महाराष्ट्र शासनाने राज्यातील एकूण ७६ शासकीय तांत्रिक विद्यालयांची नावे बदलण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्यातील एकूण १६२ शासकीय तांत्रिक विद्यालयांपैकी दोन टप्प्यांत या शाळांना थोर व्यक्ती, क्रांतिकारक, शास्त्रज्ञ, समाजसुधारक आणि संतांची नावे देण्यात आली आहेत.
केंद्र शासनाच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार माध्यमिक स्तरावर व्यवसाय शिक्षणाची जोड देऊन विद्यार्थ्यांमध्ये व्यवसाय शिक्षणाची आवड निर्माण करणे व माध्यमिक कौशल्य विकसित करण्याच्या दृष्टीने ने V-१ मूलभूत तंत्रज्ञानाची ओळख (Introduction to Basic Technology-IBT), V-2 अभियांत्रिकी तंत्रज्ञानाची मुलभूत तत्वे (Elements of Mechanical Engineering-EME) व V-3 विद्युत आणि इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञानाची मुलभूत तत्त्वे (Elements of Electrical and Electronics Technology-EEET) हे तीन बहुकौशल्ययुक्त पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम १९९६-९७ पासून सुरु करण्यात आले आहेत. सदर अभ्यासक्रम इयत्ता ९ वी आणि १० वी च्या स्तरावर राबविण्यात येतात. सद्यःस्थितीत राज्यात एकुण १६२ शासकीय तांत्रिक विद्यालय कार्यान्वित आहेत.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वाचा येथील शासन निर्णय/पुरकपत्रान्वये मा. मंत्री (कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता) यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या एकसदस्यीय समितीस शासकीय तांत्रिक विद्यालयाच्या नामांतरणाचा निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. त्याअनुषंगाने कोकण व नाशिक विभागातील २५ शासकीय तांत्रिक विद्यालयांची नावे बदलण्याबाबतचा शासन निर्णय दि.२१.१०.२०२६ रोजी निर्गमित करण्यात आला आहे. आता कोकण व नाशिक विभाग वगळता इतर विभागातील उर्वरित ५१ शासकीय तांत्रिक विद्यालयांची नावे बदलणेबाबत शासन निर्णय घेण्यात आला आहे.
शासकीय तांत्रिक विद्यालयांची नावे बदलण्यास मान्यता देणेबाबत शासन निर्णय | निर्णयाचे मुख्य टप्पे आणि विभागणी
शासकीय तांत्रिक विद्यालयांची नावे बदलणेबाबतचा निर्णय कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत जाहीर करण्यात आला आहे.
• पहिला टप्पा (२५ विद्यालये). २१ ऑक्टोबर २०२६ रोजी जारी झालेल्या शासन निर्णयानुसार कोकण आणि नाशिक विभागातील २५ शासकीय तांत्रिक विद्यालयांचे नामांतर करण्यात आले.
• दुसरा टप्पा (५१ विद्यालये). नोव्हेंबर २०२६ मध्ये कोकण आणि नाशिक वगळता उर्वरित विभागांतील ५१ शासकीय तांत्रिक विद्यालयांच्या नामांतराला शासनाने मान्यता दिली.
• निर्णयाचा मुख्य उद्देश. माध्यमिक स्तरावर तांत्रिक व व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांतील आदर्श व्यक्तींच्या कार्याची ओळख व्हावी आणि संस्थांना नवी ओळख मिळावी, हा यामागील हेतू आहे.
25 शासकीय तांत्रिक विद्यालयांची नावे बदलणेबाबतचा शासन निर्णय डाउनलोड करा. - Click Here
51 शासकीय तांत्रिक विद्यालयांची नावे बदलणेबाबतचा शासन निर्णय डाउनलोड करा. - Click Here
काही प्रमुख विद्यालयांची नवीन नावे
• मुंबई (धोबीतलाव). येथील एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालयाचे नाव बदलून डॉ. जयंत नारळीकर शासकीय तांत्रिक विद्यालय असे करण्यात आले आहे.
• नागपूर (कामठी). येथील विद्यालयाला २६/११ दहशतवादी हल्ल्यातील शहीद हेमंत करकरे यांचे नाव देण्यात आले आहे.
• पुणे आणि जेजुरी. पुण्यातील शासकीय तांत्रिक विद्यालयाचे नाव हिरोजी इंदुलकर शासकीय तांत्रिक विद्यालय आणि जेजुरी येथील केंद्राचे नाव दत्तोपंत मसकर शासकीय तांत्रिक विद्यालय असे केले आहे.
• सातारा आणि कराड. साताऱ्यातील विद्यालयाला स्वातंत्र्यसेनानी रंगो बापूजी गुप्ते, तर कराड येथील विद्यालयाला अण्णा भोई यांचे नाव देण्यात आले आहे.
• सोलापूर. येथील शासकीय तांत्रिक विद्यालयाचे नामकरण सुरेशराव केतकर विद्यालय असे करण्यात आले आहे.
• नंदुरबार. येथील विद्यालयाला बाल क्रांतिकारक शिरीषकुमार मेहता यांचे नाव देण्यात आले आहे.



0 Comments