क्रीडा शपथ मराठी pdf | krida shapath in marathi pdf
क्रीडा शपथ नमूना - 1
आम्ही सर्व खेळाडू अशी शपथ घेतो की, आम्ही या क्रीडामहोत्सवात सचोटीने भाग घेऊ. या क्रीडामहोत्सवात होणाऱ्या क्रीडाप्रकारात, आम्ही उत्साहाने सहभागी होऊन उत्तम खेळाचे प्रदर्शन करू. क्रीडामहोत्सवी स्पर्धांच्या सर्व नियमांचे आम्ही एकनिष्ठेने पालन करू व खऱ्या खिलाडूवृत्तीने वागून पंचांनी दिलेला निर्णय अंतिम मानून स्पर्धा निकोप वातावरणात पार पाडू. आमच्या शाळा, केंद्र, बीट, तालुका, जिल्हा, राज्य व देशाचा सन्मान व गौरव होईल अशा इर्षेने या क्रीडामहोत्सवात भाग घेऊ. जय हिंद
शिक्षण सप्ताह - दिवस तिसरा - क्रीडा दिवस उपक्रम
क्रीडा शपथ नमूना - 2
आम्ही सर्व खेळाडू अशी शपथ घेतो की आमच्या शाळेच्या ..... व्या वार्षिक क्रिडा महोत्सवामधे आम्ही सर्व खेळामध्ये प्रामाणिकपणे, हिरिरीने आणि उत्साहाने भाग घेऊन सर्व नियमांचे एकनिष्ठेने पालन करु व खऱ्या खिलाडूवृत्तीने वर्तन करुन आपल्या शाळेचा व संस्थेचा सन्मान व खेळाचा गौरव वाढत राहिल असा प्रयत्न करु. जय हिंद
क्रीडा शपथ नमूना - 3
मी खेळाडू म्हणून अशी शपथ घेतो/घेते की, केंद्रशाळा अंतर्गत ....... शालेय कीडा स्पर्धेत मी भाग घेत आहे. स्पर्धा आणि खेळाची शान व दर्जा उंचावण्यासाठी माझे कौशल्य पणास लावीन.
स्पर्धा व खेळाच्या अटी आणि नियमांचे काटेकोरपणे पालन करेन. पंचांचा निर्णय मान्य करीन. मी माझ्या शाळेचे आणि गावचे नाव उंचावण्याचा आटोकाट प्रयत्न करीन. खिलाडूवृत्ती, सचोटी, निकोप ईर्षा आणि खेळभावना या गुणांचे तंतोतंत पालन करीन. ... जय हिंद.
क्रीडा शपथ नमूना - 4
आम्ही सर्व खेळाडू अशी शपथ घेतो की, आम्ही या क्रीडा महोत्सवात सचोटीने भाग घेऊ. या क्रीडा महोत्सवात होणाऱ्या क्रीडा प्रकारात, आम्ही उत्साहाने सहभागी होऊन उत्तम खेळाचे प्रदर्शन करू, क्रीडा महोत्सवातील सर्व नियमांचे आम्ही एकनिष्ठेने पालन करू व खऱ्या खिलाडूवृत्तीने वागून पंचानी दिलेला निर्णय अंतिम मानून स्पर्धा निकोप वातावरणात पार पाडू. आमच्या शाळेचा तसेच .......... महापालिकेचा सन्मान व गौरव होईल अशा इर्षेने या क्रीडा महोत्सवात भाग घेऊ. जय हिंद
0 Comments