Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शालेय परिपाठ सूत्रसंचालन नमूना पहिला | शालेय परिपाठ म्हणजे काय? | सूत्र संचालन म्हणजे काय?

शाळेमध्ये दररोजचा परिपाठ सादर करताना त्या परिपाठाचे सूत्रसंचालन कसे करावे याचा नमूना पहिला पाहूया. 


शालेय परिपाठ म्हणजे काय? 

दैनंदिन शाळा सुरू होण्यापूर्वी शाळेच्या पटांगणात किंवा शाळेच्या सभागृहात शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना एकत्रित जमवून प्रार्थना, राष्ट्रगीत प्रतिज्ञा, व इतर माहिती घेतली जाते. परिपाठासाठी संपूर्ण शाळा हा एक घटक असतो. विद्यार्थ्यांच्या वर्तनाला समाज उपयोगी निर्मळ चारित्र्याचे वळण देणे आणि त्यांच्यावर योग्य संस्कार रुजविणे हे परिपाठाचे मुख्य उद्देश आहेत.

सूत्र संचालन म्हणजे काय? 

कार्यक्रमाच्या स्वरूपानुसार निवेदन करून कार्यक्रम पुढे नेण्याला सूत्रसंचालन असे म्हणतात. सूत्रसंचालकाला कार्यक्रमात व्यासपीठावरील इतर मान्यवर मंडळींप्रमाणेच महत्त्व असते.



आदर्श परिपाठ सूत्रसंचालन नमूना दुसरा - Click Here

"ढगातील  पावसाची पडते,

     धरणीशी गाठ.

अशा या सुंदर समयी,

सादर करत आहोत आम्ही परिपाठ"


१) सुविचार :-

माणुसकी खूप कमी होत चाललीय. ती फक्त जपायला शिका. इतिहास सांगतो काल सुख होत. 

विज्ञान सांगते उद्या सुख असेल. 

पण माणुसकी सांगते, जर मनात चांगल्या विचारांची साठवण असेल तर दररोज सुख असते. 

आणि म्हणून आजचा सुविचार घेऊन येत आहे.......


दररोजचा परिपाठ, सामान्यज्ञान, व्यक्तीविशेष, दिनविशेष माहितीसाठी "शालेय शिक्षण" WhatsApp Channel ला Follow करा.

▪️Channel Link 👇

https://whatsapp.com/channel/0029Va9z8Qm5kg7AsKlqON1V


२) बातम्या :- 

आपल्या शिक्षकांची  आणि आपल्या पालकांची आपल्याकडून खूप मोठी स्वप्ने असतात. आणि ही स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आजच्या आधुनिक युगातील घटना आपल्याला माहित पाहिजे म्हणून आजचे बातमी पत्र घेऊन येत आहे....


३) दिनविशेष :-

आयुष्यात उगवणारा प्रत्येक दिवस हा नवी उमेद घेऊन  येत असतो.आणि या प्रत्येक दिवसाचे विशेष महत्व आपल्याला माहित असणे गरजेचे असते. म्हणून आजच्या दिवसाचे विशेष महत्व सांगण्यासाठी आजचे दिनविशेष घेऊन येत आहे........


४) बोधकथा :-

सर्व काही मनासारखं होत नाही, पण मनासारखं झालेलं विसरू नका. आणि अशा या जीवनात वेळोवेळी कठीण प्रसंग हे येणारच पण कठीण प्रसंगी आपल्याला योग्य बोध घेऊन यशाचे शिखर गाठायचे आहे. म्हणून बोध देणारी बोधकथा घेऊन येत आहे......


५) सामान्य ज्ञान प्रश्न :-

आपल्याला खूप काही प्रश्न पडत असतात. काही सामाजिक,आर्थिक ,वैज्ञानिक, शैक्षणिक वगैरे. आम्हालाही काही प्रश्न पडलेले आहेत. बघू तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे येतात का म्हणून आजचे प्रश्न घेऊन येत आहे...


६) कोडे :-

आपलं आयुष्य हे   कोड्याप्रमाणेच असतं. थोडं कठीण,थोडं सोप तर थोडं मजेदार... आजचे कोडे हे आयुष्यासारखेच आहे. थोडे कठीण, थोडं सोप तर थोडं मजेदार म्हणून आजचे कोडे घेऊन येत आहे ......


७) संवाद (इंग्रजी) :-

आपल्याला इतर विषयाबरोबरच इंग्रजी विषयही सोपा वाटावा. म्हणून इंग्रजी विषयाचा पाया भक्कम होण्यासाठी आपल्याला इंग्रजी शब्दाबरोबर आपल्याला छोटे छोटे संवाद सादर करता आले पाहिजेत. म्हणून आजचा इंग्रजी संवाद घेऊन येत आहे.


शेवटी जाता जाता एवढंच म्हणेन


 "जीवन आहे खरी कसोटी

  मागे वळून पाहू नका.

   येईल तारावयास कोणी 

   वाट कुणाची पाहू नका..

  यश तुमच्याजवळ आहे.

जिंकल्याशिवाय राहू नका..

Post a Comment

0 Comments

close