जिल्हा तांत्रिक सेवेमधील "विस्तार अधिकारी" या संवर्गातून महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-ब (प्रशासन शाखा) मधील उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी व तत्सम या संवर्गातील रिक्त पदावर तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती देणेबाबत शासन निर्णय.
सन २०२५-२६ या निवडसूची वर्षामध्ये जिल्हा तांत्रिक सेवेमधील "विस्तार अधिकारी" या संवर्गातील खालील कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-ब (प्रशासन शाखा) मधील उपशिक्षणाधिकारी व तत्सम या पदावर (वेतन पे बॅड रु. एस-१७ : ४७६००-१५११००) या वेतनसंरचनेत नियुक्ती देण्यात येत असून खालील तक्त्यात त्यांच्या नावासमोर दर्शविण्यात आलेल्या स्तंभ क्रमांक ४ मध्ये दर्शविलेल्या ठिकाणी पदोन्नतीने पदस्थापना देण्यात येत आहे.
उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी व तत्सम पदावरील पदोन्नती यादी PDF डाउनलोड करा - Click Here.
२. सदर पदोन्नत्या या मा. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या विशेष अनुज्ञा याचिका २८३०६/२०१७च्या अधीन राहून पदोन्नतीच्या कोट्यातील सर्व रिक्त पदे दिनांक २५.०५.२००४ स्थित सेवाज्येष्ठतेनुसार, निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात भरण्याबाबत सामान्य प्रशासन विभाग/१६-ब कार्यासनाच्या दिनांक ०७.०५.२०२१ च्या शासन निर्णयानुसार दिलेल्या सूचनांनुसार देण्यात येत आहेत. तसेच दिनांक ०७.०५.२०२१ च्या शासन निर्णयाप्रकरणी मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे आव्हान देण्यात आलेले असून त्यावरील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात देण्यात येत आहे.
३. तसेच, सदर पदोन्नत्या मूळ अर्ज क्र. ७९६/२०२५ मधील अवमान याचिका क्र.६९/२०२५, तसेच यानुषंगाने इतर प्रलंबित न्यायालयीन प्रकरणांच्या अंतिम निर्णयाच्या अधिन राहून निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात देण्यात येत आहे.
४. सदर पदोन्नत्या या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मान्यतेच्या अधीन राहून देण्यात येत आहेत.
५. दिव्यांग कर्मचाऱ्यांना गट-अ व गट-ब मधील पदांवर पदोन्नतीबाबत सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक २०.०४.२०२३ व दिनांक २९.०७.२०२४ रोजीच्या शासन निर्णयामधील तरतुदीनुसार सदर मान्यता देण्यात येत आहे.
६. सदर पदोन्नती निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात असल्याने या तात्पुरत्या पदोन्नतीच्या परिणामी निवडसूचीतील अधिकाऱ्यांना नियमितपणाचा व सेवाज्येष्ठतेचा कोणताही हक्क मिळणार नाही.
७. गुणवत्तेनुसार पात्र असलेल्या तथापि, पदोन्नती नाकारलेल्या अधिकाऱ्यांच्या पदोन्नती संदर्भात सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक १२.०९.२०१६ च्या शासन निर्णयानुसार कार्यवाही करण्याची दक्षता घ्यावी.
८. सदर पदोन्नतीनुसार संबंधित अधिकाऱ्यास देण्यात आलेली पदस्थापना सामान्य प्रशासन विभाग, अधिसूचना दिनांक १४.०७.२०२१ मधील विभागीय संवर्ग वाटपाच्या तरतूदीनुसार करण्यात आली आहे.
९. सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक १५.१२.२०१७ आणि दिनांक ३०.१०.२०१८ च्या शासन निर्णयातील तरतूदीनुसार ज्या अधिकाऱ्यावर शिस्तभंग विषयक कार्यवाही सुरू झाली असल्यास अथवा फौजदारी प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्यास अथवा विभागीय चौकशी प्रकरणांत दोषी आढळल्यास अशा अधिकाऱ्यास पदोन्नतीने पदस्थापनेच्या ठिकाणी पदस्थापना देण्यात येऊ नये.
१०. संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी उपरोक्त अधिकाऱ्यांस पदोन्नतीच्या ठिकाणी रुजू होण्याकरीता तात्काळ कार्यमुक्त करण्याची कार्यवाही करावी. तसेच, संबंधित अधिकारी यांनी पदोन्नती आदेश निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसाच्या आत पदोन्नतीच्या पदावर रुजू व्हावे व संबंधित अधिकारी रुजू झाल्याबाबतचा अहवाल आयुक्त (शिक्षण) यांनी शासनास सादर करावा.
११. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाला www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक क्र. २०२६०४२४१६२१४१६१२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी व तत्सम या संवर्गातील रिक्त पदावर तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती देणेबाबत शासन निर्णय. 24 एप्रिल 2026 डाउनलोड करा. Click Here





0 Comments