Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

संप्रीति यादव ला ५० कंपन्यांच्या रिजेक्शननंतर थेट Google कडून नोकरीची ऑफर. 1 कोटी 10 लाख रुपये वार्षिक पॅकेज

बिहारमधील संप्रीति यादव या तरुणीने ५० कंपन्यांच्या मुलाखतींमध्ये रिजेक्ट झाल्यानंतरही जिद्द न सोडता गुगलची मुलाखत क्रॅक करत नोकरी मिळवली आहे. 


दृढ निश्चय आणि आत्मविश्वासाच्या जोरावर एखादी व्यक्ती कोणतेही अशक्य वाटणारे लक्ष्य शक्य करु शकते. हीच गोष्ट बिहारमधील एका तरुणीने सत्यात उतरवली आहे. स्वप्न सगळेच पाहतात, पण ती सत्यात उतरवण्याची जिद्द फार थोड्या लोकांमध्ये असते. त्यातीलच एक संप्रीति यादव. तब्बल 50 कंपन्यांनी रिजेक्ट केल्यानंतर गुगलने 1 कोटीचे वार्षिक पॅकेज देत नोकरी ऑफर केली आहे. 

पद्मश्री हरेकला हजब्बा - फळे विकून शाळा बांधणाऱ्या हरकेला हजब्बा पद्मश्री पुरस्काराने सन्मानित

संप्रीति यादव ही एक सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. नोकरी मिळवण्यासाठी ती जवळपास 50 वेगवेगळ्या ठिकाणी मुलाखतींना सामोरी गेली होती. मुलाखती दरम्यान मला नर्व्हस वाटायचं. चांगले काम करण्यासाठी माझे आई-वडील आणि जवळच्या मित्रांनी मला नेहमी प्रोत्साहन दिलं. मोठ्या-मोठ्या कंपन्याबद्दल माहिती गोळा करण्यासाठी अनेक तास घालवले. मोठ्या कंपन्यामध्ये मुलाखती या सहसा चर्चा स्वरूपात असतात. सतत अभ्यास करून आणि पूर्ण आत्मविश्वासाने मुलाखत दिल्यास त्यात यश मिळते, असे तिने सांगितले.


संप्रीति यादवने पाटणा येथील नॉट्रे डेम अकादमीमधून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. तर मे 2021 मध्ये संप्रीती दिल्ली टेक्नोलॉजिकल यूनिव्हर्सिटीमधून कंप्युटर सायन्समध्ये बी टेकचे शिक्षण घेऊन उत्तीर्ण झाली. संप्रीतीचे वडील रामशंकर यादव हे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये कार्यरत आहेत. तर आई शशी प्रभा या बिहार सरकारच्या नियोजन आणि विकास विभागात सहाय्यक संचालक पदावर आहेत.




2021 मध्ये शिक्षण पूर्ण झाल्यानंतर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एखाद्या मोठ्या कंपनीमध्येच आपल्याला नोकरी करायची असल्याचे तिने ठरवले होते. तिने यासाठी तब्बल ५० मुलाखती दिल्या होत्या. यामध्ये तिने गुगलमध्येही मुलाखत दिली होती. एकूण नऊ फेऱ्या गुगलच्या मुलाखतीच्या झाल्या. या फेऱ्यांमध्ये वेगवेगळ्या टप्प्यांवर आणि वेगवेगळ्या विषयांवर उमेदवारांच्या आकलन शक्तीची चाचणी घेण्यात आली. या मुलाखतीमध्ये संप्रीतिने चांगली कामगिरी करत सर्व फेऱ्या यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर गुगलने तिला वर्षाला १ कोटी १० लाख रुपयांची ऑफर दिली. म्हणजेच महिन्याला जवळजवळ ९ लाखांच्या आसपास पगार दिला ऑफर करण्यात आला. संप्रीतिने ही गुगलची ऑफर स्वीकारली आहे. विशेष म्हणजे संप्रीतिला गुगलच्या आधी मायक्रोसॉफ्टनेही नोकरीची ऑफर दिली होती.


तरुणांना संदेश - स्वप्नातील नोकरी मिळवण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल. यश गाठण्यासाठी पहिल्यांदा रिजेक्टेड ई-मेल, अपयशी मुलाखती, कुटुंब, दबाव आणि निराशेपासून स्वत:ची मुक्तता करून घ्यावी लागेल आणि मोकळेपणाने अभ्यास आणि स्वतःवर विश्वास ठेवून काम करावे लागेल. कारण, प्रयत्नाने यश नक्कीच प्राप्त होते. - संप्रीति यादव

Post a Comment

0 Comments

close