१) सदर अंतरिम उत्तरसूचीवर काही आक्षेप असल्यास त्याबाबतचे निवेदन परिषदेच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन स्वरूपात करता येईल.
२) सदर ऑनलाईन निवेदन पालकांकरीता संकेतस्थळावर व शाळांकरीता त्यांच्या लॉगीनमध्ये Objection on Question Paper & Interim Answer Key या हेडिंगखाली उपलब्ध करून देण्यात आलेले आहे..
३) त्रुटी / आक्षेपाबाबतचे ऑनलाईन निवेदन भरण्याकरीता दिनांक 07/05/2026 ते 14/05/2026 रोजीपर्यंत मुदत देण्यात येत आहे.
४) दि. 14/05/2026 नंतर त्रुटी / आक्षेपाबाबतचे निवेदन स्वीकारले जाणार नाही.
अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची वरील आक्षेप नोंदविण्यासाठी येथे टच करा.
Objection Link - Click Here
५) उपरोक्त ऑनलाईन निवेदनांशिवाय इतर कोणत्याही प्रकारे (टपाल समक्ष अथवा ईमेलव्दारे) प्राप्त त्रुटी आक्षेपाबाबतच्या निवेदनांचा विचार केला जाणार नाही.
६) उपरोक्तनुसार विहीत मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांना वैयक्तिकरित्या उत्तर पाठविले जाणार नाही.
७) विहित मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांवर संबंधित विषय तज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसूची परिषदेच्या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिध्द करण्यात येईल.
अंतरिम उत्तरसूची बाबत परिपत्रक Click Here
0 Comments