केंद्रीय शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराची (National Teacher Award) घोषणा करण्यात आली असून महाराष्ट्रातील मंतैय्या बेडके, सागर बगाडे (maitaiah bedke, sagar bgade) या दोन शिक्षकांना 2024 चा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2024 साठी निवड झालेल्या शिक्षकांचा पुरस्कार सोहळा 5 सप्टेंबर 2024 रोजी विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे होणार आहे.
सन 2023 मधील राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांविषयी माहिती जाणून घ्या - Click Here
प्रत्येक पुरस्कारामध्ये गुणवत्तेचे प्रमाणपत्र, रोख पुरस्कार आहे. 50,000/- आणि एक रौप्य पदक. हॉटेल 'द अशोक', 50-बी, डिप्लोमॅटिक एन्क्लेव्ह, चाणक्यपुरी, नवी दिल्ली 110021 (फोन: 011-26110101) येथे 3 सप्टेंबर (दुपारी) ते 6 सप्टेंबर 2024 (दुपारी) पर्यंत राहण्याची आणि जेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 3 सप्टेंबर 2024 रोजी संध्याकाळी 5.00 वाजता हॉटेल अशोक, नवी दिल्ली येथे एक संक्षिप्त बैठक आयोजित केली जाईल.
देशातील 50 शिक्षकांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून यामध्ये महाराष्ट्रातील दोन शिक्षकांचा समावेश आहे. गडचिरोली येथील मंतैह बेडके व कोल्हापूर येथील सागर बगाडे यांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विषयी माहिती वाचा
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2024 साठी निवड झालेल्या महाराष्ट्रातील शिक्षकांची माहिती
National Teacher Award 2024 announced
1) ΜΑΝΤAIAH CHINNI BEDKE मंतैय्या बेडके
Z. P. UPEER PRIMZRY DIGITAL SCHOOL JAJAVANDI, GADCHIROLI, MAHARASHTRA
गडचिरोलीच्या मांतय्या चिन्नी बेडके यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर
गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील जाजावंडी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक मांतय्या बेडके यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह तसेच शिक्षणाधिकारी बाबासाहेब पवार यांनी श्री बेडके यांचे अभिनंदन केले आहे.
अतिदुर्गम भाग, शिक्षणाबाबत पालकांसह मुलांमध्येही रुची नव्हती. ६०० लोकसंख्येचे गाव असतानाही इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत पटावर फक्त ७ विद्यार्थी. त्यातही ४ विद्यार्थी शाळेत यायचे तर ३ विद्यार्थी पालकांसमवेत शेतीकामे किंवा जंगलात वनोपज गोळा करायला जायची. अशा स्थितीत ७ विद्यार्थ्यांवरून १४० विद्यार्थी पटसंख्येचा आकडा गाठणे, हे जिकरीचे कार्य; पण हे कार्य करून विद्यार्थी गुणवत्तेवर भर देत शाळेचा कायापालट केला, याच कार्याची पावती त्या शिक्षकाला मिळाली. एटापल्ली तालुक्याच्या जाजावंडी जि.प. शाळेचे शिक्षक मांतय्या चिन्नी बेडके यांची राष्ट्रीय पुरस्कारासाठी मंगळवारी निवड झाली.
मूलभूत सोयीसुविधांचाही अभाव गावामध्ये आहे. अशाही स्थितीत मांतय्या बेडके हे २०१०-११ पासून तेथे कार्यरत आहेत.
१५० प्रौढांना केले साक्षर
शिक्षक बेडके यांनी जाजावंडी येथील निरक्षर पालकांची समस्या लक्षात घेऊन त्यांना साक्षर करण्याचे ठरविले. त्यानुसार त्यांनी दोन स्वयंसेवक सोबतीला घेऊन प्रोंडांना साक्षर करण्यास सुरुवात केली. १५० प्रौढ साक्षरसुद्धा झाले.
शाळाबाह्य ३० मुले दत्तक
शिक्षक मांतय्या बेडके यांनी शाळाबाह्य ३० मुलांना दत्तक घेतले. त्या मुलांची शाळा परिसरातच निवास व जेवणाची सोय केली. येथे राहून ती मुले शिकू लागली. यासाठी त्यांना गावातील काही पालकांचेसुद्धा सहकार्य लाभले.
हे उपक्रम राबविले
क्रमिक अभ्यासक्रमासोबतच शिक्षक बेडके यांनी शाळेच्या सौंदर्याकरणावर भर दिला. एवढेच नाही तर वनभोजन, क्षेत्रभेट उपक्रम राबविले. विद्यार्थ्यांचा क्रीडा स्पर्धामध्ये सहभाग, शिष्यवृत्ती परीक्षेबाबत मार्गदर्शन असे विविध उपक्रम राबविले.
2) SAGAR CHITTARANJAN BAGADE सागर बगाडे
SOU S. M. LOHIA HIGHSCHOOL AND JUNIOR COLLEGE KOLHAPUR, MAHARASHTRA
0 Comments