अराजपत्रित राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना मुंबई वित्तीय नियम, १९५९ मधील नियम क्र. १४२ (जे) अनुसार देण्यात येणाऱ्या सण अग्रिमाची रक्कम वाढविण्यात आली आहे.
सण अग्रिम शासन निर्णय - 05 नोव्हेंबर 2026
शासन आता असे आदेश देत आहे की, दिनांक १ जानेवारी, २००६ पासून सुधारित करण्यात आलेल्या वेतन संरचनेतील ज्या अराजपत्रित राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे ग्रेड वेतन ४८००/-(चार हजार आठशे) पेक्षा अधिक नाही अशा अराजपत्रित राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना २०,०००/- (वीस हजार फक्त) सण अग्रिम अनुज्ञेय राहील.
२. सण अग्रिम फक्त पुढील सणांना तसेच सामान्य प्रशासन विभागाकडून वेळोवेळी घोषित करण्यात येणाऱ्या सणांसाठीच अनुज्ञेय राहील.
१. दिवाळी.
२. रमझान ईद.
३. ख्रिसमस.
४. पारसी नववर्ष.
५. संवत्सरी.
६. रोश-होशना
७. वैशाखी पौर्णिमा (भगवान बुध्द जयंती)
८. स्वातंत्र्य दिन
९. प्रजासत्ताक दिन
१०. डॉ. आंबेडकर जयंती
सण अग्रिम मंजूरी आणि वसूलीच्या अटी व शर्ती पूर्वी विहित केल्याप्रमाणेच राहतील.
हे आदेश निर्गमित केल्याच्या दिनांकापासून अंमलात येतील.
मुंबई वित्तीय नियम, १९५९ मधील नियम क्रमांक १४२ (जे) मध्ये योग्य ती सुधारणा यथावकाश करण्यात येईल.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा संगणक सांकेतांक क्र. २०२६११०५१५३७५८८२०५ असा आहे. सदर आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकीत करुन काढण्यात येत आहेत.
सण अग्रिम रक्कम 20 हजार रुपये करणेबाबत शासन निर्णय - Click Here




0 Comments