डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे मार्फत महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी जेईई (JEE) आणि नीट (NEET) या प्रवेश परीक्षांचे निःशुल्क अनिवासी प्रशिक्षण खाजगी प्रशिक्षण केंद्राच्या मार्फत मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर व नागपूर या ठिकाणी प्रत्येकी JEE-100 व NEET-100 जागांकरिता प्रशिक्षण राबविण्यात येत आहे.
UPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण, येथे करा अर्ज - Click Here
BARTI - Dr. Babasaheb Ambedkar Research and Training Institute Pune
बार्टी - डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे
Free Coaching for JEE and NEET Entrance Exam Preparation by BARTI
पात्रताः-
१. उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
२. उमेदवाराकडे महाराष्ट्रातील अनुसूचित जातीचा दाखला व अधिवास असावा.
३. उमेदवार शैक्षणिक वर्ष सन २०२४-२०२५ मध्ये इयत्ता ११ वी (विज्ञान) चे शिक्षण घेत असावा.
४. रु. ८ लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न मर्यादा असलेला उमेदवार प्रशिक्षणासाठी पात्र असेल.
५. अनाथ आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी उमेदवाराकडे महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून निर्गमित केलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक.
६. उमेदवार दिव्यांग असल्यास ४०% पेक्षा जास्त दिव्यांगत्व असल्याचे प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत सादर करावी.
आरक्षण :-
• महिला ३०%, दिव्यांग (PWD) ५%, अनाथ-१%, वंचित-५% (वाल्मिकी व तत्सम जाती-होलार, बेरड, मातंग, मांग, मादगी, इ. साठी), जागा आरक्षित असतील.
विद्यार्थी निवडीचे निकष :-
• प्रशिक्षणातील सर्व जागांसाठी प्राधान्याने इयत्ता १० वीच्या गुणांच्या आधारे गुणवत्तानिहाय उमेदवारांची निवड केली जाईल.
प्रशिक्षणाच्या अटी व शती :-
१. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ३०/०६/२०२४
२. प्रशिक्षण कालावधी २४ महिन्यांचा राहील.
३. निवड झालेल्या पात्र विद्यार्थ्यांना प्रशिक्षणा दरम्यान ७५ टक्के पेक्षा जास्त कालावधीसाठी उपस्थित राहिल्यास त्या विद्यार्थ्यांना दरमहा रु.६०००/- एवढे विद्यावेतन अदा करण्यात येईल.
४. निवड झालेल्या पात्र विद्यार्थ्यांना पुस्तक संचाकरीता प्रती विद्यार्थी रु.५०००/- एवढी एकरकमी रक्कम अदा करण्यात येईल.
५. सदर योजनेबाबत / प्रशिक्षणाबाबत काही वाद अथवा धोरणात्मक पेच प्रसंग निर्माण झाल्यास याबाबतचे अंतिम सर्व अधिकार मा. महासंचालक, बार्टी व शासनास राहतील.
अर्ज करण्याचा कालावधी - 13 जून 2024 ते 30 जून 2024
अर्ज करण्यासाठी लिंक :-
इच्छुक व पात्र उमेदवारांनी पुढील लिंकवरुन ऑनलाईन नोंदणी करावी.
0 Comments