Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शिक्षक बदली 2022 | जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांकरिता पदावधीची परिगणना दिनांक ३१ मे ऐवजी दिनांक ३० जून, २०२२ धरणेबाबत शासन निर्णय

शिक्षक बदली 2022 | जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांकरिता पदावधीची परिगणना दिनांक ३१ मे ऐवजी दिनांक ३० जून, २०२२ धरणेबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. 

जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदल्या ह्या ऑनलाईन पध्दतीने करण्याबाबतचा निर्णय शासनाने यापूर्वी संदर्भ क्र.१ व २ येथील दिनांक ७.४.२०२१ च्या शासन निर्णयान्वये घेतलेला आहे. 

जिल्हांतर्गत बदली शासन निर्णय 7 एप्रिल 2021 - Click Here

आंतरजिल्हा बदली शासन निर्णय 7 एप्रिल 2021 - Click Here. 

सदर शासन निर्णयामध्ये जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या सामान्यपणे वर्षातून एकदाच दिनांक १ मे ते ३१ मे पर्यंत करण्यात याव्यात, अशी तरतुद करण्यात आलेली आहे. तथापि, सन २०१९ मधील बदली प्रक्रिया ३१ मे नंतर पुर्ण करण्यात आली होती. त्यामुळे बदली झालेल्या शिक्षकांना १५ जुन नंतर शालेयकामी हजर व्हावे लागले. त्यामुळे सन २०१९ च्या बदली प्रक्रियेतील अतिदुर्गम डोंगराळ भागातील कार्यरत शिक्षक हे त्या पदावरील ३ वर्षाचा कालावधी दिनांक ३१ मे, २०२२ पर्यंत पूर्ण करीत नसल्यामुळे त्यांच्यावर सन २०२२ मध्ये होणाऱ्या बदली प्रक्रियेत अन्याय होणार असल्याने यात सुधारणा करावी, अशा स्वरुपाची निवेदने शासनाकडे प्राप्त झालेली आहेत. याकरिता उक्त दिनांक ७.४.२०२१ च्या शासन निर्णयातील ३१ मे या ऐवजी जुन २०२२ अखेरपर्यंत परिगणना करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शिक्षकांच्या बदल्यांकरिता पदावधीची परिगणना कालावधी बाबत शासन निर्णय : Click Here

सन २०२२ मध्ये होणाऱ्या बदल्यांकरिता पदावधीची परिगणना दिनांक ३१ मे ऐवजी दिनांक ३० जून, २०२२ पर्यंत करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे. सदर प्रमाणे पदावधीची परिगणना ही केवळ सन २०२२ मध्ये होणाऱ्या बदल्यांसाठीच लागू असेल.

Post a Comment

0 Comments

close