Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शाळापूर्व तयारी अभियान / उपक्रम साहित्य वितरणाबाबत.

स्टार्स प्रकल्पांतर्गत इयत्ता पहिलीला दाखलपात्र बालकांसाठी शाळापूर्व तयारी अभियान उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत बालके व पालकांसाठी पुढील प्रमाणे साहित्य शिरीष कार्गो या वाहतूक एजन्सी मार्फत सर्व तालुकास्तरापर्यंत पोहोचविण्यात येत आहे.


शाळापूर्व तयारी अभियान 2024-25 तयारी कशी करावी? मेळावा तयारीसाठी महत्त्वपूर्ण PDF पहा. - Click Here

Join WhatsApp Group

शाळापूर्व तयारी अभियान छापील साहित्य / पुस्तिका वितरण :-

१. विकास पत्र (प्रत्येक बालकासाठी)

Download

२.शाळेतले पहिले पाऊल (प्रत्येक पालकासाठी मार्गदर्शक पुस्तिका)

Download 

३.कृतिपत्रिका (वर्कशीट) (प्रत्येक बालकासाठी १२ वर्कशीटचा एक संच)

Download

४.आयडिया कार्ड (४ पालकांच्या समूहासाठी १२ कार्डाचा एक संच)

Download

५.आयोजकांसाठी सूचनापत्रक (प्रत्येक जि.प., न.प., न.पा., म.न.पा., शाळेस एक)

Download

६.पोस्टर ( मेळाव्याच्या जनजागृती साठी प्रत्येक शाळेस ५ पोस्टर)

Download

७.प्रमाणपत्रे (स्वयंसेवकांसाठी प्रत्येक शाळेस ५)

Download


वरील सात प्रकारचे साहित्य सोबतच्या तक्त्याप्रमाणे तालुकानिहाय वितरीत करण्यात येत आहे. साहित्य प्राप्त झाल्याची पोहोच शिरीष कार्गो या वाहतूक एजन्सीस आपल्या अधिनस्त कामकाज पाहणारे कर्मचारी यांचे नाव, मो.क्र., स्वाक्षरीसह देण्यात यावी. तालुका स्तरावरून सदरील साहित्य केंद्रांना वितरीत करण्यात यावे. 

तालुक्यातील प्रत्येक केंद्रास वितरीत करावयाच्या साहित्याची एक्सेल यादी सोबत जोडली आहे. केंद्रशाळेतून केंद्रातील सर्व शाळांना (जि.प., न.प., न.पा., म.न.पा.) शाळेच्या परिसरातील इयत्ता पहिलीला दाखलपात्र सर्व विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात वितरीत करण्यात यावे. शाळास्तरावरील मेळाव्यामध्ये शाळापूर्व तयारी उपक्रमाचे साहित्य इयत्ता पहिलीला दाखलपात्र सर्व बालके व त्यांच्या पालकांना वितरीत करायचे आहे.

Post a Comment

0 Comments

close