Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

सोलापूर प्राथमिक शिक्षणाधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात | कार्यालयातच घेतली २५ हजारांची लाच

सोलापूर येथील एका स्वयंअर्थसाहाय्य खासगी शाळेचे आठवी ते दहावीचे वर्ग 'यू-डायस प्लस'मध्ये समाविष्ट करण्यासाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी ५० हजारांची लाच मागितली. त्यातील २५ हजार रुपये सोमवारी कार्यालयातच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना रंगेहाथ पकडले.



खासगी शाळेचे वर्ग वाढल्यानंतर शिक्षकांची मान्यता, विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी अडचणी येऊ नयेत, यासाठी त्या वर्गांची नोंद यू-डायस प्लसमध्ये व्हावी, असा नियम आहे. त्यामुळे संबंधित शाळेने त्यांच्या शाळेतील आठवी ते दहावीच्या वर्गांचा प्रस्ताव प्राथमिक शिक्षण विभागाला दिला होता. प्रस्ताव पाठवूनही त्यावर निर्णय होत नसल्याने त्यांनी त्यासंदर्भात विचारणा केली होती. त्यावेळी शिक्षणाधिकारी लोहार यांनी संबंधितांकडे लाच मागितली. त्यातील २५ हजार रुपये स्वीकारताना त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. त्यांच्याविरुद्ध सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून त्यांना अटक करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती. त्यांना रविवारीच तीन मंत्र्यांच्या उपस्थितीत महाबळेश्वर (जि. सातारा) येथील एका कार्यक्रमात पुरस्कार मिळाला होता. ग्लोबल टीचर डिसले गुरुजींच्या प्रकरणात बेधडक वक्तव्यांमुळेपण ते चर्चेत राहिले.




लाचखोर शिक्षणाधिकारी लोहाराचे कारनामे भाग 2

https://cutt.ly/2NR8rVj



लाचखोर शिक्षणाधिकारी लोहाराचे कारनामे भाग 2

https://cutt.ly/2NR8rVj


लाचखोर शिक्षणाधिकारी लोहाराचे कारनामे भाग 1

https://cutt.ly/2NR8rVj



Post a Comment

0 Comments

close