सेतू अभ्यासक्रम ( Bridge course ) पूर्ण करणेबाबत विद्यार्थ्यांनी पुढील सूचनांचे वाचन करा.
Bridge Course PDF for Std 2 - Std 10
सेतू अभ्यासक्रम pdf (bridge course) इयत्तानिहाय डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा.
विद्यार्थी मित्रांनो, मागील शैक्षणिक वर्षात तुम्ही ऑनलाइन व इतर विविध मार्गाने तुमचं शिक्षण सुरू ठेवलंत. या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला काही दिवस मागील इयत्तेच्या पाठ्यक्रमाची उजळणी व्हावी आणि या वर्षीच्या इयत्तेच्या अभ्यासक्रमाची पूर्वतयारी हे उद्दिष्ट ठेवून तुमच्यासाठी हा सेतू अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे.
सेतू अभ्यासक्रम राबविणेबाबत शिक्षक व पालकांसाठी सूचना
1. सेतू अभ्यासक्रम एकूण 30 दिवसांचा असून त्यात पूर्व चाचणी व उत्तर चाचणी चा समावेश आहे.
2. मागील शैक्षणिक वर्षात तुम्ही नेमके काय शिकला हे समजण्यासाठी आणि पुढील इयत्तेचा पाठ्यक्रम समजून घेण्यासाठी हा सेतू अभ्यासक्रम तुम्हाला मदत करणार आहे.
3. हा सेतू अभ्यास दिवसनिहाय क्रमाने सोडवावा.
4. यात दिवसनिहाय तयार केलेल्या कृतिपत्रिकांचा समावेश आहे. तुम्ही दिलेल्या नियोजनाप्रमाणे कृतिपत्रिका स्वप्रयत्नाने सोडवाव्यात.
शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी सर्व विषयांच्या घटकनिहाय Online Test सोडविण्यासाठी येथे टच करा.
5. कृतिपत्रिका सोडवताना अडचण आल्यास शिक्षक किंवा पालकांची मदत घ्या.
6. प्रत्येक कृतिपत्रिकेत दिलेला पाठ्यांश अधिक चांगल्या रीतीने समजून घेण्यासाठी व्हिडीओ लिंक दिल्या आहेत, त्यांचा उपयोग करून संकल्पना समजून घ्या.
दिक्षा ॲप डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा.
7. दिलेल्या नियोजनानुसार येणाऱ्या चाचण्या सोडवा. चाचणी सोडवून झाल्यावर शिक्षकांकडून तपासून घ्या. शेवटी दिलेल्या उत्तरसूचीच्या मदतीने आपल्या उत्तरांची खात्री करा.
8. न समजलेला किंवा अवघड वाटणारा भाग समजून घेण्यासाठी शिक्षकांची किंवा पालकांची मदत घ्या.
हा सेतू अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा !
4 Comments
interested
ReplyDeletesir did you able to provide setu abhyaskram purv sthiti servekshan test in soft copy
ReplyDeleteक्षेत्रिय अधिकारी ठराविक विद्यार्थ्यांची परीक्षा घेणार आहेत. ते पर एका अधिकाऱ्यांना 40 विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करावयाचे आहे.
Deleteअधिक माहितीसाठी लिंक https://cutt.ly/tmkyeKa
This test is not for all student
Delete