Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

SDMS Udise+ student Portal link | https://sdms.udiseplus.gov.in | Udise Plus Student Database Management System user mannual pdf

यु-डायस प्लस प्रणालीमध्ये केंद्र शासनाकडून दोन टप्प्यामध्ये माहिती संकलित करण्यात येणार आहे. प्रथम टप्यामध्ये शाळेची सांख्यिकी माहिती तर दुसऱ्या टप्प्यात विद्यार्थी माहिती संकलित करण्यात येणार आहे, त्यासाठी विद्यार्थी डेटाबेस व्यवस्थापन प्रणाली (SDMS  Portal) विकसित करण्यात आले आहे. 


SDMS Portal वर विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती भरण्यासाठी Step By Step Guide PDF डाउनलोड करा. - Click Here


विद्यार्थी डेटाबेस व्यवस्थापन प्रणाली SDMS Portal


Student Database Management System (SDMS Portal) 

विद्यार्थी प्रोफाइल, नावनोंदणी, गळती, बदली, प्रगती/होल्डबॅक इत्यादी विद्यार्थ्यांचे रेकॉर्ड व्यवस्थापित करण्यासाठी विद्यार्थी डेटाबेस व्यवस्थापन प्रणाली (SDMS Portal) विकसित केली आहे. यामुळे केंद्र, राज्य, जिल्हा, ब्लॉक आणि शाळा स्तरावर अहवाल तयार करण्यात मदत होते.

SDMS student udise Portal Link - Click Here

SDMS Portal Registration - Click Here


SDMS UDISE+ Student Information PDF - Click Here


UDISE  Main Profile and facilities - Click Here

UDISE Teacher Module link - Click Here

UDISE Student Module link - Click Here

UDISE Report Module link - Click Here



यु-डायस प्लस (SDMS) ऑनलाईन प्रणालीमध्ये नोंदणी न झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती उपलब्ध करून देणेबाबत. 


सन २०२2-२3 या मागील वर्षामध्ये यु-डायस प्रणालीमध्ये राज्यातील सर्व विद्यार्थ्यांची सविस्तर नोंदणी करण्यासाठी कळविण्यात आले होते परंतु असे दिसून आले आहे, की शाळेत शिक्षण घेत असुनही बऱ्याच विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली नाही. त्याकरिता शाळेच्या मुख्याध्यापकांकडून इयत्ता २री ते १२वी पर्यंत विद्यार्थी जे सध्या त्याच शाळेत शिक्षण घेत आहेत त्यांची माहिती नोंदविण्यासाठी टॅब उपलब्ध करून देण्यासाठी विनंती करण्यात येत आहे. 

विद्यार्थी नोंदणी बाकी असण्याची कारणे पुढील प्रमाणे सांगण्यात येत आहे :-

🎯 आधार क्रमांक नसल्याने नोंदणी बाकी आहे.

🎯 माहिती पूर्ण न भरल्याने डिलीट करण्यात आली आहे. 

🎯 शाळांनी विद्यार्थ्यांची माहिती भरलेली नाही.

🎯 दुसऱ्या शाळेतून बदलून आलेला असून माहिती भरलेली नाही. 

New Update - 25 October 2023

सन २०२३ २४ या वर्षामध्ये इयत्ता १ली मध्ये विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी यु-डायस प्लस प्रणालीमध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. इयत्ता 2री ते १२वी पर्यंत ज्या विद्यार्थ्यांचे प्रमोशन केले आहे त्यांच्या माहितीमध्ये काही त्रुटी असल्यास आवश्यक बदल तात्काळ करून घ्यावेत जेणे करून सर्व विद्यार्थ्यांची माहिती अचूक भरली जाईल. 

सन २०२२-२३ या वर्षामध्ये राज्यातील सुमारे ५००० शाळांमधील इयत्ता २री ते १२वी पर्यंतच्या अनेक विद्यार्थ्यांची नोंदणी विविध कारणामुळे झालेली नाही, त्या विद्यार्थ्यांची नोंदणी सन २०२३ २४ या वर्षामध्ये करण्यासाठी सुविधा मिळावी यासाठी शाळांकडून विनंती करण्यात येत आहे. याबाबत केंद्र शासनाकडे कळविले असता त्यांनी विद्यार्थी नोंदविण्याकरिता तालुका स्तरावर सुविधा उपलब्ध करून दिली आहे. गटशिक्षणाधिकारी यांनी विद्यार्थ्यांची माहिती नोंदविण्यापूर्वी मुख्याध्यापक / प्राचार्य यांचेकडून संबंधित विद्यार्थ्यांची माहिती मागील वर्षी नोंदविली नसल्याचे लेखी पत्र घ्यावे व नंतर तालुका स्तरावरून नोंदणी करण्यात यावी जेणे करून विद्यार्थ्यांची दुबार नोंदणी होणार नाही. याकरिता केंद्र शासनाने शाळांकडून लेखी स्वरूपात भरून देण्याबाबतचा नमूना फॉर्म उपलब्ध करून दिला सदर फॉर्म शाळांचे मुख्याध्यापक / प्राचार्य यांचेकडून गटशिक्षणाधिकारी यांनी भरून घ्यावा. त्यानंतरच तालुका स्तरावरून नोंदणी न झालेल्या विद्यार्थ्यांची नोंदणी करावी.


मुख्याध्यापक लेखी प्रमाणपत्र PDF - Udise portal वर विद्यार्थी नोंदवण्यासाठी माहिती लिंकवर भरताना upload करायचा फॉर्म डाउनलोड करा. - Click Here


Udise वरील अपूर्ण विद्यार्थी माहिती भरणे बाबत शासन परिपत्रक पहा. 25 October- Click Here


Udise वरील अपूर्ण विद्यार्थी माहिती भरणे बाबत शासन परिपत्रक पहा. 19 October- Click Here


Udise वरील अपूर्ण असलेल्या विद्यार्थ्यांची खालील माहिती लिंक वर भरावी. 

आता ही माहिती लिंकवर भरण्याची आवश्यकता नाही. गटशिक्षणाधिकारी यांजकडे मुख्याध्यापक यांनी माहिती भरुन द्यावी. 


इयत्ता २री ते १२वी पर्यंत विद्यार्थ्यांची नोंदणी बाकी असलेल्या शाळांची माहिती दि. २५ ऑक्टोबर, २०२३ पर्यंत सोबतच्या लिंकवर उपलब्ध करून देण्यात यावी.

School Udise number, school name, HM name, Mobile Number, HM Clarification form..... 

मुख्याध्यापक प्रमाणपत्र PDF (मराठी) - Udise portal वर विद्यार्थी नोंदवण्यासाठी माहिती लिंकवर भरताना upload करायचा फॉर्म डाउनलोड करा. - Click Here


Udise वरील अपूर्ण असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती भरण्यासाठी लिंक


Udise Plus 2023 मध्ये रक्तगट, वजन व उंची कशी अपडेट करावी? 

SDMS Udise Student Portal Link - Click Here

https://sdms.udiseplus.gov.in/api/v1/login

Udise Plus मध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांचा रक्तगट भरताना अडचण येत होती, त्यांनी सध्या Under Investigation - Result will be updated soon हा ऑप्शन निवडून माहिती पुढे भरावी. 


तसेच रक्तगट माहिती प्राप्त झाल्यास पुन्हा रक्तगट निवडून माहिती Update करून घ्यावी. 


त्यानंतर Facility Profile मध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांची उंची व वजन ही माहिती सुध्दा Update करून घ्यावी. 


ज्या मुख्याध्यापक यांनी अगोदरच काम केलेले आहे व विद्यार्थी Green दिसत आहे अश्या शाळांना सुद्धा रक्तगट, वजन व उंची हा पर्याय उपलब्ध असून त्यांनी देखील प्रत्येक विद्यार्थी Update करून घ्यावा.



Udise plus portal (SDMS) वर विद्यार्थी प्रमोशन कसे करावे? 

खालील पद्धतीने  Step by Step माहिती पहा. 


सर्वप्रथम खालील लिंक वर क्लिक करावे.

SDMS student udise Portal Link - Click Here

https://sdms.udiseplus.gov.in/api/v1/login


त्यानंतर Login page येईल. तिथे UDISE NO व  ID PASSWORD टाकावा. किंवा तालुक्याचा ID व पासवर्ड असेल तर टाकून लॉगीन करावे. 


 Login झाल्यावर Academic year 2022 - 23 व Academic year 2023-24 असे दोन पर्याय दिसतील त्यापैकी आपण Academic year 2023 - 24 ला क्लिक करावे. 


👉  त्यानंतर डाव्या कोपऱ्यात पाच आडव्या ओळी* आहेत तेथे क्लिक करून जे पर्याय दिसतात त्यामध्ये शेवटी Progression Activity हा पर्याय आहे त्याला क्लिक करायचे आहे.


 👉 तिथे progression module, import module आणि Dropbox student list असे तीन पर्याय दिसतील.

सध्या आपल्याला फक्त प्रमोशन करायचे आहे. यानंतर import modul वरुन इतर शाळेतून आलेले विद्यार्थी आपल्या शाळेत घ्यावयाचे आहेत. 


👉प्रमोशन करण्यासाठी आपल्याला progression module वर Go ला क्लिक करायचे आहे.


👉त्यानंतर मागील वर्षाची इयत्ता व तुकडी* निवडावी. व Go वर क्लिक केल्यावर आपल्या त्या वर्गातील सर्व  विद्यार्थ्यांची यादी ओपन होईल.


त्यानंतर आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्यांची माहिती भरायची आहे. 

माहिती भरत असताना त्यामध्ये Progression status मध्ये Promoted हा पर्याय निवडायचा आहे.


 Marks मध्ये आपल्याला त्याचे मागील वर्षाचे गुण टक्केवारी मध्ये टाकायचे आहेत हे गुण पूर्णांकातच टाकायचे आहेत.


 👉त्यानंतर त्याचे मागील वर्षाचे उपस्थित दिवस* भरावेत.


 👉 Schooling status मध्ये तो आपल्या शाळेत शिकत आहे की शाळा सोडून दुसऱ्या शाळेत गेला आहे हा पर्याय निवडायचा आहे.


 Class and section to be promoted मध्ये आपल्याला त्याची  तुकडी निवडायची आहे. 


👉हे सर्व झाल्यावर अपडेट वर क्लिक करायचे आहे.



SDMS Portal  वर विद्यार्थी प्रमोशन कसे करावे? 

Udise Plus 2023-24 Students Update - यु-डायस प्लस पोर्टल वर विद्यार्थी अपडेट (विद्यार्थी प्रमोशन) कसे करावे?


1. सर्वप्रथम https://udiseplus.gov.in या वेबसाईटवर जाणे

२. Student module

                ⬇️

UDISE Student Module link - Click Here


३. Login for student.... Click

                 ⬇️

४. Sign in करणे

                 ⬇️

५. २०२३-२४ click

                  ⬇️

६. Left hand side ला पाच रेषा आहेत त्यावर क्लिक करणे

                   ⬇️

७. Progression activity... Click

                   ⬇️

८. Progression module..go click

                   ⬇️

९. Select class....click

                    ⬇️

१०. Select division... Click

                    ⬇️

११. विद्यार्थ्यांची नावे येथील

                    ⬇️

१२.Progression status... Select Click... Promoted click

                    ⬇️

1३. Percentage भरणे राऊंड फिगर मध्ये

                    ⬇️

१४. No of days साधारणता 220 च्या आसपास भरणे

                    ⬇️

१५. Schooling status... योग्य पर्याय निवडणे ( इयत्ता दहावी साठी लेफ्ट स्कूल विथ टीसी या पर्यायावर क्लिक करणे)

                     ⬇️ 

१६. जर सेम स्कूल असेल तर डिव्हिजन वर क्लिक करणे

                      ⬇️

१७. Update या बटनावर क्लिक करणे.

१८. यशस्वी असा मेसेज येतो.


अशा प्रकारे आपल्या वर्गातील सर्व विद्यार्थी pramot करून घ्यावेत. जेव्हा संपूर्ण शाळेची माहिती update होईल त्यावेळी फायनलाईज या बटणावर क्लिक केल्यास हे विद्यार्थी यावर्षीचा यु डायस प्लस वर दिसतात.


SDMS portal ही प्रणाली डेटा स्टोरेज, अपडेट, मॅनिप्युलेशन, विश्लेषण आणि शेअरिंगसाठी वापरली जाते.  ही प्रणाली विद्यार्थ्यांची माहिती पाहण्याच्या आणि व्यवस्थापित करण्याच्या दृष्टीने वापरकर्ता अनुकूल आहे.  तसेच, सानुकूल शोध वैशिष्ट्ये विद्यार्थ्यांच्या रेकॉर्डचा मागोवा घेण्यात मदत करतात.


U-dise plus 2022-23 PDF डाउनलोड करा. Click Here

या प्रणालीमध्ये विविध मंडळे, शालेय व्यवस्थापन, स्वायत्त संस्था, व्यावसायिक आणि खुल्या शाळेतील विद्यार्थी इत्यादींसह शालेय शिक्षणाची विद्यार्थ्यांची माहिती समाविष्ट आहे. विद्यार्थी डेटाबेस व्यवस्थापन प्रणाली विविध राज्ये, स्वायत्त संस्था, शाळा व्यवस्थापन यांच्यासाठी एक वेगळे उदाहरण म्हणून संघटित पद्धतीने तैनात केली जाते.  गरज  या व्यवस्थापन प्रणालीमध्ये राज्ये / स्वायत्त संस्था (संघीय संस्था) मधील विद्यार्थ्याची माहिती समाविष्ट असते आणि ती राष्ट्रीय स्तरावर सातत्याने विविध शाळांसाठी एकत्रित केली जाते.  हे युनिफाइड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन फॉर एज्युकेशन प्लस (UDISE+) ला आवश्यक माहिती देखील प्रदान करते.

SDMS Full Form - Student Database Management System

Post a Comment

0 Comments

close