माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांमधील प्रतिभा ओळखून त्यांच्या मधील कलागुणांना वाव देण्यासाठी शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, नवी दिल्ली यांच्यामार्फत सन २०१५-१६ पासून कला उत्सवाचे दरवर्षी आयोजन करण्यात येत आहे.
कला उत्सव 2024 स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांसाठी सूचना:
• एक विद्यार्थी केवळ एका कला प्रकारातच सहभाग घेऊ शकतो.
• सहभागी स्पर्धकांनी सोबत जोडलेल्या निकषांचे वाचन करावे.
• कोणत्याही कला प्रकारच्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तयारी केलेली असावी. व्यावसायिक कलाकारांचा सहभाग अथवा त्यांची मदत घेता येणार नाही, असे निदर्शनास आल्यास सदरील प्रवेशिका रद्द केली जाईल.
• निकषात नमूद केल्यानुसार ४ ते ६ मिनिटांचा व्हिडीओ मोबाईल अथवा कॅमेराद्वारे तयार करावा.
• व्हिडिओमधील चित्र व आवाजात स्पष्टता असावी तयार केलेला व्हिडीओ व सोबत कला सादर करतानाचे ५ फोटो विद्यार्थ्यांने स्वत:च्या/पालक/शिक्षकाच्या फेसबुक, इंस्टाग्राम ट्वीटर किंवा यु टूब अकाऊंट वरून #kalautsavmah2024 या हॅशटॅगचा वापर करावा.
• व्हिडीओ पोस्ट करताना विद्यार्थ्याने आपले नाव, इयत्ता, शाळेचा पत्ता, शाळेचा Udise क्रमांक, तालुका, जिल्हा, मेल आय. डी. संपर्क क्र. भाग घेत असलेला कला प्रकार इ. उल्लेख करावा.
• पोस्ट Public असावी. ई- मेल पत्ता स्वतःचा नसेल तर पालक / शिक्षक यांचा ई मेल वापरावा.
• फेसबुक, इंस्टाग्राम, डीटर किंवा यु-टूब अकाऊंट वरून व्हिडीओ पोस्ट करताना प्राप्त झालेली कोणतीही एक लिंक copy करून ठेवावी.
KalaUstav 2024-25 Registration - Click Here
कला उत्सव 2024-25 नोंदणी - Click Here
• तदनंतर विद्यार्थ्यांने आपली नोंदणी https://scertmaha.ac.in/kalautsav या लिंक वर जाऊन करावी.
• नोंदणी मधील सर्व माहिती विद्यार्थ्यांने बिनचूक व पूर्ण भरावी.
• ही नोंदणी करताना फेसबुक, इंस्टाग्राम, ट्वीटर किंवा युटूब अकाऊंटवर व्हिडिओ पोस्ट करताना यापैकी प्राप्त झालेली कोणतीही एकच link नमूद केलेल्या ठिकाणी Paste करावी..
• एका स्पर्धेसाठी एका विद्यार्थ्यांची एकच पोस्ट असावी.
• आपल्या सादरीकरणाची पूर्ण जबाबदारी स्पर्धकाची असेल.
• एका वेळी एका पोस्टमध्ये एकाच विद्यार्थ्यांचे / पाल्याचे एकाच स्पर्धेचे साहित्य अपलोड करावे. एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे साहित्य अपलोड केल्यास/पोस्ट केल्यास सदर प्रवेशिका ग्राह्य धरली जाणार नाही.
• विद्यार्थ्यांच्या / पाल्याच्या व्हिडीओ सादरीकरणामध्ये कोणताही चुकीचा आशय/आक्षेपार्ह विधान केले जाणार नाही याची दक्षता घ्यावी.
#kalautsavmah2024 हा हॅशटॅग लिहिताना अक्षरात कोठेही स्पेस देऊ नये, हॅशटॅगचे स्पेलिंग चुकवू नये.
कला उत्सव 2024 संपूर्ण माहिती व सहभागी होण्यासाठी सर्वसाधारण सूचना जाणून घ्या.
0 Comments