वरील शिक्षक, स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य.
विशेष संवर्ग शिक्षक भाग २
पती - पत्नी एकत्रीकरण
१) दोघेही जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक
२) एक जिल्हा परिषद दुसरा राज्य शासकीय कर्मचारी
३) एक जिल्हा परिषद दुसरा केंद्र शासकीय कर्मचारी
४) एक जिल्हा परिषद दुसरा स्वायत्त संस्थेत कर्मचारी
५) एक जिल्हा परिषद दुसरा केंद्र/राज्य सार्वजनिक उपक्रमात कर्मचारी
६) एक जिल्हा परिषद दुसरा अनुदानित संस्थेतील शिक्षक/कर्मचारी
0 Comments