Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

निवडणूक ड्युटी रद्द - या कर्मचाऱ्यांना मिळेल इलेक्शन ड्युटीतून सवलत. | निवडणूक ड्युटी रद्द होणेसाठी कारणे व आवश्यक पुरावे पहा.

निवडणूक ड्युटी रद्द - ही कारणे तुमच्याकडे असतील तर निवडणूक ड्युटी रद्द होईल. निवडणूक ड्युटी रद्द होणेसाठी कारणे व आवश्यक पुरावे पहा. If you have these reasons, the election duty will be cancelled.  See reasons and required evidence for cancellation of election duty.

सर्व कर्मचाऱ्यांना आता इलेक्शन ड्युटी लागली आहे परंतु पुढील कारणांमुळे आपली इलेक्शन ड्युटी रद्द होऊ शकते. त्यासाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांच्या अर्जासोबत कारण व त्यासंबंधीचा पुरावा व शिफारस जोडायची आहे. त्यानंतरच इलेक्शन ड्युटी रद्द होऊ शकते.


निवडणूक ड्युटी रदद करणेबाबत कारण व आवश्यक कागदपत्रांचा तपशील.



१ अधिकारी/कर्मचारी दिव्यांग (PDW) असले तर 

दिव्यांग (PDW) असलेबाबत सक्षम अधिकारी यांचा दाखला जोडवा.


२ अधिकारी/कर्मचारी गरोदर (Pregnant) असलेबाबत

गरोदर (Pregnant) असलेबाबत सक्षम वैद्यकीय अधिकारी यांचा दाखला जोडावा.


३ अधिकारी/कर्मचारी अत्यावश्यक सेवेत असलेबाबत

संबधित अधिकारी/कर्मचारी काम करीत असलेल्या ठिकाणचे विभाग प्रमुख यांचे सही शिक्यासह स्पष्ट शिफारस पत्र अत्यावश्यक (सेवेचे कामाचे वर्णन व कारण नमुद करावे.)


४) अधिकारी / कर्मचारी स्तनदा माता (Lactating Mother) असलेबाबत

स्तनदा माता (Lactating Mother) असलेबावत सक्षम वैद्यकीय अधिकारी यांचा दाखला जोडवा.


५) अधिकारी / कर्मचारी निलंबित असले तर.

संबधित अधिकारी/कर्मचारी काम करीत असलेल्या ठिकाणचे विभाग प्रमुख यांचे सही शिक्यासह स्पष्ट पत्र जोडावे.


६) अधिकारी / कर्मचारी फरार असलेबाबत

संबधित अधिकारी/कर्मचारी काम करीत असलेल्या ठिकाणचे विभाग प्रमुख यांचे सही शिक्यासह स्पष्ट पत्र जोडावे.


७) अधिकारी/कर्मचारी दिर्घ मुदतीचे रजेवर असलेबाबत

(दिनांकापूर्वी मान्य रजेचे प्रकरण जोडावे) अधिकारी / कर्मचारी दिनांक ३१ मे २०२४ रोजी संबधित अधिकारी/ कर्मचारी काम करीत असलेल्या ठिकाणचे विभाग प्रमुख यांचे सही शिक्यासह पत्र जोडावे. (सेवा पुस्तक नोंद जोडावी)


८) सेवानिवृत्त होत असलेबाबत

संबधित अधिकारी/कर्मचारी काम करीत असलेल्या ठिकाणचे विभाग प्रमुख यांचे सही शिक्यासह पत्र जोडावे. (सेवा पुस्तक नोंद जोडावी)


९) अधिकारी / कर्मचारी गंभीर आजारी असलेबाबत

१. गंभीर आजारी असलेबावत सक्षम वैद्यकीय अधिकारी यांचा दाखला जोडवा 

२. संबधित अधिकारी/कर्मचारी काम करीत असलेल्या ठिकाणचे विभाग प्रमुख यांचे सही शिक्यासह स्पष्ट पत्र जोडावे.


१०) अधिकारी / कर्मचारी हे देशाबाहेर खासगी कामासाठी

मान्य प्रवासी रजेवर असलेबाबत (देशांतर्गत खासगी कामासाठी प्रवासी रजेवर असल्यास अर्ज स्विकारू नयेत)

संबधित अधिकारी/कर्मचारी काम करीत असलेल्या ठिकाणचे विभाग प्रमुख यांचे सही शिक्यासह स्पष्ट पत्र जोडावे, (निवडणूक आदेश दिनांकापूर्वी मान्य रजेचे प्रकरण व व्हिसा व विमान तिकीट जोडावे)


११) अधिकारी / कर्मचारी हे शासकीय कामानिमित्त परदेशी अथवा देशांतर्गत प्रवास करीत असलेबाबत

संबंधित अधिकारी/कर्मचारी काम करीत असलेल्या ठिकाणचे विभाग प्रमुख यांचे सही शिक्यासह स्पष्ट पत्र जोडावे. प्रवास दौरा पत्र जोडावे


१२) अधिकारी / कर्मचारी यांचे मतदानकेंद्रावरील दुबार आदेश असलेबाबत

ज्या विधानसभा मतदारसंघाकडे अधिकारी / कर्मचारी कामास तयार आहेत. त्या विधानसभा मतदारसंघाकडील सहा. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आदेशावर शिफारस करावी, व मतदान केंद्रावरील नियुक्तीचा जो आदेश रदद करावयाचा आहे त्याची स्पष्ट छायाप्रत जोडावी. 


१३) अधिकारी / कर्मचारी हे निवडणूकीचे कामासाठी अन्य विधानसभा मतदारसंघाकडे कार्यरत असलेबाबत टिप याबाबत सर्व विधानसभा मतदार संघाने प्रमाणपत्र दिले आहे. 

ज्या विधानसभा मतदारसंघाकडे अधिकारी / कर्मचारी प्रत्यक्ष कामास आहेत. त्या विधानसभा मतदारसपाकडील सहा. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आदेशावर शिफारस करावी, व अधिकारी/कर्मचारी यांना जे काम दिले आहे त्याचा स्पष्ट उल्लेख करावा. मतदान केंद्रावरील नियुक्तीचा जो आदेश रद्द करावयाचा आहे त्याची स्पष्ट छायाप्रत जोडावी. 


१४) मतदान केंद्रावरील नियुक्तीबाबत तहसीलदार यांनी योग्य कागदपत्रे, आयकार्ड इत्यादीचा संदर्भ घेवून स्पष्ट शिफारस करावी.

कर्मचारी चतुर्थ श्रेणी / क्लास ४ मध्ये कार्यरत असलेबाबत (NIC कडील डेटा मध्ये कर्मचारी अन्य क्लास मध्ये असल्यास) तथापि कर्मचारी प्रत्यक्ष काम चतुर्थ श्रेणी / क्लास ४ मध्ये करीत अनलेबाबत.


१५) अधिकारी/कर्मचारी हे वरिष्ठ पदावर (नायब तहसीलदार, तहसीलदार, सहायक आयुक्त व या श्रेणीपेक्षा वरील श्रेणी परंतू महसुल, मनपा, विभागाशी संबधित अधिकारी, तसेच आय ए एस व समकक्ष) कार्यरत असलेबाबत

मतदान केंद्रावरील नियुक्तीबाबत तहसीलदार यांनी योग्य कागदपत्रे, आय कार्ड इत्यादीचा संदर्भ घेवून स्पष्ट शिफारस करावी.


१६) अधिकारी/कर्मचारी यांची जिल्हा बाहेर बदली झाली असलेबाबत..

संबधित अधिकारी/कर्मचारी काम करीत असलेल्या ठिकाणचे विभाग प्रमुख यांचे सही शिक्यासह स्पष्ट पत्र जोडावे. (बदली आदेश व कार्यमुक्ती आदेश जोडावा)


१७) अधिकारी/कर्मचारी मयत झाले तर.. 

संबधित अधिकारी/कर्मचारी काम करीत असलेल्या ठिकाणचे विभाग प्रमुख यांचे सही शिक्यासह स्पष्ट पत्र जोडावे.


१८) अधिकारी / कर्मचारी यांचा अपघात झाला असले तर. 

अपघात झाला असले बाबत सक्षम वैद्यकीय अधिकारी यांचा दाखला जोडावा. अधिकारी/कर्मचारी यांचे कुटूबीयाकडून अर्ज आला असल्यास अपघातग्रस्त अधिकारी/कर्मचारी यांचे चालू दिनांक असलेले छायाचित्र जोडावे. 


१९) अधिकारी/कर्मचारी यांचा स्वतःचा किंवा मुलाचा, मुलीचा विवाह असल्याबाबत (मतदान दिनांका पूर्वी व नंतर ३ दिवस) इतर नाते संबधातील अर्ज स्विकारू नये.

छापील लग्न पत्रिका व कार्यालय बुकींग पावती, रजिस्टर विवाह असल्यात रजिस्ट्रेशन कार्यालयाकडीन टोकन पावती सादर करावी.


वरील तक्ता अ. क्र तपासणी मी केली असून मी, श्री/श्रीमती. अधिकारी ... नुसार संबधित अधिकारी / कर्मचारी यांनी दिलेल्या अर्जातील कागदपत्राची योग्य ती तहसिलदार तथा सहा. मतदार नोंदणी विधानसभा मतदार संच शिफारस करतो/करते की, NIC मार्फत उपलब्ध करून देण्यात आलेल्या संगणकीय आज्ञावलीमध्ये खाली नमुद केलेल्या अधिकारी/कर्मचारी यांना निवडणूक २०२४ चे अंतर्गत निवडणूक कामातून वगळण्यात यावे. 

निवडणूक ड्युटी रदद करणेबाबत कारण व आवश्यक कागदपत्रांचा तपशील PDF डाउनलोड करा. Click Here


दिव्यांगांना निवडणूक कामातून सूट देणेबाबत परिपत्रक 1 - Click Here

दिव्यांगांना निवडणूक कामातून सूट देणेबाबत परिपत्रक 2 - Click Here

Post a Comment

1 Comments

  1. वरील पैकी एकही कारण नसताना (खोट्या कागद पत्रांनी व अन्य मार्गाने) खूप लोकांनी निवडणूक कार्य कर्तव्यातून स्वत:ची सुटका करुन घेतात. प्रत्येक वेळी हे चित्र पाहायला मिळते. नियम व कारणे फक्त प्रामाणिक आणि सामान्य कर्मचाऱ्यांसाठीच असतात

    ReplyDelete

close