Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शासकीय रेखाकला परीक्षा | एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड 2021-22 | Elementary and Intermediate Drawing Grade exam time table

शासकीय रेखाकला परीक्षा | एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड 2021-22 ऑफलाईन स्वरुपात घेतली जाणार आहे. 

Elementary and Intermediate Drawing Grade exam organizing by offline

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे एलिमेंटरी, इंटरमिजिएट या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेणे धोकादायक ठरणार आहे. त्यामुळे शासकीय रेखाकला परीक्षा २०२2 संपूर्णत: ऑनलाईन पध्दतीने आयोजित करण्यात येणार होती. 

शासकीय इंटरमिजिएट परीक्षा आता एप्रिल महिन्यात म्हणजेच एसएससी बोर्डाची परीक्षा संपल्यानंतर लगेचच ऑफलाईन पद्धतीने घेण्याचे व या परीक्षेसाठी घेण्यात येणारे वाढीव शुल्कही परत करण्याचे आदेश आज उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी उच्च व तंत्रशिक्षण विभागाला दिले.

दि. १८जानेवारी २०२२च्या पत्रानुसार सदर परीक्षा दि. १२ व १३ फेब्रुवारी २०२२ या दिवशी करण्याचे निश्चित करण्यात आले होते. परंतु तांत्रिक अडचणींमुळे ही परीक्षा दि. २२ व दि. २३ फेब्रुवारी २०२२ रोजी होण्याचे कळविण्यात आले होते. परंतु संपूर्ण परीक्षा नेमकी कोणत्या स्वरुपाची होईल याची अद्याप कोणतीही माहिती संकेतस्थळावर उपलब्ध नव्हती, त्यामुळे विद्यार्थी, पालक, शिक्षकांमध्ये गोंधळाचे वातावरण होते. ऑनलाईन परीक्षेमुळे  महाराष्ट्रातील गरीब व विशेषतः ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान होणार होते.  एलिमेंटरी व इंटरमिजिएट या दोन्ही ड्राईंग ग्रेड परीक्षा २०२१-२२ या ऑफलाईन घेण्यात येणार  आहेत. सदर परीक्षा एप्रिल महिन्यात दहावी बोर्ड परीक्षा संपल्यानंतर होईल. 

Elementary Drawing Grade exam 2021-22 ( for class 9th) 

शनिवार 9 एप्रिल 2022
वस्तुचित्र (Object Drawing) 10.30 ते 1.00
स्मरणचित्र (Memory Drawing ) 02.00 ते 04.00

रविवार 10 एप्रिल 2022
संकल्पचित्र (Design) 10.30 ते 01.00
कर्तव्य भूमिती व अक्षरलेखन (Geometry & Lettering)  02.00 ते 04.00


Intermediate Drawing Grade exam 2021-22 (For class 10th) 

सोमवार 11 एप्रिल 2022
स्थिरचित्र (Still Life) 10.00 ते 01.30
स्मरणचित्र (Memory Drawing ) 2.00 ते 4.30

मंगळवार, 12 एप्रिल 2022
संकल्पचित्र (Design) 10.30 ते 01.30
भूमिती, घनभूमिती व अक्षरलेखन (Geometry & Lettering) 02.30 ते 04.30यापूर्वीचे नियोजन असे होते. 

शैक्षणिक वर्ष 2021-22 माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत इयत्ता 10 दहावीत प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता फक्त इंटरमिजिएट ड्राइंग ग्रेड परीक्षा ऑनलाईन पध्दतीने दिनांक 22 व 23 फेब्रुवारी 2022 रोजी आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच कला संचनालयाच्या अधिपत्याखालील सर्व शासकीय- अशासकीय कला महाविद्यालयातील वर्षे 2021-2022 मध्ये मुलभूत अभ्यासक्रम (फाउंडेशन कोर्स) तसेच कला शिक्षक प्रशिक्षण प्रथम वर्ष अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रविष्ट होता येईल.

तसेच एलिमेंटरी ड्राईंग ग्रेड परिक्षेबाबत स्वतंत्ररित्या कला संचनालयाच्या संकेतस्थळावर प्रकाशित केले जाईल. 

कला संचनालय संकेतस्थळ

इंन्टरमिजिएट ड्राईंग ग्रेड परीक्षा 2021-22 करिता विद्यार्थ्यांची नाव नोंदणी करण्यासाठी लिंक


कालावधी - दिनांक 12 फेब्रुवारी 2022 ते 20 फेब्रुवारी 2022 पर्यंत अर्ज करता येईल. 


मुल्यमापन करण्याकरिता कार्यरत कलाशिक्षकांना परीक्षक, समालोचक, उपमुख्य समालोचक, याकरिता मुख्यध्यापकांच्या शिफारशीसह अर्ज ऑनलाईन पध्दतीने दिनांक 14 फेब्रुवारी 2022 ते 23 फेब्रुवारी 2022 पर्यंत भरता येईल.

परीक्षक / समालोचक अर्ज लिंक

Elementary and Intermediate Drawing Grade exam

Post a Comment

0 Comments

close