Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन कार्यपद्धती | संपूर्ण माहिती | शासन निर्णय डाउनलोड PDF

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ साली भारतात लागू करण्यात आला. याच कायद्यांतर्गत २००९-१० या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्रातील राज्यातील सर्व शाळांत इयत्ता पहिली ते आठवीसाठी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धती लागू करण्यात आली. 

विद्यार्थ्यांचे 'सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन' करणे या संकल्पनेचा शब्दश: अर्थ मुलांचे सतत व सर्व अंगाने होणारे मूल्यमापन. यात प्रामुख्याने दोन घटकांचा समावेश करण्यात आला आहे- आकारिक मूल्यमापन व संकलित मूल्यमापन. आकारिक मूल्यमापन म्हणजे विद्यार्थी  प्रत्यक्ष आकार घेताना (शिकताना) करावयाचे मूल्यमापन तर संकलित मूल्यमापन म्हणजे सत्राच्या शेवटी केलेली विद्यार्थ्याच्या संपादणुकीची पडताळणी!

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन कार्यपद्धती शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा. Click Here


कार्यपध्दती -

(अ) आकारिक मूल्यमापन (Formative Evaluation)

(विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्व आकार घेत असताना नियमितपणे करावयाचे मूल्यमापन)

सर्व शिक्षकांनी खालील साधने तंत्र उपयोगात आणून वर्गपातळीवर विद्याथ्यांचे आकारिक मूल्यमापन करावे आणि प्रत्येक विद्यार्थ्यांच्या त्या संबंधीच्या आवश्यक नोंदी ठेवाव्यात.

(१) दैनंदिन निरीक्षण.

२) तोंडी काम (प्रश्नोत्तरे प्रकट वाचन, भाषण-संभाषण, भूमिकाभिनय. मुलाखत. गटचर्चा इत्यादी) 

३) प्रात्यक्षिकं / प्रयोग.

४) उपक्रम / कृती (वैयक्तिक, गटात, स्वयंअध्ययनाद्वारे)

५) प्रकल्प

६) चाचणी (वेळापत्रक जाहीर न करता अनौपचारीक स्वरुपात घ्यावयाची छोट्या कालावधीची लेखी चाचणी / पुस्तकासह चाचणी (open book test)

(७) स्वाध्याय / वर्गकार्य (माहिती लेखन, वर्णन लेखन, निबंध लेखन, अहवाल लेखन कथा लेखन, पत्र लेखन, संवाद लेखन व कल्पना विस्तार इत्यादी)

(८) इतर प्रश्नावली. सहाध्यायी मूल्यमापन स्वयंमूल्यमापन, गटकार्य अशा प्रकारची अन्य

साधने

आकारिक मूल्यमापनात वरील मूल्यमापनाची साधन तंत्र यापैकी इयत्ता विषय आणि उद्दिष्टे विचारांत घेऊन अधिकाधिक साधन तंत्राचा वापर करावा. यात किमान पाच साधनं तंत्रे यांचा वापर करावा. 
कला, कार्यानुभव. शारिरीक शिक्षण व आरोग्य या विषयांसाठी किमान तीन साधने तंत्रे यांचा वापर करावा. 

प्रत्येक साधन तंत्रास योग्य भारांश द्यावा. तसेच विद्यार्थी वर्षभरात किमान एक प्रकल्प करतील असे पहावे. प्रत्येक सत्रात किमान एक छोट्या कालावधीची लेखी चाचणी / पुस्तकासह लेखी चाचणी (Open book test) घ्यावी. विद्यार्थी, विषय आणि उद्दिष्टे, इत्यादीनुसार उपरोक्त साधन-तंत्राच्या उपयोगाबाबत आकारिक मूल्यमापनात लवचिकता राहील.

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन आकारिक मूल्यमापन नोंदी व संकलित मूल्यमापन प्रश्नपत्रिका  PDF डाउनलोड करा. Click Here


(ब) संकलित मूल्यमापन (Summative Evaluation) (ठराविक काळानंतर एकत्रित स्वरुपात करावयाचे मूल्यमापन)


प्रथम सत्राच्या अखेरीस पहिले संकलित मूल्यमापन करावे. द्वितीय सत्राच्या अखेरीस दुसरे संकलित मूल्यमापन करण्यात यावे. संकलित मूल्यमापनात विषयांच्या उदिष्टानुसार लेखी, तोंडी, प्रात्यक्षिक प्रश्नांचा समावेश करावा.


आकारिक व संकलित मूल्यमापन भारांश 

प्रत्येक सत्रासाठी व प्रत्येक विषयासाठी (कला, कार्यानुभव आणि शारीरिक शिक्षण व आरोग्य हे विषय वगळून)


आकारिक मूल्यमापनासाठी सूचना


९. आकारिक मूल्यमापन : विद्यार्थ्याचा शारीरिक, बौध्दिक, भावनिक असा सर्वागीण विकास होऊन त्यांचे व्यक्तिमत्व कसे आकाराला येत आहे हे नियमितपणे पडताळून पाहाणे म्हणजेच आकारिक मूल्यमापन शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये आकारिक मूल्यमापनाला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याचे आकारिक मूल्यमापन गांभीर्याने करणे आवश्यक आहे.

१.१ आकारिक मूल्यमापन करण्यासाठी आठ साधन-तंत्र वापरून केलेल्या मूल्यमापनामधील विद्याथ्यांचा प्रतिसाद / सहभाग विचारात घ्यावा. मूल्यमापनाचा विचार जीवन कोशल्यांच्या अंगाने करावा. विद्याथ्र्यांची जिज्ञासा, शोधक वृत्ती. चिकित्सक वृत्ती. सर्जनशील विचार करण्याची क्षमता. संवेदनशीलता, विद्याथ्यांचे परस्पराशी असलेले संबंध, सहज संवाद साधण्याची क्षमता, ताणतणावांना तोंड देण्याची भावनिक ताकद या सर्व गोष्टीची दखल घ्यावी. ही सर्व कौशल्ये विद्याथ्यांच्या वर्तनात दृश्य स्वरुपात येण्याच्या दृष्टीने विद्याथ्यांशी वेळोवेळी सुसंवाद साधावा त्यामुळे शिक्षण प्रक्रिया उद्दिष्टानुरूप व जीवनाभिमुख होण्यास मदत होईल.

१.२ आकारिक मूल्यमापनामधून संविधानातील मूल्ये, गाभाघटक व जीवन कौशल्ये याचे मूल्यमापन व्हावे. 

१.३ प्रत्येक सत्रातील आकारिक मूल्यमापनामध्ये सातत्य राहावे. वरील आकारिक मूल्यमापनाच्या आठ साधन-तंत्रापैकी विषय व उद्दिष्टानुसार उपयुक्त मूल्यमापन साधनाद्वारे विद्यार्थ्याचे मूल्यमापन करण्यात यावे.

१.४ कला, कार्यानुभव आणि शारीरिक शिक्षण व आरोग्य या विषयांमुळे विद्यार्थ्याचा सर्वागीण विकास होण्यास मदत होते. शिक्षणप्रक्रिया जीवनाशी जोडली जाते व मूल्यांचा परिपोष होता. त्यामुळे या विषयाच मूल्यमापन योग्यप्रकार करून विद्यार्थ्यांना प्रेरणा व प्रोत्साहन द्यावे. 

१.५ आकारिक मूल्यमापन करताना शिक्षकांच्या मार्गदर्शनातील उणीवा आणि विद्यार्थ्याच्या अध्ययनातील अडचणी दूर होऊन विद्याथ्यांचे मूलभूत संबोध (concepts) व कौशल्ये दृढ होण्यासाठी योग्य ते नियोजन करून कृती करावी.

१.६ प्रत्येक व्यक्तीमध्ये विविध स्वरुपाच्या सुप्त क्षमता असतात त्या सुप्त क्षमतांचा शोध घेण्यासाठी व त्यांचा विकास साधण्यासाठी विविध अध्ययन अनुभव व उपक्रम योजावेत. त्यांतून साधल्या जाणाऱ्या व्यक्तिमत्व विकासाच वळावळी मूल्यमापन करावे.

१.७ अतिरिक्त पूरक मार्गदर्शन आकारिक मूल्यमापन करताना विद्यार्थी संपादणुकीमध्ये मागे असल्याचे आवळून येईल अशा विद्यार्थ्याच्या अध्ययनातील अडचणी त्रुटींचा शोध घ्यावा व त्यानुसार वेळच्यावेळी विद्याथ्यांना वैयक्तिक अथवा गटात अतिरिक्त पूरक मार्गदर्शन करून त्यांना अपेक्षित संपादणूक पातळीपर्यत आणावे.

२. संकलित मूल्यमापन

संकलित मूल्यमापन प्रथम व द्वितीय सत्राच्या अखेरीस लेखी, तोंडी, प्रात्यक्षिक स्वरुपात करण्यात यावे. लेखी स्वरुपातील साधनांमध्ये मुक्तात्तरी प्रश्नांचा (open miended questions) अधिक वापर करण्यात यावा. सावधानातील मूल्ये. गाभाघटक, जीवन कौशल्ये व दूरगामी उदिष्टे या संदर्भातील मूल्यमापन होण्याच्या दृष्टीने विचार करण्यात यावा.

२.१ पहिले संकलित मूल्यमापन प्रथम सत्राच्या अखेरीस व दुसरे संकलित मूल्यमापन द्वितीय सत्राच्या अखेरीस तोंडी प्रात्यक्षिक वर्ग स्तरावर शाळा स्तरावर शिक्षक व मुख्याध्यापक यांनी ठरवून करावे.

२.२ संपूर्ण शिक्षण प्रक्रियाच आनंददायी असणे आवश्यक आहे. विद्याथ्र्यांला आपली मतं मुक्तपणे व सहजतेने देता येतील व्यक्त करता येतील अशा रीतीने मूल्यमापन करावे. मूल्यमापनामुळे मुलांना भीती दडपण वाटणार नाही याची दक्षता घ्यावी.

२.३ प्रत्येक शिक्षकांनी मूल्यमापन करण्यासाठी विषयांची उद्दिष्टे पहावीत व त्यानुसार मूल्यमापनाची कार्यपध्दती ठरवावी.

२.४ विहित] विषयांचे ज्ञान, आकलन, उपयोजन, कौशल्ये अभिरुची अभिवृत्ती. रसग्रहण इत्यादी उद्दिष्टांचे मूल्यमापन करण्यापूर्वी त्या विषयीचा वर्गात आवश्यक तो पुरेसा सराव घ्यावा.

२.५ संकलित मूल्यमापनासाठी प्रश्न तयार करताना सर्व उद्दिष्टांना योग्य प्रमाणात भारांश द्यावा. तसेच वस्तुनिष्ठ लघुत्तरी व दीर्घोत्तरी प्रश्नांसाठी इयत्तानिहाय योग्य प्रमाणात भारांश निश्चित करावा. इयत्ता पहिली दुसरी व इयत्ता तिसरी चौथीसाठी वस्तुनिष्ठ व लघुत्तरी प्रश्न अधिक असावेत. इयत्ता पाचवी ते आठवीसाठी वस्तुनिष्ठ लघुत्तरी व दीर्घोत्तरी प्रश्नांसाठी अनुक्रमे सर्वसाधारणपणे २०% ६० % व २०% भारांश असावा.

२.६ प्रत्येक शाळेतील त्या त्या वर्गाांना शिकविणाऱ्या शिक्षकांनी विषयनिहाय, वर्गनिहाय संकलित मूल्यमापन करावे. कोणत्याही अन्य यंत्रणेकडून तयार करण्यात आलेली मूल्यमापनाची साधने तंत्रे आणि प्रश्नपत्रिका वापरल्या जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी.

२.७ संकलित मूल्यमापनासाठी साधने तयार करताना विद्यार्थ्याची चिकित्सक वृत्ती. सृजनशीलता आणि बहुविध बुद्धीमत्ता (Multiple intelligence) वाव ठेवावा. त्यासाठी आवश्यकतेनुसार मुक्तात्तरी प्रश्नांचा (Open Ended Questions) उपयोग करावा. यांत्रिक प्रतिसाद घोकंपट्टी यावर भर देणाऱ्या आणि स्मरणावर आधारित प्रश्नांना वाव देऊ नय

२.८ संकलित मूल्यमापनाचे वेळापत्रक वर्ग शाळा पातळीवर निश्चित करावे. मूल्यमापन करताना वेळेचायत लचकता ठेवावी.

२.९ मूल्यमापनातून निदर्शनास आलेल्या उल्लेखनीय बाबी तसेच वैयक्तिक गुणांची आवर्जून दखल घ्यावी आणि विद्याथ्यांची आवड लक्षात घेऊन अशा गुणांच्या विकासासाठी विद्याथ्यांना प्रोत्साहन द्यावे.

२.९० अतिरिक्त पूरक मार्गदर्शन संकलित मूल्यमापन करताना जे विद्यार्थी संपादणुकीमध्ये मार्ग असल्याचे आढळून येईल अशा विद्याथ्यांच्या अध्ययनातील अडचणी / त्रुटींचा शोध घ्यावा व त्यानुसार वेळच्यावेळी विद्याथ्यांना वैयक्तिक अथवा गटात अतिरिक्त पूरक मार्गदर्शन करून त्यांना अपेक्षित संपादणूक पातळीपर्यंत आणावे.

श्रेणी पद्धतीचा वापर


विद्यार्थ्यांना द्यावयाच्या प्रगतीपत्रकात विद्यार्थ्यांची विषयवार संपादणूक त्यांनी प्राप्त कलेल्या गुणांवरून खालील कोष्टकात दशावल्यानुसार श्रेणीमध्ये लिहावी. सर्व विषयांची सरासरी काढून संकलित श्रेणी नोंदवू नये.

गुणांचे वर्गातर
९१% ते १००%
८५% ते ९०%
७१% ते ८०% 
६१ त ७०%
५१% ते ६०%
४१% ते ५०%
३१% ते ४०%
२१% ते ३२%
२० % व त्यापेक्षा कमी 


श्रेणी
अ-१
अ-२
ब-१
ब-२
क- १
क-२
इ -1
ई-२

विद्यार्थ्याच्या प्रगतीपत्रकात शैक्षणिक प्रगतीचे वर्णनात्मक फलित नोंदवावे. तसेच त्यामध्ये वैयक्तिक गुणांची (Quality) नोंद करावी. मूल्यमापन करताना सकारात्मक शेऱ्यांचा वापर करावा. तसेच इतर विद्याथ्यांशी तुलना करू नये. पालकांना मुलांच्या प्रगतीचावत वेळच्यावेळी माहिती द्यावी.

विद्यार्थी मूल्यमापनाच्यावेळी अनुपस्थित राहतील त्यांचे पुन्हा मूल्यमापन करण्यात यावे. सर्व विद्यार्थी वरच्या श्रेणीकडे वाटचाल करतील यासाठी शाळा व शिक्षकांनी प्रयत्नशील रहावे. विशेष करून 'ड' व त्याखालील श्रेणीतील विद्यार्थ्याना अतिरिक्त पूरक मार्गदर्शन करून किमान 'क २' श्रेणी पर्यंत आणणे हे शाळा व शिक्षकांवर बंधनकारक राहील. मात्र अशा विद्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीत त्याच इयत्तेत ठेवता येणार नाही.


Post a Comment

0 Comments

close