Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Google Search

निपुण भारत अभियान शासन निर्णय PDF | FLN “मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान" ची अंमलबजावणी करणेबाबत शासन निर्णय 27 ऑक्टोबर 2021

NIPUN BHARAT - National Initiative For Proficiency In Reading With Understanding and Numeracy अंतर्गत “मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान" ची अंमलबजावणी करणेबाबत शासन निर्णय. 27 ऑक्टोबर 202१

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सन २०२० नुसार, प्राथमिक स्तरावर सन २०२६ २७ पर्यंत मुलभूत भाषिक व गणितीय कौशल्य प्राप्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. यात प्राथमिक पातळीवरील अनेक विद्यार्थ्यांनी अद्याप मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त केले नाही, असे ठळकपणे नमूद आहे. वय वर्षे ३ ते ९ वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांना मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त करण्यासाठी त्वरीत एक राष्ट्रीय अभियान राबवून त्याची राज्यामध्ये अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. सदर अभियानात विद्यार्थी, पालक, शाळा, शिक्षक व समाज या सर्वांनी सर्वकष पुढाकार घेऊन राज्यातील सर्व विद्यार्थ्यांच्या भावी शिक्षणाचा पाया मजबूत करणे गरजेचे आहे.

त्यासाठी भारत सरकारने "समग्र शिक्षा" मध्ये निपुण भारत (National Initiative For Proficiency In Reading With Understanding and Numeracy) अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याने इयत्ता ३ री पर्यंत मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान सन २०२६-२७ पर्यंत प्राप्त करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. याकरिता कृती आराखडा तयार करणे, विषयसूची व प्राधान्यक्रम ठरविण्याची गरज आहे. यासाठी जिज्ञासूपणास वाव देणारा अभ्यासक्रम व शैक्षणिक साहित्य ( ऑफलाईन व ऑनलाईन), निश्चित क्षमता विधाने (Learning Competencies) व अध्ययन निष्पत्ती (Learning Outcomes), शिक्षक सक्षमीकरण, मूल्यमापनाची तंत्रे इत्यादी विकसित करणे आवश्यक आहे. सध्या इयत्ता ४ थी व ५ वी मधील ज्या विद्यार्थ्यांनी मुलभूत कौशल्ये प्राप्त केली नाहीत, त्यानांही आवश्यक नैपुण्य प्राप्त करण्यासाठी वैयक्तिक मार्गदर्शन, समवयस्क विद्यार्थ्यांसोबत गटकार्य व वयानुरूप पूरक अध्ययन साहित्य (छापील व डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.

Join WhatsApp Group

https://chat.whatsapp.com/GluLDrOXHRU3dy5nPX9XlB


निपुण भारत अंतर्गत “मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान"

१. भाषिक कौशल्ये:- ३ ते ९ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचा प्रारंभिक भाषा विकास होण्यासाठी मातृभाषेमध्ये मौखिक भाषा ज्ञान, समजपूर्वक ऐकणे व त्याचे आकलन, मुद्रणशास्त्र व उच्चारशास्त्र यांच्या विकासाची जाणीव व लेखन कौशल्याचा विकास होणे गरजेचे आहे. भाषिक कौशल्ये प्राप्त होण्यासाठी भाषेचे पूर्वज्ञान मदतगार ठरेल. ज्या विद्यार्थ्याचा मातृभाषेचा पाया मजबूत असतो, ते विद्यार्थी इंग्रजी वा अन्य भाषा अधिक सहजतेने शिकू शकतात.


पायाभूत साक्षरतेचे घटक:

१.१. मौखिक भाषा विकास:- लेखन व वाचनाची कौशल्ये विकसित करण्यासाठी मौखिक भाषेचा विकास महत्त्वाचा आहे. 

१.२. उच्चार शास्त्राची जाणीव:- शब्दांची लय व ध्वनीची जाणीव या बाबींचा योग्य वापर होणे गरजेचे आहे. 

१.३. सांकेतिक भाषा / लिपी समजून घेणे:- यामध्ये छापील मजकूरांचे आकलन करण्याची क्षमता, अक्षरांचे ज्ञान, सांकेतिक भाषा, लिपी समजून घेणे, शब्द ओळखणे,

१.४. शब्द संग्रह:- मौखिक शब्द संग्रह, वाचन / लेखन शब्दसंग्रह व शब्दांच्या विविध अर्थछटा,

१.५. वाचन व आकलन:- मजकूराचे वाचन करून अर्थ समजून घेणे, माहिती प्राप्त करणे व मजकूराचे स्पष्टीकरण करणे. 

१.६. वाचनातील ओघवतेपणा:- मजकूर अचूकपणे व लयबद्ध वाचणे, अभिव्यक्ती व आकलन.

१.७. लेखन:- अक्षरे व शब्द लिहिणे, अभिव्यक्तीसाठी लिहिणे याची क्षमता.

१.८. आकलन:- छापील मजकूर / पुस्तके यामुळे आकलन कौशल्ये विकसित होण्यास मदत..

१.९. वाचन संस्कृती / वाचनाकडे कल:- यामध्ये विविध तऱ्हेची पुस्तके व इतर वाचन साहित्य वाचण्याकडे कल असणे.


२. पायाभूत संख्या साक्षरता, संख्याज्ञान व गणितीय कौशल्ये:

पायाभूत संख्या साक्षरता म्हणजे दैनंदिन प्रश्न सोडवण्यासाठी साध्या संख्यात्मक कल्पनांचा वापर करण्याची क्षमता, संख्या पूर्व व संख्या कल्पनेचा विकास, तुलना करण्याचे ज्ञान व कौशल्य, क्रमशः मांडणी करणे, आकृतीबंध / संरचना ओळखणे व त्याचे वर्गीकरण. या बाबी प्राथमिक वर्गात गणित अध्ययनाचा पाया घालतात.


प्रारंभिक गणिताचे दृष्टीकोन:

2.1 संख्या पूर्व:- गणन व संख्या ज्ञान

2.2 संख्या व संख्येवरील क्रिया:- दशमान पध्दतीचा वापर, संख्येवरील क्रियांवर प्रभुत्व संपादन करणे.. गणना करणे:- तीन अंकी संख्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या गणितीय क्रिया करण्याच्या पद्धती समजावून घेणे व त्याचा उपयोग करणे, 

2.3 आकार व अवकाश याबाबत समजून घेणे:- तीन अंकी संख्यांपर्यंतची सोपी आकडेमोड करून त्यांच्या विविध संदर्भातील दैनंदिन कार्यात उपयोग करणे. 

2.4 नमुना / संरचना:- आकार व अवकाशातील वस्तू समजून घेण्यासाठी संबंधित शब्द संग्रह शिकणे.

निपुण भारत अभियान शासन निर्णय PDF | FLN “मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान" ची अंमलबजावणी करणेबाबत शासन निर्णय 27 ऑक्टोबर 2021 डाउनलोड


निपुण भारत मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान राज्यस्तरीय सुकाणू समिती PDF


निपुण भारत मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान जिल्हास्तरीय सुकाणू समिती PDF


निपुण भारत मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान राज्य प्रकल्प सनियंत्रण कक्ष (PMU) संरचना व कार्य


निपुण भारत मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान भाषिक कौशल्य व गणितीय कौशल्य निकष PDF डाउनलोड करा.

Post a Comment

0 Comments

close