Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

केंद्रप्रमुख पद भरती शासन निर्णय PDF | केंद्र प्रमुख भरती स्पर्धा परीक्षा / सरळसेवा भरतीसाठी आवश्यक पात्रता, अभ्यासक्रम, परीक्षा स्वरूप, माध्यम याविषयी तपशीलवार माहिती

केंद्रप्रमुखांची पदे स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्याबाबत सुधारित कार्यपध्दती विहीत करण्याबाबत 16 फेब्रुवारी 2018 रोजी निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार केंद्र प्रमुख पदे सरळसेवा भरतीसाठी आवश्यक पात्रता, अभ्यासक्रम, परीक्षा स्वरूप, माध्यम याबाबतची तपशीलवार माहिती येथे देण्यात आली आहे. 


केंद्रप्रमुख पद निर्मिती इतिहास 

प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण आणि साक्षरता या अभियानासंबंधी गठीत केलेल्या कार्यबल गटाच्या शिफारशीनुसार, जिल्हा परिषदांतील प्राथमिक शाळांमध्ये सर्वांसाठी शिक्षणाचे सुक्ष्म नियोजन, सतत उपस्थिती टिकविणे व शैक्षणिक दर्जा उंचावण्याकरीता एकुण 4860 केंद्रीय प्राथमिक शाळा स्थापन करण्याचा निर्णय, 14 सप्टेंबर 1994 च्या शासन निर्णयान्वये घेण्यात आला होता. या शासन निर्णयान्वये केंद्रीय प्राथमिक शाळेकरीता प्रशिक्षित पदवीधर केंद्र प्रमुखाचे प्रत्येकी एक पद निर्माण करण्यात आले. ही पदे सेवाज्येष्ठता व गुणवत्ता या निकषांनुसार प्रशिक्षित पदवीधर प्राथमिक शिक्षकांच्या संवर्गातील त्यांच्या सेवाज्येष्ठतेनुसार १०० टक्के पदोन्नतीने भरण्यात येत होती. सदर केंद्र प्रमुखांची पदे भरण्याबाबतच्या कार्यपध्दतीत संदर्भाधिन 2 फेब्रुवारी 2010 च्या शासन निर्णयान्वये फेररचना करण्यात येवून ती सरळसेवेने ४० टक्के याप्रमाणात भरण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार एकत्रित मर्यादीत विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे तसेच स्पर्धात्मक परीक्षेद्वारे सरळसेवेने अनुक्रमे 30 टक्के, 40 टक्के व 30 टक्के पदोन्नती द्वारे भरण्यात येतात. 

केंद्र प्रमुख पदाची सेवा प्रवेश नियमावली ग्राम विकास विभागाने दि. १०.०६.२०१४ रोजी अधिसूचित केली. त्यामुळे सरळसेवा, विभागीय मर्यादित परीक्षा व पदोन्नतीने नियुक्तीकरिता विहीत केलेले प्रमाण ४०.३०.३० अधिसूचनेच्या दिनांकापासून लागू झाले. 


केंद्रप्रमुख भरती शासन निर्णय 01 डिसेंबर 2022 - Click Here

केंद्रप्रमुख भरती स्पर्धा परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी वेबलिंक - Click Here


१. १) केंद्र प्रमुख पदभरती सदर्भात यापूर्वी पारित करण्यात आलेल्या दि.०२.०२.२०१० चा शासन निर्णय अधिक्रमित करण्यात येत असून, दिनांक ०२.०२.२०१० ते दिनांक १०.०६.२०१४ या कालावधीत अभावितपणे नियुक्त केंद्रप्रमुखाची नियुक्ती १००% पदोन्नतीमध्ये मोडत असल्याने या शिक्षकांच्या सेवा केंद्रप्रमुख पदावर नियमित करण्यात येत आहेत.

१.२) दिनांक १०.०६.२०१४ रोजी अथवा तदनंतर अभावित केंद्रपमुख म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांना पदवीधर शिक्षक पदावर वा समकक्ष पदावर पदावनत करण्यात यावे, अशा शिक्षकांना विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेतील गुणवत्तेनुसार केंद्रप्रमुख पदावर नियुक्ती मिळण्याची संधी राहील.

१.३) सरळसेवा तसेच विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे केंद्रप्रमुख पदावर करण्यात येणारी पदभरती ही अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणीतील गुणांच्या आधारे करण्यात येईल.


२ केंद्रप्रमुख पदावरील नेमणुकीकरिता अनुसरावयाची कार्यपध्दती पुढीलप्रमाणे राहील:

२.१) दि. १०.०६.२०१४ च्या अधिसूचनेनुसार सरळसेवा विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा तसेच पदोन्नतीने नियुक्तीकरीता अनुक्रमे ४०:३०:३० या प्रमाणात भरण्यात येतील. सदर रिक्त पदे त्या त्या निवड प्रक्रियेअंतर्गत भाषा, गणित व विज्ञान, सामाजिक शास्त्र, इतिहास व भुगोल या विषयांसाठी समप्रमाणात भरण्यात येतील. विषयनिहाय भरतीचे प्रमाण खालीलप्रमाणे: राहील :

अ) भाषा (एक) इंग्रजी ५० टक्के

(दोन) प्रथम भाषा ३० टक्के

(तीन) द्वितीय भाषा (हिंदी)- २० टक्के


ब) गणित व विज्ञान १०० टक्के

क) सामाजिक शास्त्रे - १०० टक्के ( इतिहास व भूगोल)


प्रथम भाषा म्हणून मराठी, उर्दू यांचे प्रमाण ८०:२० असे राहील.


२.२) पदोन्नती :- पदोन्नतीची ३० टक्के पदे जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) पदावर किमान ३ वर्ष अखंड सेवा झालेल्या शिक्षकांमधून सेवाजेष्ठत्तेनुसार भरण्यात येतील. 

२.३) सरळसेवा व विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षाद्वारे भरण्यात येणाऱ्या रिक्त पदांची आकडेवारी शासनाच्या संकेतस्थळावर संगणकीय प्रणालीद्वारे स्वतंत्ररित्या प्रसिध्द करण्यात येईल.


३) (अ) सरळसेवा :

३.१. सरळसेवेद्वारे पदभरती करण्याकरीता जाहिरात संगणकीय प्रणालीवर तसेच जादा खपाच्या स्थानिक दोन वृत्तपत्रात प्रसिध्द करण्यात येईल. शासनाच्या संकेतस्थळावर सदर जाहिरात किमान १५ दिवस कालावधीसाठी उपलब्ध असेल.

३.२ इच्छुक व अर्हता प्राप्त उमेदवार जाहिरातीच्या अनुषंगाने अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणीमधील त्यांना प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे ऑनलाईन अर्ज करतील.

३.३ जाहिरातीचा कालावधी संपल्यानंतर पाच कार्यालयीन दिवसांच्या आत गुणानुक्रमानुसार व बिंदूनामावलीनुसार उमेदवारांची निवडसूची शासनाच्या संकेतस्थळावर जाहिर करण्यात येईल. निवड झालेल्या उमेदवारांच्या शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्राची परिच्छेद क्र. ७ मध्ये नमूद समितीद्वारे करण्यात येईल. कागदपत्र पडताळणीअंती पात्र ठरलेला उमेदवार पात्रतेअंती उमेदवार, पुढील १५ दिवसाच्या आत निवड झालेल्या पदावर हजर होवून रुजु अहवाल संबंधित सक्षम प्राधिकाऱ्यांकडे सादर करेल. सक्षम प्राधिकारी त्याप्रमाणे त्वरीत नोंद घेवून नियुक्ती प्राधिकाऱ्यांस कळतील अन्यथा विहीत कालावधीत हजर न राहिलेल्या उमेदवाराने हक्क सोडला असल्याचे समजण्यात येईल, सदर उमेदवारानंतर गुणवत्ता यादीत लगतच्या उमेदवारास वरीलप्रमाणे विहीत कालावधीत रुजु होण्याकरीता कळविण्यात येईल.

३.४ सदर निवडसूची ११ महिने अथवा तत्पूर्वी परीक्षा आयोजित झाल्यास त्या कालावधीपर्यंत ग्राह्य धरण्यात येईल. तद्नंतर सदर निवडसूची व्यपगत होईल व नवीन पदभरतीकरीता आवश्यकतेनुसार वरीलप्रमाणे नव्याने जाहिरात प्रसिध्द करुन कार्यवाही करण्यात येईल.

३.५ वयोमर्यादा, बिंदुनामावली, शैक्षणिक अर्हता व सेवाशर्तीबाबत इतर अनुषांगिक प्रचलित निकष कायम राहतील अथवा यामध्ये शासन वेळोवेळी सुधारणा करीत त्याप्रमाणे राहील.


३ (ब) विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा - विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्यात येणाऱ्या रिक्त पदांसाठी जाहिरात शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल तसेच संबंधित जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांचे अधिनस्त केंद्रीय शाळांना सदर स्पर्धा परीक्षेबाबत कार्यालयीन आदेशाद्वारे कळवितील. विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेसंदर्भात उर्वरित बाबी वरील अनुक्रमांक ३.२, ३.४ व ३.५ राहतील. मात्र, विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेबाबतची जाहिरात वृत्तपत्रात प्रसिध्द करण्याची आवश्यकता नाही. 

विभागीय मर्यादित परीक्षेत पात्र ठरलेला उमेदवार, त्यांच्या नियुक्तीच्या ठिकाणी. सद्यस्थितीत ज्या आस्थापनेवर तो कार्यरत आहे, त्या आस्थापनेने कार्यमुक्तीचे आदेश पारीत केल्यानंतर प्रचलित नियमास अनुसरून विहित मुदतीत हजर होईल.


४. परीक्षेचे आयोजन व स्वरुप :- सरळसेवा व विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षाद्वारे केंद्रप्रमुखाच्या निवडीसाठी अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परीक्षेचे आयोजन शासन निश्चित करेल. अशा परीक्षा यंत्रणेमार्फत आयोजित करण्यात येईल. सदर परीक्षा यंत्रणेकडून राज्यातील सर्व जिल्ह्यामधील परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात येतील. या चाचणी परीक्षेचे आयोजन व स्वरुप खालील प्रमाणे राहील : 

४.१) अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परीक्षा घेण्यात येईल. अर्थात विषयनिहाय चाचणी घेतील जाणार नाही.

सदर परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येईल.

सदर परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची असेल.


४.२) समान काठिण्य पातळीच्या किमान १० ऑनलाईन प्रश्नपत्रिका सदर परीक्षा यंत्रणा तयार ठेवेल. परीक्षार्थ्यांना समान काठिण्यपातळीचे विविध प्रश्नपत्रिका देण्यात येतील.

४.३) परीक्षेत मिळालेले गुण उमेदवारांना परीक्षा संपल्यावर त्वरीत कळतील.

४.४) अभियोग्यता चाचणी परीक्षेचे प्रथम आयोजन सदर शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून ६ महिन्याच्या आत सदर परीक्षा यंत्रणेकडून करण्यात येईल. तद्नंतर उचलब्ध रिक्त होणारी पदे विचारात घेवून सदर परीक्षा घेण्यात येईल.

४.५) परीक्षेस बसणाऱ्या उमेदवारांची संख्या अधिक झाल्यास आणि एकाच वेळी सर्वाची ऑनलाईन चाचणी घेण्याची व्यवस्था करता येणे शक्य नसल्यास, काही फेऱ्यांमध्ये चाचणी परीक्षा घेण्यात येईल.

४.६) परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक परीक्षा यंत्रणेमार्फत जाहिर करण्यात येईल.


4. परीक्षेचे माध्यम:- परीक्षेचे माध्यम मराठी व इंग्रजी असेल. उमेदवारांस यापैकी एक माध्यम निवडावे लागेल.


5. परीक्षेचा अभ्यासक्रम :- सदर परीक्षा एकूण २०० गुणांची राहील तसेच परीक्षेसाठी पुढीलप्रमाणे दोन घटक राहतील.


अ) अभियोग्यता 

शेकडा प्रमाण- ६०%  

एकूण गुण - १२०

एकूण प्रश्न - १२०


ब) बुध्दिमत्ता  

शेकडा प्रमाण - ४०%  

एकूण गुण - ८०

एकूण प्रश्न - ८०


अ) अभियोग्यता व घटकांतर्गत गणितीय क्षमता, तार्किक क्षमता, वेग आणि अचूकता, भाषिक क्षमता (इंग्रजी), भाषिक क्षमता (मराठी), अवकाशीय क्षमता, कल / आवड, समायोजन / व्यक्तिमत्व इत्यादी उपघटक सर्वसाधारणपणे राहतील.

ब) बुध्दीमत्ता या घटकांतर्गत आकलन, वर्गीकरण, समसंबंध, क्रम श्रेणी, तर्क व अनुमान, कूट प्रश्न, सांकेतिक भाषा, लयबध्द मांडणी इत्यादी उपघटक सर्वसाधारणपणे राहतील.

सदर परीक्षा ही विषय ज्ञानावर होणार नाही. त्यामुळे या परीक्षेच्या अभ्यासक्रमासाठी विशिष्ठ स्तर मर्यादा असणार नाही. तथापि राज्य शासन परीक्षेकरितेचा अभ्यासक्रम वेळोवेळी निर्धारित करेल.


केंद्रप्रमुख पद भरती शासन निर्णय 16 फेब्रुवारी 2018 डाऊनलोड करा. Click Here


६. शैक्षणिक पात्रता / अर्हता

६.१ ) सरळसेवेने नियुक्तीकरिता अथवा विभागीय मर्यादित परीक्षेद्वारे नियुक्तीसाठी दि. १०.६.२०१४ च्या अधिसूचनेनुसार अर्हता प्राप्त असलेले उमदेवार अभियोग्यता चाचणी देण्यास पात्र असतील.

10 जून 2014 ची अधिसूचना डाउनलोड करा. Click Here


६.२) विभागीय मर्यादित परीक्षेद्वारे नियुक्तीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपल्या विभाग / कार्यालय प्रमुखामार्फत अर्ज करणे आवश्यक असून याकरिता अर्ज ऑनलाइन पध्दतीने संबंधित विभाग / कार्यालय प्रमुखास सादर करणे आवश्यक राहील.

Post a Comment

0 Comments

close