Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शासन निर्णय - शिक्षकेत्तर कर्मचारी - कनिष्ठ लिपीक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहायक, चतुर्थ कर्मचारी यांच्या मानधनात वाढ

राज्यातील खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वाढीव मानधन लागू करणेबाबत 07 फेब्रुवारी 2023 रोजी शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये कनिष्ठ लिपिक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहायक, चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांच्या मानधनात वाढ होणार आहे. 

राज्यातील खाजगी अनुदानित शाळांमधील नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकेत्तर कर्मचान्यांना पहिल्या तीन वर्षाकरीता मानधन तत्वावर नियुक्ती देणेबाबत शासन निर्णय दिनांक २५.११.२००५ अन्वये निर्णय घेण्यात आला होता. सदर शासन निर्णयानुसार शिक्षकेत्तर कर्मचान्यांना खालीलप्रमाणे मानधन अनुज्ञेय करण्यात आले होते. 


सदर शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या मानधनात २००५ नंतर वाढ करण्यात आलेली नाही. नियमित शिक्षकेतर कर्मचारी यांना ७ व्या वेतन आयोगानुसार वेतनात झालेली वाढ, वाढती महागाई या सर्व बाबींचा विचार करून शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मानधनात वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती, त्यानुसार पुढीलप्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.

शासन निर्णय-

राज्यातील खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रथम नियुक्तीपासून पहील्या तीन वर्षांसाठी खालीलप्रमाणे मानधन अदा करण्यास मान्यता देण्यात येत आहे:-

1) ग्रंथपाल - 14,000 रुपये

2) प्रयोगशाळा सहायक - 12,000 रुपये

3) कनिष्ठ लिपिक - 10,000 रुपये

4) चतुर्थ श्रेणी कर्मचारी - 8,000 हजार (केवळ अनुकंपा तत्वावर नियुक्त)

शिक्षकेतर कर्मचारी मानधन वाढ करणेबाबत शासन निर्णय PDF - Click Here

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय दिनांक ११.१२.२०२० नुसार चतुर्थश्रेणी कर्मचारी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्यानंतर सदर पद व्यपगत करणेबाबत निर्णय घेण्यात आला आहे. सदर शासन निर्णयानुसार शाळांना चतुर्थश्रेणी पदाऐवजी शिपाई भत्ता लागू करण्यात आला आहे. तथापि, अनुकंपा तत्वावर नियुक्त होणाऱ्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना नियमित वेतनश्रेणी लागू होत असल्याने या प्रकारे चतुर्थश्रेणी पदावर नियुक्त होणाऱ्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनाच वरील तक्त्यातील मानधन लागू असेल. तसेच जे चतुर्थश्रेणी कर्मचारी दि.११.१२.२०२० पूर्वी चतुर्थश्रेणी संवर्गात सेवक या पदावर नियुक्त करण्यात आले आहेत व ज्यांचा तीन वर्षांचा कालावधी संपुष्टात आलेला नाही, त्यांना देखील वरील मानधन अनुज्ञेय राहील. ०२. सदर मानधन दि.०१ जानेवारी २०२३ पासून लागू होईल. यासाठी येणारा खर्च मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा.


सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या मान्यतेने त्यांचा अनौपचारिक संदर्भ क्र. १०१६/व्यय-५. दि.०१.१२.२०२२ अन्वये निर्गमित करण्यात येत आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेताक २०२३०२०७१३१७४१३०२१ असा आहे.

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय 2023 या वर्षातील सर्व शासन निर्णय - Click Here

Post a Comment

0 Comments

close