Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

MPSC joint Pre - Exam महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२०

MPSC Joint Pre-Exam महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२० ही परीक्षा शनिवार दि. 4 सप्टेंबर 2021 रोजी घेण्यात येईल. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२० ही परीक्षा रविवार दिनांक ११ एप्रिल, २०२१ रोजी नियोजित करण्यात आली होती. परंतू शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक ९ एप्रिल, २०२१ रोजीच्या पत्रान्वये प्राप्त सूचनानुसार सदर परीक्षा आयोगाच्या संदर्भिय प्रसिध्दीपत्रकाद्वारे पुढे ढकलण्यात आली होती. आता ही परीक्षा शनिवार दि. 4 सप्टेंबर 2021 रोजी घेण्यात येईल. 

यासंदर्भात शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, मदत व पुनर्वसन, महसूल व वन विभाग यांच्या दिनांक ३ ऑगस्ट, २०२१ रोजीच्या पत्रान्वये प्राप्त अभिप्रायानुसार सदर परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. 

ऑटो चालकाचा मुलगा ते वयाच्या 21 व्या वर्षी IAS 

अन्सार शेख IAS कसा झाला? त्याच्याच शब्दात पहा. संपूर्ण प्रवास  पाहण्यासाठी येथे टच करा.

कॉव्हिड विषाणूच्या प्रादुर्भावाच्या स्थितीच्या संदर्भात शासनाकडून वेळोवेळी राबविण्यात येणा-या उपाययोजना लक्षात घेऊन परीक्षेच्या आयोजनाच्या अनुषंगाने आयोगाकडून वेळोवेळी आढावा घेण्यात येईल. तसेच याबाबतची माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. याकरीता आयोगाच्या संकेतस्थळाचे नियमित अवलोकन करणे उमेदवारांच्या हिताचे राहील. असेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे टच करा. 

NEET, JEE, JEE Adv, MPSC, UPSC, यासारख्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास अखेरच्या दिवसांत कसा कराल?  Useful Tips - Click Here

https://www.shaleyshikshan.in/2021/08/mpsc-joint-pre-exam.html

Post a Comment

0 Comments

close