केंद्रप्रमुख पदभरती करणे संदर्भात विभागीय स्पर्धा परीक्षा व पदोन्नती द्वारे केंद्रप्रमुख पदभरती करणे संदर्भात 27/09/2023 च्या शासन निर्णयानुसार विहित पात्रता निश्चित करण्यात आलेली आहे.
शासन निर्णय दि.२७/९/२०२३ नुसार आपणांस कळविण्यात येते की, केंद्रप्रमुख या पदावरील पदोन्नतीकरिता, जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) या पदावर किमान सहा वर्ष अखंडित सेवा पूर्ण करणा-या उमेदवारांमधून सेवाजेष्ठता व गुणवत्ता याआधारे पात्र उमेदवारांची पदोन्नतीने नेमणूक करण्यात येईल, अशी संदर्भीय शासन निर्णय दि.२७/९/२०२३ अन्वये तरतूद विहित करण्यात आलेली आहे.
यास्तव केंद्रप्रमुख पदावर पदोन्नतीकरिता सेवाजेष्ठता यादी तयार करताना सहायक शिक्षकाची प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) या पदावर झालेली नियुक्ती दिनांक विचारात घेणे आवश्यक आहे. पंरतु याअनुषंगाने जिल्हा परिषद स्तरावर कार्यवाही होत नसलेबाबत संचालनालय स्तरावर तक्रारी प्राप्त होत आहेत. तरी याबाबत शासन निर्णय दि.२७/९/२०२३ मधील तरतुदीनुसार तात्काळ कार्यवाही करण्यात यावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संचालनालयास सादर करावा.
0 Comments