Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

केंद्रप्रमुख भरती 2023 सर्व शासन निर्णय, परीक्षा अभ्यासक्रम, पात्रता, परीक्षा स्वरूप, परीक्षेचे माध्यम, गुण विभागणी संपूर्ण माहिती | kendra pramukh bharti 2023

केंद्रप्रमुखांची पदे स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्याबाबत सुधारित कार्यपध्दती विहीत करण्याबाबत 01 डिसेंबर 2012 रोजी निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार केंद्रप्रमुख पदे सरळसेवा भरतीसाठी आवश्यक पात्रता, अभ्यासक्रम, परीक्षा स्वरूप, माध्यम याबाबतची तपशीलवार माहिती येथे देण्यात आली आहे.


केंद्रप्रमुख विभागीय स्पर्धा परीक्षा 2023

महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदेमधील प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा निवडीद्वारे नियुक्ती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत माहे डिसेंबर २०२३ च्या शेवटच्या आठवडयामध्ये केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ चे महाराष्ट्र राज्यातील विविध केंद्रावर आयोजित करण्यात येत आहे.

ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी वेबलिंक - Click Here

केंद्रप्रमुख भरती घटक निहाय Video मार्गदर्शन / Notes - Click Here

केंद्रप्रमुख भरती Online Test Series - Click Here


प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या पदांचा तपशील व अभ्यासक्रम, पात्रता, परीक्षा स्वरुप, वेबसाईट, सर्व तपशील PDF डाउनलोड करा. - Click Here

केंद्रप्रमुख भरती 2023 विभागीय स्पर्धा परीक्षा डिसेंबर 2023 मध्ये आयोजित करणेबाबत शासन परिपत्रक डाउनलोड करा. - Click Here




केंद्रप्रमुख भरती शासन निर्णय PDF ( 16 फेब्रुवारी 2018) - Click Here


केंद्रप्रमुखाची ५० टक्के पदे पदोन्नतीने व ५० टक्के पदे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्याबाबत 01 डिसेंबर 2022 रोजी शासन निर्णय घेण्यात आला आहे. 

केंद्रप्रमुख पदभरती पदोन्नतीने करणेबाबत संचालक यांचे मार्गदर्शन पत्र 24 मे 2023 - Click Here

केंद्रप्रमुखांच्या पदभरतीच्या अनुषंगाने मा. उच्च न्यायालयाने दिलेले निर्देश लक्षात घेऊन केंद्रप्रमुख पदभरती करतांना शालेय शिक्षण व क्रिडा विभागाच्या दि. ०१.१२.२०२२ च्या शासन निर्णयानुसार केंद्र प्रमुखांच्या पदभरतीचे प्रमाण ५०% पदोन्नतीने व ५०% मर्यादीत स्पर्धा परिक्षेप्रमाणे करण्यात यावी. मात्र ग्रामविकास विभागातील दि. १०.०६.२०१४ ची अधिसुचना अद्याप रद्द वा अधिक्रमित केली नसल्यामुळे केंद्र प्रमुख पदभरती करतांना विषय निहाय विभागणी ही सदर अधिसुचनेमध्ये विहित केल्याप्रमाणे करण्यात यावी.

आपल्या संदर्भाधिन पत्रातील मुददा क्र. ५ च्या अनुषंगाने स्पष्ट करण्यात येते की, शासन अधिसुचना दि. १० जून २०१४ मध्ये ज्यांनी, जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) या पदावर तीन वर्षांपेक्षा कमी नाही इतकी अखंड सेवा पूर्ण केली असेल अशा उमेदवारांमधून सेवाजेष्ठतेच्या आधारे पात्र उमेदवारांच्या पदोन्नतीने नेमणूक करण्यात येतील असे नमुद आहे. त्यामुळे विशिष्ट विषयात प्रशिक्षित शिक्षक म्हणुन सेवेचा उल्लेख अधिसूचनेत नाही त्यामुळे प्रशिक्षित पदवीधर शिक्षक म्हणुन कोणत्याही विषयात तीन वर्षे अखंड सेवा केल्यानंतर सध्या जो पदवीचा विषय आहे त्या विषयात संबंधित प्रशिक्षित पदवीधर शिक्षकांस केंद्र प्रमुख म्हणुन पदोन्नती दयावी.

केंद्रप्रमुख पदभरती पदोन्नतीने करणेबाबत संचालक यांचे मार्गदर्शन पत्र 08 मे 2023 - Click Here

केंद्रप्रमुख भरती पदोन्नतीने करताना जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर पदावर किमान तीन वर्षे सेवा झालेल्या शिक्षकांना संधी देण्यात येईल. 



केंद्रप्रमुखांची रिक्त पदे सरळसेवेने व मर्यादित विभागीय परीक्षेद्वारे भरण्याकरीता स्पर्धा परीक्षेचे आयोजन करणेबाबत परिपत्रक डाउनलोड करा. - Click Here


केंद्रप्रमुख भरती 2022 शासन निर्णय, परीक्षा अभ्यासक्रम, पात्रता, परीक्षा स्वरूप, परीक्षेचे माध्यम, गुण विभागणी संपूर्ण माहिती


👇केंद्रप्रमुख भरती शासन निर्णय- 01 डिसेंबर 2022 - Click Here


01 केंद्र प्रमुख पदभरती संदर्भात यापूर्वी पारीत करण्यात आलेला शासन निर्णय दि १६.०२.२०१८ अधिक्रमित करण्यात येत आहे व याबाबतीत तद्नुषंगिक शासन निर्णय / शुध्दीपत्रक अधिक्रमित करण्यात येत आहेत.


०२. केंद्र प्रमुखाची सद्यस्थितीत रिक्त असलेली पदे तसेच सेवानिवृत्ती, राजीनामा, बडतर्फी इत्यादी कारणांनी यापुढे रिक्त होणाऱ्या पदावर ती पदे जसजशी रिक्त होतील, तसतशी ५० टक्के पदे पदोन्नतीने व ५० टक्के पदे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे त्या त्या कोट्याच्या मर्यादित भरण्यास मान्यता देण्यात येत आहे.

०३. सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी त्यांच्या जिल्हयातील उर्दू शाळांची संख्या विचारात घेऊन केंद्रप्रमुखाची पदे निश्चित करावीत.

केंद्र प्रमुख पद निर्मिती इतिहास पहा - Click Here


०४. केंद्रप्रमुखांची रिक्त पदे विभागीय मर्यादीत स्पर्धा परीक्षा तसेच पदोन्नतीने भरण्याबाबत खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी:-

४.१ विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा:- विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येईल.

४.२ परीक्षेचे आयोजन व स्वरुपः- विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षाद्वारे केंद्रप्रमुखाच्या निवडीसाठी अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परीक्षेचे आयोजन शासन निश्चित करेल, अशा परीक्षा यंत्रणेमार्फत आयोजित करण्यात येईल. सदर परीक्षा यंत्रणेकडून राज्यातील सर्व जिल्ह्यामधील परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात येतील. या चाचणी परीक्षेचे आयोजन व स्वरुप खालीलप्रमाणे राहील:-

4.2.१. अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परीक्षा घेण्यात येईल. अर्थात विषयनिहाय चाचणी घेतली जाणार नाही. सदर परीक्षा आवश्यकतेनुसार ऑनलाईन / ऑफलाईन पध्दतीने घेण्यात येईल. सदर परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची असेल. 

4.2.२. ऑनलाईन परीक्षा घेताना समान काठिण्य पातळीच्या किमान १० प्रश्नपत्रिका संच सदर परीक्षा यंत्रणा तयार ठेवेल. परीक्षार्थ्यांना समान काठिण्यपातळीचे विविध प्रश्नपत्रिका देण्यात येतील. 

4.2.३. उपलब्ध रिक्त पदे विचारात घेऊन सदर परीक्षा घेण्यात येईल.

4.2.४. परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक परीक्षा परीषदेमार्फत जाहीर करण्यात येईल.


४.३ परीक्षेचे माध्यम व अभ्यासक्रम:- परीक्षेचे माध्यम मराठी व इंग्रजी असेल. परीक्षेचे माध्यम गुणवत्तेसाठी विचारात घेतले जाणार नाही. सदर परीक्षा एकूण २०० गुणांची राहील व त्यासाठी दोन तासाचा कालावधी राहील. परीक्षेसाठी पुढीलप्रमाणे घटक व गुणांकन राहील.





अनुक्रमांक २ मधील उपघटकांचे स्वरुप :


उपघटक १ : भारतीय राज्यघटनेतील शिक्षण विषयक तरतूदी, बालकांशी संबंधित सर्व कायदे.  योजना व अद्ययावत शासन निर्णय-

अ) भारतीय राज्यघटनेतील शिक्षण विषयक तरतूदींची (कलमांची) माहिती (अद्ययावत 

ब) बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ व सदर दुरुस्त्यांसह) अधिनियमातील महाराष्ट्र राज्य नियमावली, २०११ (अद्ययावत दुरुस्त्यासह) विश्लेषण, बलस्थाने व अडचणी 

क) बाल हक्क संरक्षण कायदा, २००५- बाल संरक्षण आणि सुरक्षा, भय आणि चिंता

(ड) विद्यार्थी लाभाच्या विविध योजना (केंद्र व राज्य शासन) व शिष्यवृत्ती

(इ) विशेष गरजा असणाऱ्या व अल्पसंख्याक विद्यार्थ्यासाठी विविध योजना


उपघटक २ : शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख संस्था/ संघटन व त्यांचे कार्य UNICEF, NCERT, NUEPA, NCTE, CCRT, TISS, TIFR, Homi Bhabha Center of Science Education, RTE, EFLU, MPSP, SCERT,M, MIEPA, SISI, DIET, राज्य आंग्लभाषा इ.


उपघटक ३ : माहिती तंत्रज्ञानाचा वापर (प्रात्यक्षिक)

अ) इंटरनेटचा प्रभावी वापर

ब) शाळास्तरावर विविध माहिती भरणे

क) शासनाच्या उपलब्ध Portal वरील माहिती वापरासंबंधीचे ज्ञान (SARAL, U-DISE +)

ड) संगणक वापराविषयीचे ज्ञान

(इ) माहितीचे विश्लेषण

फ) शाळास्तरावरील अंदाजपत्रक व हिशोब


उपघटक ४ : अभ्यासक्रम व मूल्यमापन, अध्ययन-अध्यापन पध्दती

अ) पूर्व प्राथमिक ते बारावी पर्यंतचा अभ्यासक्रम

ब) अध्ययन निष्पत्तीतील उणीवा

क) सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन व पूरक मार्गदर्शन

ड) प्रश्न निर्मिती ( स्वाध्याय) कौशल्य : ASER, NAS, PISA

इ) प्रगत अध्ययन-अध्यापन शाख फ) निकालासंबंधीची कामे


उपघटक ५ : माहितीचे विश्लेषण मूल्यमापन 

अ) प्राप्त माहितीचे विश्लेषण

बा शासनाच्या विविध पोर्टलवरील माहितीचे विश्लेषण करता येणे 

क) ASER, NAS, PSM चाचण्या, शाळांचे निकाल या माहितीचे विश्लेषण करता येणे.

ड) संप्रेषण कौशल्य समाज संपर्काची विविध साधने उपघटक 


उपघटक ६ : विषयनिहाय आशयज्ञान आणि सामान्यज्ञान, इंग्रजी विषयाचे आशयज्ञान

अ मराठी, गणित, विज्ञान, इंग्रजी, भूगोल, इतिहास माध्यमिक स्तरापर्यंत विषयांचे ज्ञान 

ब) चालू घडामोडी विशेषत: शैक्षणिक बाबी

क) क्रीडा विषयक घडामोडी.


५. शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता :-

शैक्षणिक अहर्ता बाबत शासन निर्णय शुद्धीपत्रक 9 मार्च 2023 डाउनलोड करा. Click Here


केंद्रप्रमुख भरती शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता बाबतचा नवीन शासन निर्णय 27 सप्टेंबर 2023 पहा. - Click Here


5.1 विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे निवडीसाठी ज्यांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.ए./बी.कॉम / बी.एस्सी. ही पदवी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि ज्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) या पदावर तीन वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमीत सेवा ( शिक्षण सेवक कालावधी वगळून) पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे.

किंवा

प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या पदावर नियुक्त शिक्षकांनी ज्या दिनांकास वरीलप्रमाणे पदवी धारण केलेली आहे, त्या दिनांकापासून तीन वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमीत सेवा (शिक्षण सेवक कालावधी वगळून) पूर्ण करणे आवश्यक आहे. 


५.२ वयोमर्यादा :- मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत कमाल वयोमर्यादा ५० वर्ष राहील. 

५.३ स्व जिल्हा :- विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेसाठी उमेदवार ज्या जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असेल त्याच जिल्ह्यासाठी पात्र राहतील.


०६. पदोन्नतीने नियुक्तीसाठी पात्रता :- ज्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) या पदावर तीन वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमित सेवा ( शिक्षण सेवक कालावधी वगळून) पूर्ण केली असेल अशा उमेदवारामधून सेवाज्येष्ठता व गुणवत्ता या आधारे पात्र उमेदवारांच्या पदोन्नतीने नेमणूक करण्यात येईल. 

शैक्षणिक अहर्ता बाबत शासन निर्णय शुद्धीपत्रक 9 मार्च 2023 डाउनलोड करा. Click Here


०७. कागदपत्रांची पडताळणी :- केंद्रप्रमुख पदी विभागीय मर्यादित परीक्षेद्वारे निवड झालेल्या उमेदवारांच्या शैक्षणिक व व्यावसायिक प्रमाणपत्राची पडताळणी संकेतस्थळावर उमेदवारांची सूची जाहीर झाल्यानंतर १५ दिवसाच्या मुदतीत खालील समितीमार्फत करण्यात येईल. संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली खालीलप्रमाणे समिती राहील:- 

१. संबंधित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी - अध्यक्ष

२. समाजकल्याण अधिकारी - सदस्य

३. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) - सदस्य

४. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) - सदस्य सचिव


कागदपत्रांच्या पडताळणीस उपस्थित असलेल्या उमेदवारांच्या उपस्थितीत नोंद ठेवणे आवश्यक राहील. उमेदवारांची मुळ कागदपत्रे तपासल्याची नोंद घेऊन उमेदवारांकडून प्रमाणपत्राच्या प्रतीचा एक संच घ्यावा व त्यावर कागदपत्राच्या पडताळणीचा दिनांक व नोंद क्रमांक नोंदविण्यात यावा. मूळ प्रमाणपत्रे उमेदवारास तात्काळ परत करण्यात यावीत. 

०८. कागदपत्र पडताळणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. 

०९. शासन निर्णय, दिनांक ०२.०२.२०१० ते दि.१०.०६.२०१४ या कालावधीत अभावितपणे नियुक्त केंद्रप्रमुखांच्या सेवा दिनांक १६.०२.२०१८ रोजीच्या शासन निर्णयान्वये नियमित करण्यात आल्या आहेत. सदर आदेश कायम राहतील.

१०. तक्रारीचे निवारण :- उमेदवाराच्या तक्रारीचे निराकरण करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची राहील. उमेदवाराने याबाबत लेखी तक्रार संबंधित प्राधिकान्यांकडे करावी. प्राप्त झालेल्या तक्रारीचे निवारण संबंधित प्राधिकाऱ्यांनी १५ दिवसांत करणे आवश्यक राहील. याबाबत शिक्षण संचालक (प्राथमिक) हे अपिलीय प्राधिकारी राहतील.


११. केंद्र प्रमुखांची मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे पदे भरण्याची संपूर्ण प्रक्रिया शिक्षण संचालक (प्राथमिक) यांच्या नियंत्रणाखाली करण्यात येईल. यासंदर्भात संचालनालय स्तरावरून वेळोवेळी सविस्तर सूचना निर्गमित करण्यात येतील. उपरोक्तप्रमाणे केंद्रप्रमुखांच्या मंजूर पदाच्या ५० टक्के पदे पदोन्नतीने व ५० टक्के पदे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे या प्रमाणात राहतील. सद्यस्थितीत पदोन्नतीच्या कोट्यातील पदे ५० टक्के पेक्षा अधिक असल्यास सदर पदे जस जशी रिक्त होतील तस तशी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्यात येतील.


१२. केंद्र प्रमुख ही पदे जिल्हा परिषदेच्या आस्थापनेमधील असल्याने त्यांच्या सेवा प्रवेशासंदर्भात महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (सेवाप्रवेश) नियम, १९६७ मध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी ग्राम विकास विभागाने कार्यवाही करावी.


१३. ज्या जिल्हयांनी केंद्रप्रमुखाची पदे भरण्याची प्रक्रीया प्रस्तावित शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंत पूर्ण केली असल्यास ती वैध असेल.


१४. सदर शासन निर्णय ग्रामविकास विभाग अनौपचारिक संदर्भ क्रमांक ४८ / आस्था- १४, दिनांक १५.११.२०२२ रोजीच्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.


केंद्रप्रमुख भरती शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२२१२०११४५१५६२२२१ असा आहे.


शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय 2022 या वर्षातील सर्व शासन निर्णय - Click Here

Post a Comment

0 Comments

close