शैक्षणिक वर्ष 2024-2025 साठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या एमएचटी-सीईटी- 2026 ऑनलाईन प्रवेश परीक्षा मार्च-एप्रिल 2025 मध्ये घेण्यात येणार आहे.
राज्य सामायिक परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) आगामी २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी सामायिक प्रवेश परीक्षांचे (सीईटी परीक्षा) संभाव्य वेळापत्रक जाहीर केले असून, विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांना १६ मार्चपासून सुरुवात होणार आहे. इंजिनिअरिंग, फार्मसी आणि कृषी शाखेची सीईटी परीक्षा ९ एप्रिल ते २७ एप्रिलदरम्यान घेण्याचे सीईटी सेलने प्रस्तावित केले आहे.
राज्यातील पदवी आणि पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सीईटी सेलकडून दरवर्षी घेतली जाते. विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षांचे वेळापत्रक माहीत झाल्यास त्यानुसार या परीक्षांची तयारी करणे शक्य व्हावे यादृष्टीने तीन महिन्यांपूर्वीच प्रवेश परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक सीईटी सेलने जाहीर केले आहे.
सीईटी सेलने १९ परीक्षांचे वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर केले आहे. त्यानुसार यंदा सीईटी सेलकडून एमएड आणि एमपीएड अभ्यासक्रमांची परीक्षा १६ मार्चला घेतली जाणार आहे. सीईटी सेलकडून पीसीबी ग्रुपची एमएचटी सीईटी परीक्षा ९ एप्रिल ते १७ एप्रिलदरम्यान आणि पीसीएम ग्रुपची परीक्षा १९ एप्रिल ते २७ एप्रिलदरम्यान घेतली जाणार आहे, तर एमबीए आणि एमएमएस अभ्यासक्रमांची सीईटी परीक्षा १७ मार्च ते १९ मार्च दरम्यान घेण्याचे प्रस्तावित केले आहे.
अभ्यासक्रमनिहाय सीईटी परीक्षांचे माहिती पुस्तिका, वेळापत्रक आणि अभ्यासक्रम राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या संकेतस्थळावर www.mahacet.org उपलब्ध करुन देण्यात आले आहे. उच्च शिक्षण विभागाचे विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षाचे ऑनलाईन अर्ज cet cell च्या अधिकृत संकेतस्थळावरुन भरता येतील.
Post a Comment
0
Comments
PAT 3 - द्वितीय सत्र | प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका, शिक्षक मार्गदर्शिका
0 Comments