Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

MDM Portal | PM poshan MIS Portal | MIS annual data entry | mis monthly data entry

प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत Annual Data Entry आणि MIS data entry संदर्भातील करावयाच्या कामकाजाबाबत शिक्षण संचालक यांनी आदेशित केले आहे. 



प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत पात्र शाळेतील विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ नियमितपणे देण्यात येतो. योजनेअंतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या खालील दोन विविध पोर्टलवर शाळा, तालुक्यांना माहिती भरणे आवश्यक आहे.


1) MIS Data Entry Portal - Click Here

https://pmposhan-mis.education.gov.in/mdm_production/login.aspx


2) MDM School Portal - Click Here

https://education.maharashtra.gov.in/mdm/users/login/


वरील नमूद दोन पोर्टलवर शाळा व तालुक्यांनी खालील माहिती भरणे अनिवार्य आहे. 

1) Annual Data Entry - Download PDF -1        Download PDF - 2

2) Monthly Data Entry - Download PDF

3) MDM daily attendance - Click Here

4) Health Form - Download PDF


MDM daily attendance बाबत शासन परिपत्रक पहा. Click Here


सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाकरीता योजनेस पात्र प्रत्येक शाळेची  mis पोर्टलवर Annual Data Entry बाबत माहितीचा नमुना शाळांकडून अचुकपणे भरून घेऊन दि. ३०.०४.२०२५ पर्यंत पोर्टलवर अद्यावत करावयाचा आहे. याव्यतिरिक्त प्रत्त्येक महिन्याच्या अखेरीस पोर्टलवर भरावयाचा मंथली एमआयएस डाटा संबंधित महिन्याच्या पुढील महिन्यातील दि. ०५ पर्यंत अद्यावत करावयाचा आहे. माहे एप्रिल, २०२५ करीताचा मंथली एमआयएस डाटा दि. ०५.०५.२०२५ पर्यंत पोर्टलवर अद्यावत करण्यात यावा, तद्नंतर सदरची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार नाही, याबाबत केंद्रशासनाने सूचना दिलेल्या आहेत.


सबब सर्व शिक्षणाधिकारी व लेखाधिकारी पीएमपोषण यांना निर्देशित करण्यात येते की, आपल्या जिल्ह्यातील सर्व शाळांची Annual Data Entry , monthly mis data entry त्वरीत पूर्ण करुन घ्यावी व विहित दिनांकाच्या आत सर्व ऑनलाईन कामकाज पूर्ण होईल याकरीता आवश्यक ते निर्देश सर्व तालुक्यांना निर्गमित करणेत यावेत तसेच प्रस्तुत बाबत उचित सनियंत्रण करुन विहित कालमर्यादेत सर्व कामकाज पूर्ण करुन घ्यावे.

PM Poshan website - Click Here


शालेय पोषण आहार सदर्भात एप्रिल महिन्यात करावयाची कामे

Post a Comment

0 Comments

close