Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

"जागतिक सांकेतिक भाषा दिन" 23 सप्टेंबर रोजी साजरा करणेबाबत शासन परिपत्रक. | World's Sign Language Day

दिनांक १९ ते २५ सप्टेंबर २०२२ हा "जागतिक कर्णबधीर सप्ताह" म्हणून साजरा केला जात असून २३ सप्टेंबर हा दिवस "जागतिक सांकेतिक भाषा दिन" म्हणून "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून साजरा करण्यात येणार आहे. 

संयुक्त राष्ट्र संघटनेने २३ सप्टेंबर हा दिवस "जागतिक सांकेतिक भाषा दिन" म्हणून घोषित केला आहे. तसेच सांकेतिक भाषेच्या महत्त्वाबाबत जागरुकता निर्माण होण्याच्यादृष्टीने "वर्ल्ड फेडरेशन ऑफ डेफ" यांनी या वर्षासाठीच्या जागतिक सांकेतिक भाषा दिनासाठी "Sign Language unite us." असे बोधवाक्य सुचवले आहे.


वाचा :- सकारात्मकता - दिव्यांग विशेष - Click Here
दिव्यांग पालकांना शालेय व्यवस्थापन समिती मध्ये प्रतिनिधित्व देणेबाबत शासन निर्णय - Click Here

Sign Language Day - 23 September 2022

सांकेतिक भाषा दिन 2022 थीम

या वर्षाची सांकेतिक भाषा दिन - 2022 ची थीम पुढीलप्रमाणे आहे. 

“Sign Language Untie Us.”

“सांकेतिक भाषाए हमें एकजूट करती है" 

"संकेत भाषा ह्या आपल्याला एकसंघ करतात."



१. दिनांक १९ ते २५ सप्टेंबर २०२२ हा "जागतिक कर्णबधीर सप्ताह" म्हणून साजरा केला जात असून २३ सप्टेंबर हा दिवस "जागतिक सांकेतिक भाषा दिन" म्हणून "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून साजरा करण्यात येणार आहे. 

२. या साजरीकरणाच्या कार्यक्रमामध्ये खालील बाबींचा समावेश असू शकतो. 

(अ) अधिकारी / कर्मचारी / सहभागींना बोधवाक्याचे व्हिडीओ रेकार्डींग करण्यासाठी प्रोत्साहित केले जाऊ शकते. बोधवाक्याचा व्हिडीओ http://www.isirte.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

आ) सामाजिक कार्यकर्ते / स्थानिक कर्णबधीर संस्था / कर्णबधीर व्यक्ती / कर्णबधीरांसाठींच्या शाळा/ प्रतिष्ठित व्यक्ती तसेच सांकेतिक भाषेचे दुभाषी यांना कार्यक्रमासाठी आमंत्रित केले जाऊ शकते.

(इ) सांकेतिक भाषा दिनाबाबतचे फलक प्रसारित करण्यासाठी विभागाच्या संकेतस्थळाचा वापर करावा. तसेच "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" साजरा करण्यासाठी केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाने तयार केलेल्या बोधवाक्याचा वापर करावा. याबाबतची लिंक http://www.isirtc.nic.in/ या संकेतस्थळाखालील "Sign Language Day 2022" टॅबमधून डाऊनलोड करता येईल.

ई) याबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी Common Sign Videos, ISI (Indian Sign Language) Dictionary, NCERT textbooks in ISL चे सार्वजनिक ठिकाणी थेट प्रक्षेपण करण्यात यावे, याबाबतची लिंक http://www.isirtc.nic.in/

(उ) सांकेतिक भाषा दिनासंदर्भात कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबियांसमवेत चर्चासत्रे, प्रश्नमंजुषा अशाप्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यात याव्यात.

ऊ) सांकेतिक भाषेबाबत जागरुकता निर्माण करणारे साहित्य / पुस्तिका http://www.isirtc.nic.in/ या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून त्याचे वितरण करण्यासाठी मुद्रित करावे.

ऋ) सांकेतिक भाषा दिनाबाबत जागरुकता करण्यासाठी सोशल मिडीया प्लॅटफॉर्म, मोठ्या प्रमाणावर एस. एम. एस. व्हॉट्स ॲप यांचा व्यापक वापर करावा. 

ऌ) सांकेतिक भाषा दिन साजरा करण्यासाठी कॅम्पस परिसरात सहजपणे नजरेस पडतील अशा ठिकाणी स्टॅंडीज तसेच फलक प्रदर्शित करावेत.

ऍ) सांकेतिक भाषा दिनी सांकेतिक भाषेतील राष्ट्रगीत प्रदर्शित करावे. 

लिंक -  http://www.isirtc.nic.in/

३. सांकेतिक भाषा दिनाच्या साजरीकरणाचे निवडक छायाचित्रे / मेडिया क्लिप्स केंद्र शासनास ईमेलद्वारे mediadenwd@gmail.com येथे पाठविण्यात यावीत. तसेच त्या विभागाच्या संकेतस्थळावरसुद्धा प्रदर्शित करण्यात यावीत.

४. सबब स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या साजरीकरणास मोठ्या प्रमाणावर यश मिळण्याच्यादृष्टीने वरील कार्यक्रमाचे संपूर्ण उत्साहाने करण्यात यावे, असे सर्व मंत्रालयीन विभाग तसेच मंत्रालयीन विभागाच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग / कार्यालयांना सूचित करण्यात येत आहे.

५. २३ सप्टेंबर - सांकेतिक भाषा दिवस म्हणून साजरा करणेबाबत शासन परिपत्रक डाउनलोड करा. Click Here

Post a Comment

0 Comments

close