Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मोफत पाठ्यपुस्तक वाटप 2024-25 सूचना / पडताळा सूची / शासन परिपत्रक | पाठ्यपुस्तके PDF डाउनलोड लिंक (इ.1ली ते इ.12वी)

शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळा व अनुदानित शाळामधील इ. १ली ते इ. ८वी मधील सर्व माध्यमात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण होणार आहे. याबाबतच्या सूचना लावण्याचे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे.



समग्र शिक्षा अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तक योजना उद्देश

इयत्ता १ ली ते इयत्ता ८ वी मध्ये शिकणारे कोणतेही बालक पुस्तकापासून वंचित राहू नये आणि त्याला पाठ्यपुस्तकाअभावी शिक्षणात अडचण येऊ नये, शाळेतील सर्व दाखलपात्र मुलांची १००% उपस्थिती टिकविणे, गळतीचे प्रमाण शून्यावर आणणे यासाठी समग्र शिक्षा अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तके ही योजना सुरु केली आहे. 


इयत्ता १ ली ते इयत्ता ८ वी च्या शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि खाजगी अनुदानित शाळांमध्ये शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके पुरविण्यात येणार आहेत.


मोफत पाठ्यपुस्तके योजना सन २०२४-२५ करिता विभागीय पाठ्यपुस्तके भांडार ते तालुकास्तर या टप्प्यातील पाठ्यपुस्तकांची वाहतूक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई या कार्यालयाकडून निश्चित केलेल्या वाहतूकदाराकडून करण्यात येणार आहे. तसेच तालुका ते शाळास्तरापर्यंतची पाठ्यपुस्तके वाहतूक संबंधित जिल्हा / तालुका स्तरावरून करण्यात येणार आहे.


पाठ्यपुस्तके वितरणाची तारीख संबंधित क्षेत्रातील पंचायत समितीतील सर्व संबंधित शाळांतील मुख्याध्यापकांना कळविण्यात येईल. शाळा उघडण्यापूर्वी सर्व साधारणपणे सात दिवस आधी ही पाठ्यपुस्तके संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांच्या ताब्यात देण्यात येतील. गावातील पदाधिकारी / अधिकारी / पालक यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके समारंभपूर्वक वितरण, ज्या दिवशी शाळा उघडेल त्याच दिवशी करण्यात येईल.


मोफत गणवेश, बूट व सॉक्स अंमलबजावणी 2024-25 बाबत सूचना वाचा - Click Here


इ. 1ली ते इ. 12वी पाठ्यपुस्तके pdf ऑनलाईन डाउनलोड करण. - Click Here



मोफत पाठ्यपुस्तक पुरवठा 2024-25 पडताळा सूची

१) शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळा व अनुदानित शाळामधील इ. १ ली ते इ. ८ वी मधील सर्व माध्यमात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण होणार आहे. याबाबतच्या सूचना लावण्याचे परिपत्रक निर्गमित करणे.

२) पाठ्यपुस्तकांसाठी शाळानिहाय, माध्यमनिहाय, आणि इयत्तानिहाय माहिती गोळा करणे.

३) प्रपत्रांमध्ये माहिती योग्यरीतीने भरणे, त्याची जिल्हा परिषद / महानगरपालिकेच्या जवळ असलेल्या माहितीशी पडताळणी करणे.

४) पाठ्यपुस्तक वितरणास पंचायत समिती / वार्ड स्तरावर शाळा निहाय, इयत्तानिहाय आणि माध्यमनिहाय माहिती तयार ठेवणे. 

५) विद्यार्थ्यांच्या याद्या शाळानिहाय त्या त्या शाळेत तयार ठेवणे. एक प्रत पंचायत समिती / वार्ड स्तरावर मागवून घेणे.

६) पाठ्यपुस्तक वाटपाचे वेळापत्रक निश्चित करणे व त्यासाठी बैठकीचे आयोजन करणे.

७) पंचायत समितीचा / बाडोचा पाठ्यपुस्तके वाटण्याचा कार्यक्रम निश्चित करणे. 

८) पाठ्यपुस्तके वाटण्याच्या वेळापत्रकाप्रमाणे पंचायत समिती वार्डोस पाठ्यपुस्तकाचे वाटप करणे. 

९) पाठ्यपुस्तके उत्तरविण्यासाठी जागा निश्चित करणे.

१०) पाठ्यपुस्तकांची संख्या विचारात घेता पाठ्यपुस्तके थेट पंचायत समिती स्तरावर निश्चित केलेल्या जागी उतरवून घेणे,

११) पाठ्यपुस्तकांची, पंचायत समितीनिहाय / वार्डनिहाय विभागणी करणे.

१२) पंचायत समित्यांनी शाळानिहाय, इयत्तानिहाय, माध्यमनिहाय, पाठ्यपुस्तकांचे वर्गीकरण करणे आणि त्यांच्या थप्या तयार करणे.

१३) पाठ्यपुस्तके वाटपासाठी गरजेप्रमाणे आवश्यक तेवढे वाटप कक्ष तयार करणे.

१४) पाठ्यपुस्तक वाटपाचे रजिस्टर तयार करणे.

१५० पत्रकार परिषद आयोजित करणे, त्यासाठी प्रेस नोट तयार करणे, पत्रकारांना पत्रे पाठविणे, मुख्याध्यापक किवा त्यांच्या प्रतिनिधीस पाठ्यपुस्तकांचे वाटप करणे, पाठ्यपुस्तके मिळाल्याबाबत स्वाक्षरी घेणे,

१६) मुख्याध्यापकांनी समारंभपूर्वक पाठ्यपुस्तकांचे वाटप करणे.

१७) शाळा सुरु झाल्यावर सात दिवसांनी केंद्र प्रमुख / शिक्षण विस्तार अधिकारी यांनी पाठ्यपुस्तक वाटपाचा आढावा घेणे.

१८) कमी अधिक पाठ्यपुस्तके असल्यास त्याचे समायोजन करून पुर्नवाटप करणे,

१९) शाळा उघडल्यापासून पंधरा दिवसात पाठ्यपुस्तक वाटपाचा अहवाल घेणे व संकलित करणे,

२०) संकलित अहवाल या कार्यालयास पाठविणे.

२१) पाठ्यपुस्तक मंडळाकडून प्राप्त देयकांची पडताळणी करून त्यावर प्रतिस्वाक्षरी करणे, त्याची एक प्रत जिल्हास्तरावर ठेवणे व मूळ प्रत्त मंडळाकडे परत करणे,

Free Text Book Distribution 2024-25 Government circular - Download

मोफत पाठ्यपुस्तक वाटप 2024-25 सूचना / पडताळा सूची / शासन परिपत्रक - Download

Post a Comment

0 Comments

close