विद्यार्थ्यांना अपघातामुळे पोहोचलेल्या क्षतीची काही प्रमाणात नुकसान भरपाई व सुरक्षा कवच देण्याच्या दृष्टीने राज्यातील इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना 27 ऑगस्ट 2022 पासून नियमित राबविण्यात येत आहे. सन २०१३ पासून वाढलेली महागाई व विद्यार्थ्यांचे अपघाताचे वेगवेगळे स्वरूप यानुषंगाने प्रस्तुत योजना सुधारित करण्याबाबत 21 जून 2022 रोजी शासनाने निर्णय घेतला आहे.
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना सुधारणा शासन निर्णय 2१ जून 2022 PDF
१. शासन निर्णय क्रमांक पीआरई / २०११ / प्र.क्र.२४९ / प्राशि -१ दि. १ ऑक्टोबर २०१३ अन्वये सबविण्यात आलेल्या राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना " खालील सुधारणांसंह नियमित स्वरुपात राबविण्यात यावी.
२. सदरची योजना इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंत शिकणा-या सर्व मुला / मुलींना लागू राहील.
3. सदर योजनेमध्ये विद्यार्थ्यांचा अपघात / जखमी झाल्यास अनुज्ञेय सानुग्रह अनुदान व त्यास सादर करावयाची कागदपत्रे खालीलप्रमाणे राहतील.
योजनेसाठी लागणारी कागदपत्रे PDF - Click Here
४. विद्यार्थ्याच्या सानुग्रह अनुदानाचे प्रस्ताव तयार करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांचे पालक व संबंधित शाळांचे मुख्याध्यापक / गट शिक्षणाधिकारी / शिक्षणाधिकारी (प्राथमिक / माध्यमिक ) / शिक्षण निरिक्षक यांची राहील.
राजीव गांधी अपघात योजना शासन निर्णय (21जून2022) डाउनलोड करा. Click Here
राजीव गांधी अपघात योजना शासन निर्णय (11जुलै2011) डाउनलोड करा. Click Here
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना या योजनेमध्ये खालील बाबींचा सामवेश राहणार नाही.
१) आत्महत्येचा प्रयत्न करणे.
२) आत्महत्या किंवा जाणीवपूर्वक स्वतःला जखमी करुन घेणे.
३) गुन्हयाच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात.
(४) अंमली पदार्थांच्या अंमलाखाली असताना झालेला अपघात.
५) नैसर्गिक मृत्यू
६) मोटार शर्यतीतील अपघात
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना या योजनेतंर्गत विद्यार्थ्यांचे निधन झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना सानुग्रह अनुदानाची रक्कम पुढील प्राधान्य क्रमानुसार अदा करावीत.
१) विद्यार्थ्याची आई.
२) विद्यार्थ्याची आई हयात नसल्यास वडील.
३) विद्यार्थ्याची आई वडील हयात नसल्यास १८ वर्षावरील भाऊ किंवा अविवाहीत बहीण किंवा पालक
0 Comments