प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळांनी ऑनलाईन भरलेल्या लाभार्थी विद्यार्थीची दैनंदिन उपस्थिती माहितीची पडताळणी करण्यात येणार आहे.
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत पात्र शाळेतील विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ नियमितपणे देण्यात येतो. सदर लाभाची दैनंदिन माहिती राज्यामधील प्रत्येक जिल्ह्यातील शाळांनी शासनाने सरल प्रणालीअंतर्गत विकसित केलेल्या एम.डी.एम पोर्टलवर भरणे आवश्यक आहे. शाळांनी दैनंदिन नोंदविलेली उपस्थितीची माहिती केंद्र शासनाच्या Automated Monitoring System प्रणालीवर दर्शविण्यासाठी पाठविण्यात येते. सदर प्रमाणे भरलेल्या माहितीचे केंद्र शासनाद्वारे दैनंदिन तपासणी केली जाते. तथापि, जिल्ह्यातील सर्व शाळांद्वारे सदर प्रमाणे माहिती नियमितपणे भरली जात नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे केंद्र शासनाच्या दैनंदिन AMS अहवालामध्ये राज्यातील विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित असल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत लाभ दिलेल्या विद्यार्थीची दैनंदिन माहिती विहीत कालावधीत त्याच दिवशी भरण्याबाबत सर्व मुख्याध्यापक/शाळाप्रमुखांना सर्व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी सूचना द्याव्यात असे शिक्षण संचालक यांनी पाठविलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. तसेच प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत पात्र शाळेतील विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ दिलेल्या विद्यार्थीची दैनंदिन माहिती विहीत कालावधीत भरणेबाबतचे सनियंत्रण गटशिक्षणाधिकारी /अधीक्षक शालेय पोषण आहार यांनी करावे.
प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत लाभ दिलेल्या विद्यार्थीची दैनंदिन माहिती भरणे करिता वेबसाइट लिंक
MDM Portal School Login
MDM Portal Cluster Login
MDM Portal Block Login
Enter your User ID and Password 👇
MDM Web Portal Login - Click Here
पोषण आहार दररोजची माहिती भरण्या करिता MDM App Download करा - Click Here
MDM App Download link
दररोजची माहिती भरण्याकरिता MDM App Download link - Click Here
सदरप्रमाणे माहिती विहित कालावधीत न भरल्यास जबाबदार असणाऱ्यांवर नियमाप्रमाणे कारवाई करावी.
(शरद गोसावी)
शिक्षण संचालक (प्राथमिक)
स्वयंपाकी व मदतनीस यांची कामे व कामाच्या वेळेबाबत शासन परिपत्रक पहा. - Click Here
education.maharashtra.gov.in mdm login
MDM Maharashtra Gov login
MDM daily attendance
विद्यार्थी दैनंदिन उपस्थिती
शाळांमध्ये परसबाग निर्मिती करणेबाबत शासन निर्णय/परिपत्रक डाउनलोड करा. - Click Here
शालेय परसबाग अंतर्गत मायक्रोग्रीन्स भाजीपाला लागवड करणेबाबत शासन निर्णय - Click Here
0 Comments