माजी विद्यार्थी मेळाव्याचे प्रभावी भाषण (Alumni Meet effective Speech in Marathi) तयार करताना त्यात शाळेतील जुन्या आठवणी, शिक्षकांबद्दल कृतज्ञता आणि सध्याच्या जीवनातील यशाचा शाळेच्या जडणघडणीशी असलेला संबंध सांगावा. आपल्या भाषणात व्यासपीठावरील मान्यवर, आदरणीय शिक्षक आणि मित्र-मैत्रिणींना अभिवादन करून शाळेच्या दिवसांतील धमाल, शिस्त आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यावर भर द्यावा.
माजी विद्यार्थी मेळावा भाषणाचा नमुना | Alumni Meet effective Speech in Marathi
१. सुरुवात (अभिवादन):
"व्यासपीठावर उपस्थित आदरणीय मुख्याध्यापक, माझे गुरुजन, आणि माझ्या लाडक्या मित्र-मैत्रिणींनो, सर्वांना सप्रेम नमस्कार! आज अनेक वर्षांनी या शाळेच्या पवित्र प्रांगणात उभे राहून, जुन्या आठवणींनी मन भरून आले आहे. बालपणी शाळेत घालवलेले दिवस पुन्हा डोळ्यासमोर उभे राहिले आहेत. खूप दिवसांनी, किंबहुना अनेक वर्षांनी आज पुन्हा या शाळेच्या आवारात, या वर्गात पाऊल ठेवताना मनाची झालेली घालमेल मी शब्दांत सांगू शकत नाही. आज पुन्हा एकदा स्वतःला लहान मूल समजावे आणि 'सर' आले की बाकावर उभे राहावे, असे वाटत आहे."
२. जुन्या आठवणी :
"असे वाटते की, कालच आपण इथे बागडत होतो. खूप मजाा मस्ती करत होतो. वर्गातील बेंचवर बसण्यापासून ते शाळा सुटेपर्यंत होणारी धमाल आज ताज्या होत आहेत. आपल्या आयुष्यातील शाळेचे दिवस हे केवळ शिक्षणाचे दिवस नव्हते, तर ती आयुष्याची जडणघडण होती. याच वर्गात आपण आपल्या मित्रांच्या खोड्या काढली, मस्ती केली, मधल्या सुट्टीत डबा शेअर करणे, शिक्षकांचा ओरडा खाणे आणि परीक्षेच्या आधीची धाकधूक... या साऱ्या गोष्टी आजही ताजा आहेत. या शाळेने मला फक्त अक्षर ओळख दिली नाही, तर माणूस म्हणून जगायला शिकवले."
३. गुरुजनांचे योगदान:
"आज आपल्यातील कोणी डॉक्टर आहे, कोणी इंजिनिअर, कोणी उद्योजक, तर कोणी शिक्षक. आपण सर्वजण वेगवेगळ्या क्षेत्रात यशाची शिखरे गाठत आहोत. पण या यशाच्या पायाभरणीमध्ये आपल्या शाळेचा आणि शिक्षकांचा वाटा सर्वात मोठा आहे. आज आम्ही जीवनात ज्या काही पदावर आहोत, त्याचे श्रेय या शाळेला आणि आम्हांला घडवणाऱ्या गुरुजनांना जाते. तुम्ही केवळ पुस्तकी ज्ञान नाही, तर शिस्त आणि संस्काराची शिदोरी दिली. त्याबद्दल आम्ही तुमचे ऋणी आहोत."
४. सध्याचे जीवन आणि शाळेचे महत्त्व:
"शाळेतून बाहेर पडल्यावर आयुष्याच्या धावपळीत आपण सगळे व्यस्त झालो. पण जेव्हा जेव्हा संकटे आली, तेव्हा शाळेत शिकवलेली जिद्द कामी आली. या शाळेने दिलेली मैत्री आजही टिकून आहे. आजचा हा मेळावा केवळ जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी नाही, तर पुन्हा एकदा 'आपलेपण' जपण्यासाठी आहे. आपण सर्वजण आपल्या कामात खूप व्यस्त असतो, पण आजचा हा दिवस या सर्व व्यस्ततेतून बाहेर पडून पुन्हा एकदा बालपणात जाण्याचा दिवस आहे."
५. समारोप:
"जाता जाता, इतकेच म्हणेन की, शाळा बदलली असेल, इमारती बदलल्या असतील, पण आपल्या मनातील शाळेचे स्थान अढळ आहे. शाळा आपली आई आहे, तिने आपल्याला घडवले आहे. या शाळेच्या विकासासाठी आपण सर्वजण माजी विद्यार्थी म्हणून नेहमीच तत्पर राहूया. या मेळाव्यातून पुन्हा एकदा मैत्रीचे नाते घट्ट करूया. धन्यवाद!"
भाषण अधिक प्रभावी करण्यासाठी टिप्स:
वैयक्तिक किस्से सांगा: एखादा जुना मजेशीर किस्सा सांगा.
शिक्षकांचा आदर: उपस्थित शिक्षकांचे नाव घेऊन त्यांचे आभार माना.
मदतीचा हात: शाळेच्या विकासासाठी माजी विद्यार्थी म्हणून काय करता येईल, यावर भर द्या.
माजी विद्यार्थी संघ मेळावा भाषण Video
माजी विद्यार्थी मेळावा कविता
Majhi Vidyarthi melava bhashan
माजी विद्यार्थी मेळावा चारोळ्या
0 Comments