शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील श्री. उमेश खोसे व श्री. खुर्शीद शेख या दोन शिक्षकांना पुरस्कार जाहीर झाला आहे.
दिवसनिहाय सेतू अभ्यासक्रम PDF इ. 2री ते इ. 10वी (45 दिवस) 14 August updated
Bridge Course PDF for Std 2 - Std 10
Bridge Course सेमी इंग्रजी PDF डाउनलोड करा.
सेतू अभ्यासक्रम (bridge course) इयत्तानिहाय डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
सेतू चाचणी क्र. 1 ,2 &3 इयत्ता निहाय प्रश्नपत्रिका संच (मराठी+सेमी)
उस्मानाबाद जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जगदंबा नगर उमरगा येथील तंत्रस्नेही शिक्षक उमेश खोसे आणि गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असराल्ली तालुका सिरोंचा येथील खुर्शीद कुतुबुद्दीन शेख यांचा यामध्ये समावेश आहे. आज केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने या संदर्भातील आदेश जारी केले आहे. देशातील 44 शिक्षकांना हा पुरस्कार जाहीर झाला असून त्यामध्ये राज्यातील दोन शिक्षकांचा समावेश आहे.
शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केले अभिनंदन.
"देशभरातुन एकूण ४४ शिक्षकांना 'राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार' जाहीर झाला असून सर्वांचे अभिनंदन! त्यात २ महाराष्ट्राच्या सुपुत्रांचा समावेश आहे, ही बाब खरोखरंच अभिमानास्पद आहे.अशाच प्रतिभावान शिक्षकांमुळे महाराष्ट्राची नवी पिढी घडेल आणि राज्याचे, देशाचे नावलौकिक करेल, याची मला खात्री आहे.
राज्यातील जि.प.शाळांत अध्यापन करणारे उस्मानाबाद जिल्ह्यातील शिक्षक श्री. उमेश रघुनाथ खोसे (@umeshkhose) आणि गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षक श्री. शेख खुर्शीद कुतबुद्दीन यांना केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे घोषित 'राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार' जाहीर झाल्याबद्दल त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन!"
श्री. उमेश खोसे यांच्या कार्याविषयी
उमेश खोसे उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील कडदोरा गावातील जगदंबानगर शाळेत कार्यरत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शिकवण्याच्या, त्यांचा सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा सन्मान या पुरस्काराच्या रूपाने झाला आहे. १२ वर्षे तांडा शाळेत काम केले होते. त्या शाळेत मुलांची बोलीभाषा बंजारा असल्याने त्या मुलांसाठी पहिलीचे भाषा विषयाचे पाठ्यपुस्तक बंजारा बोलीमध्ये अनुवादित केले. त्या शाळेत सुरुवातीला ४० मुले होती. ती पटसंख्या १०४ पर्यंत वाढली. तर आताच्या शाळेत केवळ १४ पटसंख्या होती, ती आता ३० पर्यंत वाढली आहे. करोनाकाळात मुलांच्या घरी जाऊन ऑनलाइन ऑफलाइन पद्धतीने सुरू आहे. शाळेचे संकेतस्थळ तयार करून निकालही ऑनलाइन जाहीर केला. करोनाकाळात मनोरंजनात्मक खेळ, गणित, इंग्रजी या विषयी मार्गदर्शन केले.
श्री. खुर्शीद शेख यांच्या कार्याविषयी
गडचिरोली मुख्यालयापासून २४३ किलोमीटर वरील शिरोंचा तालुक्यातील दुर्गम भागातील शाळेत कार्यरत. तेलंगणा आणि छत्तीसगढ़ सीमेवरील हा भाग आहे. गावात तेलुगू भाषिक आणि आदिवासी विद्यार्थी आहेत. गेली १५ वर्षे या शाळेत शिक्षक कार्यरत आहेत. शाळेत आलो तेव्हा ४५ विद्यार्थी होते, आता २०८ विद्यार्थी आहेत. आनंददायी शिक्षणासाठी शाळेचे सुशोभीकरण केले, जॉयफुल लर्निंग इन चाइल्डहूड म्हणजे जॉलिवूड हा उपक्रम राबवला. मुलांची भाषा सुधारण्यासाठी लघुपट तयार केले. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रयत्न केले. आता शाळेत तीन हजार पुस्तकांचे ग्रंथालय आहे. या कामी शिक्षण विभागाचे अधिकारी, असरअली गाव आणि कृतिशील शिक्षक महाराष्ट्र या गटाचे खूप सहकार्य लाभले. राष्ट्रीय पुरस्कारामुळे अधिक चांगले काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले आहे.
0 Comments