Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

11वी CET परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम, परीक्षा केंद्र, प्रवेशपत्र, परीक्षा शुल्क पहा... गेल्या वर्षी वगळलेल्या 25% घटकांवर प्रश्न विचारले जाणार नाहीत.

इयत्ता 11 वी च्या प्रवेशासाठीची सामाईक परीक्षा CET ही शनिवार दि. २१ ऑगस्ट, २०२१ रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठीचा विषय व घटकनिहाय अभ्यासक्रम मंडळामार्फत जाहीर केलेला आहे. 

सन २०२१-२२ च्या इयत्ता ११ वी प्रवेशासंदर्भात सामाईक प्रवेश परीक्षेचे आयोजन मंडळामार्फत शनिवार दि. २१ ऑगस्ट, २०२१ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी १.०० या कालावधीत करण्यात येणार आहे. सदर परीक्षा ही राज्य मंडळाशी संलग्न असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयातील सन २०२१ - २२ मधील इ. ११ वी प्रवेशासाठी घेण्यात येणार आहे. 

11 वी प्रवेश प्रक्रियेची संपूर्ण माहिती, नोंदणी व अर्ज करणे. सविस्तर माहिती पहा.

इ. 11 वी प्रवेशासाठी CET परीक्षेचे स्वरुप

१) सामाईक प्रवेश परीक्षेसाठी १०० गुणांची एकच प्रश्नपत्रिका/ पेपर असेल. 

२) परीक्षेचा कालावधी 2 तास राहील. 

२) या परीक्षेत इंग्रजी 25, गणित 25, विज्ञान 25 व समाजिक शास्त्र 25 असे एकूण 100 प्रश्न विचारले जातील.

३) परीक्षा ऑफलाईन घेण्यात येईल. 

४) प्रश्न पत्रिकेचे स्वरुप हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाचे (Multiple Choice Objective Type Questions) असेल. 

५) परीक्षा O.M.R. आधारीत असेल.


11वी प्रवेशासाठीच्या CET चा अभ्यासक्रम, शुल्क, परीक्षा केंद्र व प्रवेशपत्र बाबत

11th CET Syllabus - 

11वी CET परीक्षेस गेल्या वर्षी 25% कमी केलेल्या अभ्यासक्रमावर प्रश्न विचारले जाणार नाहीत. यामध्ये इंग्रजी, गणित, विज्ञान व समाजशास्त्र या चार विषयावर प्रत्येकी 25 प्रश्न विचारले जातील. 

11 वी प्रवेश परीक्षा CET साठीचा विषय व घटकनिहाय अभ्यासक्रम डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा. 


11 वी CET परीक्षा कशी होईल? परीक्षेचे स्वरुप / तसेच प्रवेश प्रक्रिया कशी होईल? संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या. 

11वी प्रवेश परीक्षेसाठी शुल्क

इ. ११ वी प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा सन २०२१ साठी प्रविष्ट होणाऱ्या राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना (सन २०२१ च्या नियमित परीक्षेला नोंदणी केलेल्या) परीक्षा शुल्क भरावे लागणार नाही. मात्र सन २०२१ पूर्वी राज्यमंडळातून इ.१० वीची परीक्षा उत्तीर्ण / प्रविष्ट झालेले विद्यार्थी, C.B.S.E. C.I.S.C.E., सर्व आंतरराष्ट्रीय मंडळे इत्यादी अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना सामाईक प्रवेश परीक्षेसाठी मंडळाने विहित केल्याप्रमाणे प्रत्येकी रु. १७८/- शुल्क उपलब्ध करुन दिलेल्या पर्यायाद्वारे ऑनलाईन भरणे आवश्यक राहील. त्यासाठी Debit/Credit card उपलब्ध करुन दिले जातील, त्यापैकी एका पर्यायाद्वारे शुल्क भरावे. / UPI/ Net Banking व तत्सम पर्याय


11वी प्रवेश परीक्षेसाठी परीक्षा केंद्र

१. सदर परीक्षेसाठी विद्यार्थ्याचे परीक्षा केंद्र निश्चित करताना त्याने आवेदनपत्रामध्ये नमूद केलेला जिल्हा व तालुका / शहरी भाग विचारात घेण्यात येईल.

२. विद्यार्थ्याने परीक्षा केंद्रासाठी निश्चित केलेल्या तालुक्यामधून सदर परीक्षेसाठी प्रविष्ट होणारी विद्यार्थी संख्या विचारात घेऊन त्या तालुक्यासाठी मंडळामार्फत परीक्षा केंद्र निश्चित करण्यात येतील. त्यापैकी एक केंद्र विद्यार्थ्याला देण्यात येईल.


11वी CET परीक्षेसाठी प्रवेशपत्र -

विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र मंडळामार्फत ऑनलाईन पध्दतीने उपलब्ध करुन दिले जाईल. सदर प्रवेशपत्र विद्यार्थ्यांने डाऊनलोड करुन त्याची प्रिंट काढून घ्यावी. प्रवेशपत्रावर दिलेल्या सर्व सूचना विचारात घेऊन विद्यार्थ्यांने परीक्षेस प्रविष्ट व्हावे. सदर प्रवेशपत्रावर विद्यार्थ्याची माहिती सदोष असल्यास अथवा फोटो नसल्यास यासंदर्भातील माहिती पुस्तिकेत दिलेल्या सूचना विचारात घेऊन कार्यवाही करावी.

Post a Comment

0 Comments

close