Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

इ. 10वी च्या परीक्षेला प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे शास्त्रीय कला, चित्रकला व लोककला प्रस्ताव सादर करणेबाबत

फेब्रुवारी-मार्च 2026 मधील माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10वी) परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना शास्त्रीय कला, चित्रकला व लोककला प्रस्ताव सादर करणेबाबत शासन परिपत्रक.



शासन निर्णय 24 नोव्हेंबर 2017 नुसार 
शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या व लोककला प्रकारामध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे अतिरिक्त गुण देण्याबाबतची कार्यवाही करण्यात येते. सदर शासन निर्णयातील मुद्दा क्र. ०५ मध्ये याबाबतचे प्रस्ताव विद्यार्थ्यांनी माध्यमिक शाळेकडे दि. १५ डिसेंबर अखेर व माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे सदरचे प्रस्ताव सादर करावयाची अंतिम तारीख १५ जानेवारी अशी नमूद आहे.

तथापि शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा २०२5 चा निकाल जानेवारी २०२6 च्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येणार असल्याने शास्त्रीय कला, चित्रकला व लोककला प्रस्ताव स्विकारण्याच्या मुदतीमध्ये वाढ करण्याबाबत विविध संघटनांनी या कार्यालयाकडे विनंती केली आहे. त्याअनुषंगाने सदर प्रस्ताव स्विकारण्याच्या दोन्ही तारखांना खालीलप्रमाणे मुदतवाढ या वर्षासाठीच देण्यात येत आहे.

शास्त्रीय कला, चित्रकला व लोककला प्रस्ताव सादर करणेस मुदतवाढ

विद्यार्थ्यांनी शाळेकडे प्रस्ताव सादर करणे - 31 जानेवारी 2026

शाळांनी विभागीय मंडळाकडे प्रस्ताव सादर करणे - 31 जानेवारी 2026

तरी उपरोक्तनुसार सर्व विभागीय मंडळांनी योग्य ती कार्यवाही करावी. सदर मुदतवाढ आपल्या कार्यकक्षेतील सर्व माध्यमिक शाळांच्या निदर्शनास आणून देवून त्याप्रमाणे मुदतीत कार्यवाही करण्याबाबत सर्व संबंधितांना सूचित करावे. तसेच आपल्या स्तरावरुन याबाबत प्रसिध्दी देण्यात यावी व कोणताही पात्र विद्यार्थी सदर गुणांच्या सवलतीपासून बंचित राहणार नाही याची संबंधितांनी दक्षता घ्यावी.

इ.१०वी परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना शास्त्रीय कला, चित्रकला व लोककला प्रस्ताव सादर करणेबाबत शासन परिपत्रक डाउनलोड करा. Click Here

Post a Comment

0 Comments

close