🔴🔴 *न्यूज*🔴🔴
*👉🟥🟥👉बारावीचा निकाल जाहीर;*
*👉🔴🔴👉राज्याचा निकाल 91.88 टक्के;*
*👉🟥🟥👉यंदाही मुलींनी मारली बाजी;*
*👉🔴🔴👉कोकण विभाग अव्वल*
*पुणे:-बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला असून यंदाचा राज्याचा निकाल 91.88 टक्के लागला आहे. यंदा बारावीच्या निकालात कोकण विभागानं बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल 96.74 टक्के लागला आहे. तर, सर्वात कमी लातूर विभागाचा लागला आहे. लातूर विभागाचा निकाल 89.46 टक्के लागला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, यंदाही बारावीच्या निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. 94.58 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर मुलांच्या निकालाची टक्कवारी 89.51 टक्के आहे. मुलांपेक्षा मुलींचा निकाल 5.07 टक्क्यांनी अधिक आहे.*
*👉🔴🔴👉यंदा निकालाचा टक्का घसरला असून फेब्रुवारी मार्च 2024 चा निकाल 93.37 टक्के लागला होता. तर, फेब्रुवारी मार्च 2025 चा निकाल 91.88 टक्के लागला. त्यामुळे यंदा महाराष्ट्र बोर्डाच्या बारावी परीक्षेचा निकालाचा टक्का 1.49 नं घसरला आहे.*
*👉🅾️🟥🅾️👉विभागनिहाय निकाल*
⭕⭕ *कोकण :- 96.74 टक्के*
⭕⭕ *पुणे : - 91.32 टक्के*
⭕⭕ *कोल्हापूर : - 93.64 टक्के*
⭕⭕ *अमरावती :- 91.43 टक्के*
⭕⭕ *छत्रपती संभाजीनगर :- 92.24 टक्के*
⭕⭕ *नाशिक :- 91.31 टक्के*
⭕⭕ *लातूर : - 89.46 टक्के*
⭕⭕ *नागपूर :- 90.52 टक्के*
⭕⭕ *मुंबई :- 92.93 टक्के*
*👉🔴🔴👉महाराष्ट्र बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, यंदा बारावीच्या परीक्षेला पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या सर्व विभागातील मिळून १५ लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. यंदा बारावीचा निकाल ९१.८८ टक्के लागला आहे. १४ लाख ८५ हजार विद्यार्थ्यांनी नोंद केली. १४ लाख १७ हजार ९६९ बसले. १३ लाख २ हजार ८७३ विद्यार्थी पास झाले आहेत. बारावीचा निकाल जाहीर झाला असून कोकण विभाग अव्वल आहे. यंदाही मुलींची बाजी मारली आहे.यंदा बारावीची परीक्षा नियमित वेळेआधी म्हणजेच फेब्रुवारी-मार्च महिन्यात पार पडली होती. या परीक्षेनंतर तात्काळ पेपर तपासणीचे काम शिक्षकांनी केले. त्यामुळे यंदा विद्यार्थ्यांचा निकाल नियमित वेळेपेक्षा लवकर जाहीर झाला.*
*👉🔴🔴👉यंदा या परीक्षेसाठी 9 विभागीय मंडळांतून राज्यभरात 15 लाख 13 हजार 909 विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. 8 लाख 21 हजार 450 मुले,तर 6 लाख 92 हजार 424 मुली होत्या. मुंबई विभागात 3 लाख 51 हजार विद्यार्थी परीक्षेला बसले होते.*
*👉🟥🛑🟥👉3373 परीक्षा केंद्रांपैकी 124 केंद्राची होणार चौकशी*
*3373 केंद्रांपैकी 124 केंद्राची चौकशी होणार आहे. कारण या केंद्रांवर गैरप्रकार आढळला होता. या चौकशी दरम्यान त्रुटी आढळल्यास 124 परीक्षा केंद्र बोर्ड कायमस्वरूपी बंद करणार असल्याचे शिक्षण मंडळाने सांगितले आहे.*
*👉🛑🛑👉गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी ६ मे ते २० मे दरम्यान करा अर्ज...*
*ऑनलाइन निकालानंतर बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने मिळवलेल्या गुणांची गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या संकेतस्थळाद्वारे स्वतः किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करता येणार आहे.*
*👉🟥🟥👉गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी ६ मे ते २० मे या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येईल. उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी आधी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. तसेच छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.*
*👉🔴🔴👉पुरवणी परीक्षेसाठी ७ मेपासून अर्ज प्रक्रिया...*
*सर्व विषय घेऊन बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना श्रेणीसुधार योजनेअंतर्गत जुलै-ऑगस्ट २०२५ आणि फेब्रुवारी-मार्च २०२६ या लगतच्या दोनच संधी उपलब्ध राहतील. पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी ७ मेपासून मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज भरता येईल. त्याबाबतचे परिपत्रक स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येणार आहे, असे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले.*
0 Comments