मायक्रोग्रीन्स म्हणजे मोड आलेल्या धान्याच्या पुढची आणि छोट्या रोपांच्याही अलिकडली अवस्था. धान्य रुजताना अंकुरीत झाल्यावर येणारे छोटेसे रोप. मायक्रो म्हणजे अगदी लहान व ग्रीन्स अर्थात हिरव्या किंवा इतर रंगाच्या पालेभाज्या किंवा अंकुरीत बियांपासून निर्माण झालेले कोवळे रोप.. मायक्रोग्रीन्स याला मराठीत अल्पकालीन भाजीपाला असे म्हणतात. या लेखात आपण मायक्रोग्रीन्समधील पोषकतत्वे ही अभ्यासणार आहोत.
अल्पकालीन भाजीपाला (मायक्रोग्रीन्स) म्हणजे मोड आलेल्या धान्याच्या पुढची आणि छोट्या रोपांच्याही अलिकडली अवस्था (रुजलेल्या बियाणाला जी पहिली दोन पाने येतात ती आणि त्यानंतरची जास्तीत जास्त दोन पाने आलेल्या अवस्थेला जो कोंब असतो.)
मायक्रोग्रीन्स - बियांपासून रुजवलेली साधारण एक ते तीन इंच उंचीची हिरवी किंवा रंगीत कोवळी भाजी म्हणजे मायक्रोग्रीन्स.
मायक्रोग्रीन्समधील पोषकतत्वे :-
- मायक्रोग्रीन्समध्ये पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात. त्यांच्यातील पोषक घटक अर्क स्वरुपात असतात.
- पूर्णपणे वाढलेल्या भाज्यांच्या तुलनेत सूक्ष्म जीवनसत्वे, क्षार व अँटिऑक्सिडेंट्सची पातळी अधिक असते.
- प्रत्येक मायक्रोग्रीनमधील पोषक घटकांमध्ये थोडाफार फरक असला तरी बहुतेक प्रकारांमध्ये पोटॅशिअम, लोह, झिंक, मॅग्नेशिअम आणि तांबे हे घटक मुबलक प्रमाणात असतात.
- पूर्ण वाढ झालेल्या भाज्यांच्या तुलनेत मायक्रोग्रीन्समध्ये चाळीस पट जास्त पोषणमूल्य असतात.
- वजन कमी करण्यासाठी उपयुक्त
- कोलेस्टेरॉल कमी होते.
मायक्रोग्रीन्स पालेभाज्या कोणत्या?
चवळी
वाटाणा
मेथी
गव्हांकुर
पालक
लसूण पात
मोहरी
बीट
ब्रोकोली
गाजर
मायक्रोग्रीन्स व अंकुरित धान्य फरक
मायक्रोग्रीन्स जमिनीत उगवतात व वाढतात तर अंकुरीत धान्य पाण्यात भिजवून मग त्यांना मोड काढले जातात.
मायक्रोग्रीन्सची वाढ होण्यासाठी भरपूर सूर्यप्रकाश आणि पाणी लागते तर अंकुरण प्रक्रियेसाठी उजेडाची आवश्यकता नसते.
मायक्रोग्रीन्स वाढण्यासाठी एक ते तीन आठवडे लागतात तर धान्य अंकुरित होण्याची प्रक्रिया लवकर होते.
मायक्रोग्रीन्सची पाने व देठ खाण्यासाठी वापरतात तर अंकुरीत धान्यांच्या बिया.
अंकुरित धान्याच्या तुलनेत मायक्रोग्रीन्स अधिक पौष्टिक आणि सुरक्षित आहेत.
0 Comments