केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेच्या (UPSC EXAM) विनामूल्य प्रशिक्षणाची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. सामाईक प्रवेश परीक्षा 2025 / SIAC CET 2025 साठी 28 जूनपर्यंत ऑनलाइन पद्धतीने प्रवेश अर्ज भरता येईल.
मुंबईतील राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र (नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती व नागपूर), यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी संचलित डॉ. आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, पुणे आणि पिंपरी -चिंचवड महापालिका संचलित सावित्रीबाई फुले ॲकॅडमी यांच्यामार्फत 'केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा पूर्वपरीक्षा २०२५'चे पूर्णवेळ विनामूल्य प्रशिक्षण देण्यासाठी सामाईक प्रवेश परीक्षेचे आयोजन केले आहे.
अर्ज भरण्याची तसेच परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत 30 जूनपर्यंत आहे. प्रवेश परीक्षा 4 ऑगस्ट 2024 रोजी ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येईल. परीक्षेची वेळ सकाळी अकरा ते दुपारी एक वाजेपर्यंत राहील.
परीक्षेची जाहिरात, अभ्यासक्रम, ऑनलाइन अर्ज भरण्याबाबत माहिती व परीक्षेसंबंधी इतर सर्व सूचना 'www.siac.org.in' या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
सामाईक प्रवेश परीक्षा 2025 / SIAC CET 2025 साठी अर्ज भरण्यासाठी महत्त्वाच्या सूचना वाचा.
(१) विद्यार्थ्यांचे प्रवेश लेखी परीक्षा आणि मुलाखतीतील एकुण गुणाच्या आधारे ठरवले जाणार असल्याने मुलाखतीचे वेळापत्रक परीक्षेनंतर जाहीर केले जाईल.
(२) सामायिक प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश पोर्टलवर लॉग इन करून त्यांच्या पसंतीचे प्रशिक्षण केंद्र प्रवेशासाठी निवडावे.
(३) प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांना कोणतीही माहिती वैयक्तिकरित्या उपलब्ध करून दिली जाणार नाही. प्रवेश प्रक्रियेबददलची सर्व माहिती SIAC च्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाईल. सदर जाहीरातीत आवश्यकतेनुरूप बदल करण्याचा अंतिम अधिकार संचालक एसआयएसी यांचा असेल.
सविस्तर जाहिरात, परीक्षेचा अभ्यासक्रम, पात्रता, ऑनलाईन अर्ज भरण्याविषयी सूचना व इतर माहिती www.siac.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
0 Comments