Engineering Diploma Admission 2025 : दहावीनंतरच्या इंजिनिअरिंग डिप्लोमा अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला लवकरच सुरुवात होणार आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाच्यावतीने या प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी जाहीर करण्यात आली आहे. लवकरच, या प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील सर्व महत्त्वाचा तपशील अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येतील.
Engineering Diploma Admission 2025 : दहावीनंतर तंत्रज्ञान विश्वातील शिक्षणासाठी डिप्लोमा हा एक उत्तम पर्याय विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असती. त्यामुळे इंजिनीरिंग डिप्लोमा प्रवेशाला विद्यार्थ्यांचाही उत्तम प्रतिसाद मिळतो. दहावी-बारावीचे निकाल लागल्यानंतर डिप्लोमा आणि डिग्रीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होते. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असल्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची लगबग सुरू होते. हेच लक्षात घेऊन तंत्रशिक्षण संचालनालयाने नवीन शैक्षणिक अधिपत्याखालील प्रथम वर्ष पदवीका (First Year Engineering Diploma) व थेट वर्षांमध्ये अभियांत्रिकी पदविका (Direct Second Year Engineering Diploma) प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दहावीच्या निकालाची वाट न पाहता प्रवेशासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी जाहीर केली आहे. यामुळे कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यास विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळणार आहे.
Engineering Diploma Various Courses
तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष पोस्ट एस. एस.सी. अभियांत्रिकी/ तंत्रशास्त्र,
प्रथम वर्ष वास्तुकला, प्रथम वर्ष पोस्ट एच.एस.सी. औषधनिर्माणशास्त्र, एचएमसीटी, सरफेस कोटींग टेक्नॉलॉजी पदविका अभ्यासक्रम (Diploma) तसेच
प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी / तंत्रशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरींग टेक्नॉलॉजी पदवी, प्रथम वर्ष फार्म.डी., वास्तुशास्र, बी. प्लॅनिंग, बी. डिझाइन, बीबीए / बीएमएस / बीबीएम, बीसीए हे पदवी अभ्यासक्रम (Under Graduate) आणि प्रथम वर्ष एम.ई/एम.टेक., एम. फार्म. फार्म.डी. (PostBaccalaureate), एम. आर्किटेक्चर, एम. प्लॅनिंग, एम. एचएमसीटी, एमबीए/एमएमएस, एमसीए हे पदव्युत्तर पदवी (Post Graduate) त्याचप्रमाणे
प्रथम वर्ष एम.ई./एम.टेक., एम. प्लॅनिंग एम. एचएमसीटी, एमबीए /एमएमएस, एमसीए हे एकात्मिक पदवी अभ्यासक्रम (Integrated) व ज्या अभ्यासक्रमांत थेट व्दित्तीय वर्षात प्रवेश दिला जातो, त्त्या अभ्यासक्रमांसाठीच्या कार्यरत व्यावसायिकांची (Working Professionais) स्वतंत्र तुकडी अशा अभ्यासक्रमांचे प्रवेश केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेमधून करण्यात येतात.
तंत्रशिक्षण संचालनालयाने नवीन शैक्षणिक अधिपत्याखालील प्रथम वर्ष पदवीका (First Year Engineering Diploma) व थेट वर्षांमध्ये अभियांत्रिकी पदविका (Direct Second Year Engineering Diploma) प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष २०२5-२6 अभियांत्रिकी पदविका (पॉलिटेक्निक) प्रवेशासाठी कागदपत्रांची यादी तंत्रशिक्षण संचालनालयाच्यावतीने जाहीर तंत्रशिक्षण करण्यात आली आहे.
पॉलिटेक्निक प्रवेशासंदर्भातील अधिक माहिती संचालनालयाच्या संकेत स्थळावर देण्यात आली आहे. शिवाय, डिप्लोमा प्रवेशासंदर्भातील अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी संकेतस्थळाला भेट देणे आवश्यक आहे. तसेच, प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष पदविका अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेसाठी राज्यात विविध ठिकाणच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये समुपदेशन कक्ष कार्यरत करण्यात येणार आहेत.
First Year Engineering Diploma
Second Year Engineering Diploma
अभ्यासक्रमाचे प्रवेश लवकरच केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे सुरू करण्यात येणार आहेत. यासाठी लागणाऱ्या सर्व प्रमाणपत्रांची यादी संचालनालयाकडून देण्यात आली असून, ही कागदपत्रे तयार ठेवून विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
Engineering Diploma Admission : पॉलिटेक्निक प्रवेशासाठी अधिकृत वेबसाइट लिंक - Click Here
https://dte.maharashtra.gov.in/home/
पॉलिटेक्निक प्रवेशासाठी कागदपत्रांची यादी जाहीर
पॉलिटेक्निक डिप्लोमा प्रवेशाकरता खालील प्रवेश प्रमाणपत्र जवळ असणे आवश्यक आहे :
- जात प्रमाणपत्र
- अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती व्यतिरिक्त उर्वरित सर्व मागासवर्गीय उमेदवारांसाठी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र (३१ मार्च २०२6 पर्यंत वैध)
- राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गासाठी EWS प्रमाणपत्र
- दिव्यांगबाबतचे प्रमाणपत्र आवश्यकतेनुसार
- अल्पसंख्यांकासाठी प्रवर्गासाठीचे प्रमाणपत्र
- आधार क्रमांक व संलग्न बँक खाते
- वर्किंग प्रोफेशनल्सकरीता अनुभव प्रमाणपत्र व ना-हरकत प्रमाणपत्र
0 Comments