राज्यातील 2021-22 मधील इ. 11वी प्रवेश प्रक्रिया कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयांकडून आपले स्तरावर सुरु करु नये. याबाबत शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी एका आदेशाद्वारे कळविले आहे.
राज्यातील सहा महानगर क्षेत्रांतील मुंबई एमएमआर, पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका तसेच नागपूर, नाशिक, औरंगाबाद व अमरावती महानगरपालिका क्षेत्र) इ. 11 वी चे प्रवेश केंद्रिय ऑनलाईन पद्धतीने करण्यात येतात आणि उर्वरित महाराष्ट्रातील इ. 11 वीं प्रवेश स्थानिक पातळीवरून केले जातात. दरवर्षी इ.11वी प्रवेश प्रक्रिया साधारणपणे राज्य मंडळ इ.10वी परीक्षेचा निकाला जाहीर झाल्यानंतर सुरु होते.
प्रश्नपेढी संच - दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या तयारीसाठी विषय निहाय व माध्यम निहाय प्रश्नपेढी संच डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा.
राज्यातील सन 2021-22 मधील इ.11 वी प्रवेश प्रक्रियेबाबत कोणतीही कार्यपद्धती अद्याप अंतिम करण्यात आलेली नाही. तथापि काही उच्च माध्यमिक विद्यालयांनी सन 2021-22 साठी इ.11 वी प्रवेश प्रक्रिया सुरु केली असलेचे व त्यासाठी गुगल फॉर्म सारख्या सामाजिक माध्यमांद्वारे अर्ज मागविणे सुरु केले असलेचे निदर्शनास आले आहे त्यामुळे विद्याथ्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो.
वाचा - महा करिअर पोर्टल - एका क्लिक वर अडीच लाख अभ्यासक्रमाची माहिती.
तरी, याद्वारे कळविण्यात येते की, राज्यातील 2021-22 मधील इ. 11वी प्रवेश प्रक्रियेसाठी सविस्तर दिशानिर्देश, शासन आदेश प्राप्त झाल्यानंतर कळविण्यात येतील. तत्पूर्वी कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयांकडून प्रवेश प्रक्रिया आपले स्तरावर सुरु करु नये व विद्यार्थी व पालकांची दिशाभूल होईल अशाप्रकारच्या सूचना दिल्या जाऊ नयेत, याची दक्षता घ्यावी. विद्यार्थी व पालकांना याबाबत अवगत करावे.
(द. गो. जगताप)
शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक)
11 वी ऑनलाईन प्रवेश घेण्यासाठी वेबसाइट - Click Here.
11वी प्रवेश, 11वी ऑनलाईन प्रवेश, 11th admission, 11th online admission,



0 Comments