Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

12th result 2026 maharashtra board | 12th HSC Result 2026 link | बारावी निकाल लिंक mahresult.nic.in | hscresult.mkcl.org

12th result 2026 maharashtra board | 12th HSC Result 2026 link | बारावी निकाल लिंक mahresult.nic.in 12वी निकाल 2026 महाराष्ट्र 12th hsc result 2026 माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने 02 मे 2026 रोजी ऑनलाईन घोषित केला जाईल. 

दहावीचा निकाल बाबत अपडेट पहा. - Click Here


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत सन 2026 मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा उपरोक्त निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर, दिनांक 02/05/2025 रोजी दुपारी 01:00 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा सन 2025 साठी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण खालील संकेतस्थळांवरून उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट) घेता येईल. अधिकृत संकेतस्थळांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. 

10वी, 12वी बोर्ड परीक्षा निकाल 2026 बाबतचे नोटिफिकेशन PDF डाउनलोड करा. - Click Here




12 वी निकाल 2026 - Click Here

12th Result 2026 - Click Here


10वी, 12वी बोर्ड परीक्षा निकाल पाहण्यासाठी विविध लिंक्स /वेबसाइट्स 


* * सर्वात आधी खाली दिलेल्या कोणत्याही एका वेबसाईटवरती क्लिक करा.

* तुमचा Roll Number टाका.

* त्यानंतर तुमच्या हॉल तिकीट वरती असलेले तुमचे आईचे नाव टाका.

* View Result या बटणावर क्लिक करा.

* तुम्ही जर माहिती बरोबर टाकली असेल तर तुमचा निकाल तुम्हाला दिसेल.

* खाली Print असा पर्याय दिसेल त्याच्यावर क्लिक करून प्रिंट काढू शकता किंवा मोबाईलमध्ये सेव करू शकता.


1. https://hscresult.mahahsscboard.in (Recommended) 


2. mahresult.nic.in ( Recommended) 


३. hscresult.mkcl.org (Recommended) 


4. www.mahahsscboard.in.


5. http://results.targetpublications.org

6.https://results.digilocker.gov.in

7.https://www.shaleyshikshan.in/2024/05/12th-HSC-Result-links.html

8. https://msbshse.co.in

9. www.mahresult.nic.in


परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल. त्याचप्रमाणे Digilocker app मध्ये Digital गुणपत्रिका संग्रहीत करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

www.mahresult.nic.in व https://msbshse.co.in या संकेतस्थळावर विदयार्थ्यांच्या निकालाशिवाय निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.

तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल. 

निकालाबाबतचे परिपत्रक डाउनलोड करा. Click Here



उत्तरपत्रिका गुणपडताळणी / छायाप्रत / पुनर्मूल्यांकन बाबत

1) उत्तरपत्रिका गुणपडताळणी / छायाप्रत /पुनर्मूल्यांकन / यासाठी 
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेसाठी http://verification.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावरून आलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येतील. 

2) इ. ११ वी तसेच उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेनंतरच्या प्रमाणपत्रासाठी http://verification.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावरून आलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येतील. 

गुणपडताळणीसाठी व उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी, दिनांक 03/०५/२०२6 ते दिनांक 17/०5/२०२6 पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पध्दतीने शुल्क Debit Card/ Credit Card/ UPI/ Net Banking याद्वारे भरता येईल.


3) विद्यार्थ्याने उत्तरपत्रिका गुणपडताळणी/छायाप्रत/पुनर्मूल्यांकन/स्थलांतर प्रमाणपत्र यासाठी करावयाच्या ऑनलाईन भरावयाची माहिती बिनचूक भरावी. अर्ज प्रणालीमध्ये SUBMIT केल्यानंतर त्यात कोणताही बदल करता येणार नाही. 

4) ऑनलाईन प्रणालीमध्ये विद्यार्थ्यास उत्तरपत्रिका गुणपडताळणी/छायाप्रत/पुनर्मूल्यांकन/स्थलांतर प्रमाणपत्र या प्रत्येक बाबीसाठी फक्त एकदाच अर्ज करता येईल. त्यामुळे अर्ज भरण्यापूर्वी विषयाची संख्या निश्चित करूनच अर्ज भरण्याची कार्यवाही करावी. कोणत्याही परिस्थितीत दुबार अर्ज स्विकारले जाणार नाहीत. 

5) उत्तरपत्रिका पुनर्मूल्यांकन करण्याकरिता अर्ज करतांना विषय शिक्षकांचा अभिप्राय PDF File स्वरूपात (File Size १५ MB पर्यंत) अपलोड करणे अनिवार्य आहे तसेच सदर अभिप्राय सुस्पष्ट असणे आवश्यक आहे. 

6) विध्यार्थ्यानी तांत्रिक बाबीसंदर्भात अडचणी/शंका असल्यास (support@msbshse.ac.in) या ई-मेल आयडी वर अथवा ०२०-२५७०५२०७,२५७०५२०८ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

7) ऑनलाईन अर्ज भरण्यासंदर्भात व्हिडीओ पाहण्यासाठी विध्यार्थ्यानी HELP या पर्यायाची निवड करावी. उत्तरपत्रिका गुणपडताळणी/छायाप्रत/पुनर्मूल्यांकन/स्थलांतर प्रमाणपत्र या चारही प्रकारासाठी स्वतंत्र व्हिडीओ देण्यात आलेले आहेत. 

8) विद्यार्थ्याने ऑनलाईन प्रकीयेद्वारे केलेल्या अर्जाची सद्यस्थिती (status) संकेतस्थळावर पाहता येईल. आपल्या अर्जावरील प्रकिया पूर्ण झाल्यानंतरच आवश्यकता भासल्यास संबंधित विभागीय मंडळाशी संपर्क साधावा.


 

🟦 बारावी परीक्षेत कोकण विभाग प्रथम तर पुणे दुसऱ्या क्रमांकावर


बारावी परीक्षेचा निकाल आज (2 मे) जाहीर करण्यात आला. राज्यात (12th Result Maharashtra Board)  पुणे विभागाचा निकाल 93. 34 टक्के लागला असून राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. बारावी निकालात पुन्हा एकदा कोकण विभागाने बाजी मारली आहे. विद्यार्थ्यांना 7 वेगवेगळ्या वेबसाईटवर आपला निकाल पाहता येणार आहे. यावर्षी राज्याचा एकूण निकाल 91.87 टक्के लागला आहे. गेल्या वर्षीच्या 93.29 च्या तुलनेत यात 1.42 टक्क्यांची घट झाली आहे. मुली मुलांपेक्षा 5.59 टक्क्यांनी जास्त उत्तीर्ण झाल्या आहेत. सर्व नऊ विभागीय मंडळांमध्ये कोकण विभाग 97.51 टक्के निकालासह प्रथम क्रमांकावर आहे. सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा लागला आहे.
                  
◼️नऊ विभागीय मंडळाचा निकाल 
पुणे 91.25 
नागपूर 88.67
छत्रपती संभाजीनगर 88.68
कोल्हापूर 89.97
अमरावती 90.92
नाशिक 90.72
लातूर 84.14
कोकण 94.14
मुंबई 90.08     
                            
◼️ शाखानिहाय निकाल 
विज्ञान शाखा: 96.44 टक्के
वाणिज्य शाखा: 92.71 टक्के
कला शाखा: 86.45 टक्के 
व्यावसायिक अभ्यासक्रम (HSC Vocational): 87.75 टक्के

◼️ निकालाची ठळक वैशिष्ट्ये

1..डिजिटल क्रांती: यावर्षी प्रथमच गुणपत्रिका (Marksheet) आणि प्रमाणपत्र (Certificate) निकाल लागल्यापासून 15 व्या दिवशी एकाच वेळी शाळांमध्ये उपलब्ध करून दिली जातील.
2..सुरक्षा उपाय: पेपर वाहतुकीसाठी GPS एनेबल डिजिटल लॉक सिस्टिमचा यशस्वी वापर करण्यात आला.
३..कॉपीमुक्त अभियान: कडक निर्बंधांमुळे यावर्षी निकालात काही प्रमाणात घट झाली आहे. परीक्षेदरम्यान 1983 गैरप्रकार आढळले असून 100 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
4..सवलतीचे गुण: खेळाडू, NCC, स्काऊट आणि गाईड विद्यार्थ्यांना शासन निर्णयानुसार सवलतीचे गुण देण्यात आले आहेत.
5..पुरवणी परीक्षा: जे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत त्यांच्यासाठी जून-जुलै 2026 मध्ये पुरवणी परीक्षा घेतली जाईल.

Post a Comment

0 Comments

close