Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार 2023 जाहीर. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

समाजाची निःस्वार्थ भावनेने आणि निष्ठेने सेवा करणाऱ्या व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन देण्याच्या व त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात येतात. सन २०२२-२३ चे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार आज जाहीर करण्यात आले आहेत. 


राज्य शिक्षक पुरस्कार योजना १९६२-६३ पासून महाराष्ट्र राज्यात कार्यान्वित असून, ती शालेय शिक्षण विभागांमार्फत राबविली जाते. सन २०२१-२२ पासून राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराचे निकष सुधारीत करून सदर पुरस्कार क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार या नावाने राबविण्यात येत आहे. दिनांक १३ जून, २०११ च्या शासन निर्णयान्वये पुरस्काराची रक्कम रु. १०,०००/- (रुपये दहा हजार फक्त) अदा करण्यात येते. तसेच राष्ट्रीय / राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना दिनांक ४ सप्टेंबर, २०१४ च्या शासन निर्णयान्वये ठोक रक्कम रुपये १,००,०००/- (रुपये एक लाख फक्त) अदा करण्यात येते.


सन २०२२-२३ च्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी शिक्षकांची अंतिम निवड करण्यासाठी दिनांक २५ ऑगस्ट, २०२३ रोजी राज्य निवड समितीची ऑनलाईन बैठक झाली. राज्य निवड समितीने संदर्भ क्र.६ येथील दिनांक ३१ ऑगस्ट, २०२३ च्या पत्रान्वये शिक्षकांची गुणानुक्रमे प्रवर्गनिहाय निवड यादी शासनास सादर केली. त्यानुसार सन २०२२-२३ च्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी राज्य निवड समितीने केलेल्या शिफारशीनुसार शासनाने शालेय शिक्षण व क्रीडा विभाग स्तरावर प्रवर्गनिहाय १०८ शिक्षकांची खालील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निवड केली आहे.

या पुरस्कारांचे वितरण ५ सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे. शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन देण्यासाठी तसेच त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने दरवर्षी शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात येतात. 

राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार २०२२-23 प्राथमिक, माध्यमिक आणि विशेष शिक्षक, आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षक तसेच सावित्रीबाई फुले आदर्श स्त्री शिक्षिका या गटांतील शिक्षकांना जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये ३7 प्राथमिक शिक्षक, ३९ माध्यमिक शिक्षक, १9 आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे प्राथमिक शिक्षक, 8 सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका, दोन विशेष शिक्षक (कला/क्रीडा), एक अपंग शिक्षक/अपंग विद्यार्थ्यांच्या शाळेतील शिक्षक तसेच एक गाइड शिक्षक आणि एक स्काउट शिक्षक यांचा पुरस्कारविजेत्या शिक्षकांमध्ये समावेश आहे.

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य पुरस्कार विजेत्या शिक्षकांची यादी डाउनलोड करा. - Click Here

पुरस्कार वितरण कार्यक्रम दि. ५ सप्टेंबर २०२३ या शिक्षक दिनी मुंबई येथे होणार आहे.

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार नियम व पात्रता याविषयी जाणून घ्या -Click Here

Post a Comment

0 Comments

close