Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

इयत्ता 11वी प्रवेश परीक्षा CET खरंच आवश्यक आहे ?

इयत्ता 11 वी प्रवेश परीक्षा CET ची खरंच आवश्यक आहे..? 



नुकताच महाराष्ट्र राज्यातील माध्यमिक शालान्त परीक्षेचा बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित असा निकाल जाहीर झाला... दहावीच्या मुलांचे मूल्यमापन करताना शिक्षकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला.  न भूतो न भविष्यती अशी परिस्थिती निर्माण झाल्यावर पालक, विद्यार्थी, प्रशासन  शासन आणि एकूण समाजातील सर्वच घटक वेठीस धरल्या गेले. शालान्त परीक्षेचा मागील काही वर्षांचा 90% आणि त्या पेक्षा जास्त  निकाल लक्षात घेता व या वर्षी कोरोना मुळे उद्भवलेल्या आणीबाणी प्रसंगामुळे आणि रीतसर परीक्षा न घेतल्याने मूल्यमापन पद्धतीत सर्व समावेशक अशी प्रक्रिया पार पाडण्यात शिक्षक, शासन यंत्रणा आणि मेहनत केली.  निकाल अपेक्षित होताच त्या प्रमाणे लागला. एरवी 90% पेक्षा अधिक मुले उत्तीर्ण होतातच फक्त या वेळी 99% पेक्षा अधिक  विद्यार्थी उत्तीर्ण झाले.  विद्यार्थी जर रीतसर परीक्षा उत्तीर्ण झाला असता तरी थोड्या फार फरकाने त्याला तेवढेच गुण पडले असते जेवढे आता पडले.  गेले संपूर्ण वर्षभर दहावीचा विद्यार्थी ऑनलाईन ऑफलाईन च्या गोधळामुळे प्रचंड तणावाखाली होता. 

11 वी प्रवेश परीक्षा CET साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वेबसाइट - Click Here. 

जे विध्यार्थी सक्षम आर्थिक स्थितीमुळे ऑनलाईन शिक्षण घेऊ शकले त्यांच्या वर  कदाचित कोरोनाचा दृश्य परिणाम झाला नाही पण अनेक मोलमजुरी, शेतकरी आणि कुटीर उद्योग करणारी पालक मंडळी आपल्या पाल्यास शाळेची तयारी असूनही  सक्षम शिक्षण देऊ शकली नाही.  परिणाम आपल्याला सर्वांना माहीतच आहे.  या निकालातील  सर्व शाळांना अभिप्रेत  मूल्यमापन प्रक्रिया पार पडताना अनेक कठीण प्रसंगांतुन जावे लागले आणि शेवटी ही प्रक्रिया सुखद  पार पडली.  प्रस्तुत मूल्यमापन करताना मागील परीक्षांचे मूल्यमापन आणि अंतर्गत परीक्षा गुण यांचा समावेश होता.  म्हणजे एका अर्थाने हे मूल्यमापन योग्य झाले असे समजण्यास हरकत नाही.  मग इयत्ता अकरावी साठी पुन्हा प्रवेश परीक्षा घेऊन काय साध्य होईल? बरे प्रवेश परीक्षा घेण्यासाठी तिसऱ्या लाटेच्या तोंडावरचा  मुहूर्त आलाय. 

11th CET Syllabus - 

11 वी प्रवेश परीक्षा CET साठीचा अभ्यासक्रम विषय व घटकनिहाय डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा. 

WHO,  मा. मोदीजी आणि संपूर्ण शासन यंत्रणा व प्रसार माध्यमे संभाव्य  तिसऱ्या लाटेबद्दल आवर्जून लिहीत आहेत आणि सावध करत आहेत.  या उपर ही तिसरी लाट लहान मुले आणि वृद्ध यांना जास्त धोका आहे असे सांगते.  मग ही प्रवेश परीक्षा अ शा काळात घेण्याचा अट्टाहास का?   बरं ती ऑनलाईन होत आहे म्हणजे दर्जेदार आणि प्रामाणिक  होणार आहे काय  या बद्दल सर्वांना ज्ञात आहेच.  एखाद्या ऑनलाईन परीक्षा घेणाऱ्या agency ला ही परीक्षा घेण्यास शासन सांगू शकते. किंवा महाविद्यालय स्तरावरून अथवा शाळेच्या स्तरावरून सुद्धा घेण्यास सांगू शकते.  एकूण किती विद्यार्थी परीक्षेस बसतील आणि कोरोनाचे सर्व नियमानुसार प्रक्रिया पार पडेल काय या बद्दल ना शासकीय स्तरावरून अथवा शिक्षण विभागाकडून अधिकृत कोणत्याही प्रकारची खात्री कोरोना प्रसारित होणार कि नाही या बद्दल दिली नाही.  ऑनलाईन असो कि ऑफलाईन, पुन्हा प्रवेश परीक्षा म्हणजे शालान्त परीक्षेतील मूल्यमापन खोटे आहे किंवा खरे नाही असे म्हणण्यास वाव आहे.  बरं फक्त विज्ञान, किंवा अभियांत्रिकी शाखेला प्रवेश परीक्षा.. आणि कला, वाणिज्य या विषयांवर काय निर्णय घ्यायला हवा या बद्दल कोणीच बोलत नाही.  आपण असा अर्थ घ्यायला हरकत नाही कि फक्त विज्ञान आणि अभियांत्रिकी विषयांना हुशार मुलाची आवश्यकता असते आणि कला, वाणिज्य शाखेत अशा प्रकारची प्रवेश परीक्षा नको असे कुठलाही तज्ज्ञ म्हणू शकत नाही. .. 

इयत्ता 11 वी प्रवेशासाठी CET परीक्षेचे स्वरुप पहा. 

म्हणून या निमित्त शासनास अशी विनंती आहे कि कोरोना तिसऱ्या लाटे च्या पार्श्वभूमी वर ही परीक्षा रद्द करावी. अशी प्रवेश परीक्षा वैज्ञानिक दृष्टीने आवश्यक आहे काय या बद्दल नक्की कोणीच अधिकृत दावा करू शकत नाही. 

पुन्हा अशी प्रवेश परीक्षा म्हणजे पालकांना आर्थिक भुर्दंड.. आणि महत्वाचे म्हणजे शालान्त परीक्षेत मिळालेले गुण निरर्थक.. एवढ्या सर्व गुंतागुंतीच्या आणि किचकट मूल्य मापन करून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी वर्गावर पुन्हा प्रवेश परीक्षा म्हणजे टांगती तलवार आहे.. 

करिता ही प्रवेश परीक्षा रद्द करून अकरावी प्रवेशासंदर्भात सध्या असलेली नियमावली तात्काळ लागू करावी. जिथे केंद्रीय पद्धतीने प्रवेश आहेत तिथे आणि स्थानिक पातळीवरील प्रवेश प्रक्रिया लवकरात पार पाडून हे शैक्षणिक वर्षे वेळेत चालू होईल.

Post a Comment

0 Comments

close