Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शालेय समित्या रचना व कार्ये | शालेय समित्यांची माहिती सरल प्रणालीवर अद्ययावत करणेबाबत शासन परिपत्रक

शालेय समित्या रचना व कार्ये | शालेय समित्यांची माहिती सरल प्रणालीवर अद्ययावत करणेबाबत शासन परिपत्रक



शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय दिनांक १६-४-२०२५ नुसार शाळास्तरावरील विविध समित्यांचे एकत्रीकरण करुन शाळास्तरावर पुढीलप्रमाणे समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

१. शाळा व्यवस्थापन समिती

२. सखी सावित्री समिती

३. महिला तक्रार निवारण समिती/ अंतर्गत तक्रार समिती

४. विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकासन समिती


शालेय समित्यांचे एकत्रीकरण करणेबाबत शासन निर्णय



शाळास्तरावरील उपरोक्त समिती अध्यक्षांची माहिती या कार्यालयामार्फत मागविण्यात आली होती. त्यानुसार प्राप्त शाळा स्तरावरील समिती अध्यक्षांची नावे NIC मार्फत सरल पोर्टल अंतर्गत स्कूल पोर्टलवर अदद्ययावत करण्यात आलेली असून शाळांना शालेय समिती माहिती या मेनुअंतर्गत जिल्हा, तालुका निवडल्या नंतर शाळांची नावे दिसतील, त्यांनी शाळेच्या नावावर क्लिक केल्यानंतर अपलोड केलेली यादी दिसेल. यादीत नावे योग्य असल्यास बदल करण्याची आवश्यकता नाही.


ज्या शाळांनी वरील माहिती सादर केलेली नाही त्यांना माहिती सरल पोर्टल अंतर्गत स्कूल पोर्टलवर अद्ययावत करण्याची सुविधा मुख्याध्यापक लॉगीन वर उपलब्ध झालेली आहे. याच बरोबर शाळांना वरील माहितीत बदल करण्याची सुविधाही सरल पोर्टल अंतर्गत स्कूल पोर्टलवर मुख्याध्यापक लॉगीन वर उपलब्ध झालेली आहे.

तरी आपल्या स्तरावरून सर्व शाळांना शाळास्तरावरील समित्यांच्या अध्यक्षांची माहिती सरल पोर्टल अंतर्गत स्कूल पोर्टलवर अद्ययावत करण्याबाबत सूचना देण्यात याव्यात व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संचालनालयास सादर करण्यात यावा. 


सरल पोर्टल लॉगिन

School Portal -https://education.maharashtra.gov.in/

www.education.gov.in या वेबसाईड वर जाऊन school पोर्टल लॉगिन करावे. 


शाळा व्यवस्थापन समिती SMC रचना व कार्ये पहा.

सखी सावित्री समिती रचना व कार्ये :- शाळा स्तर, केंद्र स्तर, तालुका स्तर

महिला तक्रार निवारण समिती/ अंतर्गत तक्रार समिती रचना व कार्ये

विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकासन समिती रचना व कार्ये




Post a Comment

0 Comments

close