Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

केंद्रप्रमुखांची रिक्त पदे सरळसेवेने व मर्यादित विभागीय परीक्षेद्वारे भरण्याकरीता स्पर्धा परीक्षेचे आयोजन

केंद्रप्रमुखांची रिक्त पदे सरळसेवेने व मर्यादित विभागीय परीक्षेद्वारे भरण्याकरीता स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक रिक्त पदांची माहिती संचालनालय स्तरावर संकलित करण्यात येत आहे. 

केंद्रप्रमुख पद भरती शासन निर्णय PDF - Click Here
मा. मंत्री (शालेय शिक्षण), यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ०७/०९/२०२२ रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे येथे पार पडलेल्या बैठकीत मा. मंत्री महोदयांनी केंद्र प्रमुखांची दिक्त पदे विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा व पदोन्नती द्वारे ५०: ५० भरण्याचे प्रमाण निश्चित करण्याचे निर्देश दिलेले आहेत.


त्याअनुषंगाने कळविण्यात येते की, यासंदर्भात केंद्रप्रमुखांचे निर्गमित सर्व शासन निर्णय व दिनांक १० जून, २०१४ ची अधिसूचना विचारात घेऊन केंद्रप्रमुखांचा बिंदूनामावलीनुसार रिक्त पदांचा तपशिल संचालनालयास त्वरित उपलब्ध करुन द्यावा. जेणेकरुन केंद्रप्रमुखांच्या रिक्त पदांचा तपशिल उपलब्ध करुन दिल्यानंतर सर्व माहिती एकत्रित करुन मा. आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे याना सादर करणे सुलभ होईल.


केंद्रप्रमुखांची रिक्त पदे सरळसेवेने व मर्यादित विभागीय परीक्षेद्वारे भरण्याकरीता स्पर्धा परीक्षेचे आयोजन करणेबाबत परिपत्रक डाउनलोड करा. - Click Here


शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय 2022 या वर्षातील सर्व शासन निर्णय - Click Here


Post a Comment

0 Comments

close