Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

संचमान्यता 2022-23 होणार आधार नोंदणी झालेल्या विद्यार्थी संख्येवर... आधार नोंदणी व सरल नोंदणी तफावत असलेली विद्यार्थी संख्या अपडेट करा.

संचमान्यता 2022-23 ही आधार नोंदणी झालेल्या विद्यार्थी संख्येवर होणार आहे. याबाबतचे परिपत्रक शिक्षण संचालक यांनी काढले आहे. 

संचमान्यता माहिती कशी भरावी? Video पहा. 

Sanch Manyata 2021-22 - Click Here


आधार नोंदणी व सरल नोंदणी मधील विद्यार्थी संख्या तफावत पाहण्यासाठी खालील लिंक ला टच करा. 👇

Student Portal login Click Here

संच मान्यता 2022-23 ही आधार अपडेट केलेल्या विद्यार्थी संख्येवर होणार आहे. सर्व विद्यार्थ्यांची आधारसह नोंद न झाल्यास आपल्या शाळेतील काही शिक्षक अतिरिक्त होण्याचीही शक्यता आहे. तरीसुध्दा अजून आपल्यामार्फत १००% मुलांची अचूक आधार नोंदणी करण्यात आली नाही असे लक्षात आले आहे.

सरल प्रणालीमध्ये नोंदणी करण्यात आलेल्या आणि प्रत्यक्ष आधार नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठी तफावत असल्याचे दिलेल्या आकडेवारीवरुन दिसून येते. या बाबतचा तपशील  student portal login  वर उपलब्ध करुन दिलेला आहे. 


1. ज्या विद्यार्थ्यांची आधार नोंदणी सरल प्रणालीमध्ये केली आहे, मात्र आधार व सरल प्रणालीतील नोंदींमध्ये (entries ) तफावत आहे, ( उदा: नावात, जन्म तारिख, लिंग ) त्याची त्वरीत तपासणी करुन १००% चुका दुरुस्त करुन घेण्यात याव्यात.

2. तसेच ज्या विद्यार्थ्यांची आधार नोंदणी सरल प्रणालीत अजूनही केलेली नाही त्यांची आधार क्रमांकाची नोंद सरल प्रणालीत त्वरीत अद्ययावत करावी. आपल्याला ही शेवटची संधी म्हणून नोटिस देण्यात येत आहे. यापुढे ज्या विद्यार्थ्यांची आधार नोंदणी नाही, किंवा चुकीची नोंद आहे, दुबार नोंद आहे, किंवा अवैध आधार आहे, अशांना पटसंख्येत ग्राहय धरले जाणार नाही याची नोंद घ्यावी.आपल्या स्तरावरुन अचूक नोंदी करुन अवैध विद्यार्थी संख्या पटावरुन कमी करावी.

आधार नोंदणी व सरल नोंदणी मधील विद्यार्थी संख्या तफावत पाहण्यासाठी खालील लिंक ला टच करा. 👇

Student Portal login Click Here

https://student.maharashtra.gov.in/stud_db/users/login



संचमान्यता 2022-23 ही आधार नोंदणी झालेल्या विद्यार्थी संख्येवर होणार असल्याने student portal वर 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत विद्यार्थ्यांचे आधार अपडेट करण्यास सांगण्यात आले होते. 


संच मान्यता 2022-23 बाबत शासन परिपत्रक डाउनलोड करा. 

संचमान्यता 2022-23 ही केवळ आधार नोंदणी झालेल्या (Biometric असो किंवा नसो) विद्यार्थ्यांच्या पटसंख्येवर आधारित करण्यात येणार आहे. त्यामुळे जर विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक नोंदणीकृत करणे अपूर्ण राहिले तर कमी दिसणाऱ्या पटसंख्येमुळे शिक्षकांची पदे संचमान्यतेत कमी उपलब्ध होतील. त्यामुळे आपल्याकडील सर्व विद्यार्थ्यांचे आधार काढून ते 30 नोव्हेंबर पर्यंत Student Portal वर भरणे आवश्यक आहे.

Student Portal login Click Here

https://student.maharashtra.gov.in/stud_db/users/login


Join WhatsApp group

https://chat.whatsapp.com/Dc3ZZLSljoUHTuH9rZml1F



Post a Comment

0 Comments

close