Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Google Search

वासंतिक सुट्टी अनुभव लेखन स्पर्धा | Heritage Vacation Experience Writing Contest - YCMOU नाशिक

महाकवी वामनदादा कर्डक अध्यासन आणि मुक्त विद्यापीठ संवाद पत्रिका यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय 'वासंतिक सुट्टी अनुभव लेखन स्पर्धा' मुक्त विद्यापीठ नाशिक (यचममुवि)च्या सर्व अध्ययनार्थीसाठी आयोजनास मा. कुलगुरूंनी मान्यता दिलेली आहे.

वासंतिक सुट्टी अनुभव लेखन स्पर्धा - YCMOU नाशिक स्पर्धेचा तपशील खालीलप्रमाणे 

१) तपशील :- 

१.१) अध्ययनार्थी आपल्या परिसरातील गावातील व शहरातील विविध भूगोलिक क्षेत्रात प्रवासाला, विविध कार्यानंदानिमित्त नाविन्यपूर्ण भ्रमंती करत असतात. त्यांचे हे नाविन्य पूर्ण अनुभव लिहून कळविल्यास त्यामधून भारतभूमीतिल पहाड (डोंगर), पर्वत, नद्या, सरोवर, गावे व शहरे, त्याच बरोबर त्यांच्या आश्रयाने राहणारे पशुपक्षी व प्राणी या सर्वांचे वर्णन व त्यांच्या परिसराचा हा एक भारतभक्तीचा अत्यंत आनंददायक प्रकार आहे. ही भक्ती आपल्या अध्ययनार्थीनी शब्दबद्ध करून किमान ५०० व जास्तीत जास्त २००० शब्दात लिहून पाठवावी.

१. २) शक्य असल्यास सोबत प्रकाश चित्रे (फोटो) ही पाठवावे.

१.३) वासंतिक सुट्टी अनुभव लेखन स्पर्धेंतर्गत लेखन कोठे पाठवावे? 

लेखन पाठविण्याचा पत्ता -  प्रा. विजयकुमार पाईकराव प्रमुख वामनदादा कर्डक अध्यासन,, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक ४२२२२ या पत्त्यावर पाठवावे किंवा ई-मेल करावे. इमेलवर पाठविण्यासाठी खाली दिलेल्या मेलवर टच करुन आपले लेखन पाठवू शकता. 

Touch here 👉 sanwad@ycmou.ac.in


१.४) वासंतिक सुट्टी अनुभव लेखन पाठविण्याची अंतिम मुदत - लेखन अध्ययनार्थीनी स्वतः हस्तलेखन स्पीड पोस्ट दि. २० जून २०२३ पर्यंत पोहचेल असे पाठवावे. 

१. ५) निवडक वासंतिक सुट्टी अनुभव लेखन संवाद पत्रिका अंतर्गत प्रसिद्धी देण्यात येईल.


२) वासंतिक सुट्टी अनुभव लेखन पारितोषिके 

१) प्रथम रु.३०००/-,

२) द्वितीय रु. 200/-

३) तृतीय रु.१०००/-

४) विभागवार उत्तेजनार्थ गुणवत्ता प्रमाणपत्रे :- प्रत्येकी एक


Post a Comment

0 Comments

close