Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नशामुक्ती मार्गदर्शन व समुपदेशन करण्याचे कार्य आता शाळा व्यवस्थापन समितीकडे

नशामुक्ती मार्गदर्शन व समुपदेशन करण्याचे कार्य आता शाळा व्यवस्थापन समितीकडे सोपविण्यात येणार शासन निर्णय 28 जुलै 2026



केंद्र शासनाने २०२९ पर्यंत अंमली पदार्थांचे संपूर्ण देशातून समूळ उच्चाटण करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी केंद्र व राज्यांच्या विविध विभागांमध्ये समन्वयाच्या माध्यमातून "A Whole-of-Government Approach to Narcotics" विकसित करण्यात आले आहे. या धोरणानुसार, राज्यातील विविध विभागांमध्ये समन्वय साधून अवैध अंमली पदार्थांची शेती/लागवड, उत्पादन, व्यापार, वाहतूक, विक्री व सेवनावर प्रतिबंध घालणे आणि अंमली पदार्थाच्या प्रसारावर आळा घालण्यासाठी व्यापक प्रमाणावर जनजागृती मोहीम राबविण्याची कार्यवाही सुरू आहे.

गृहविभागाच्या शासन निर्णय दिनांक २१-०५-२०२६ अन्वये बृहन्मुबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये लोकसहभागतून "ड्रग्स फ्री मुंबई" हे अभियान राबविण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांच्या मान्यतेने एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये नशामुक्ती मार्गदर्शन व समुपदेशन समिती स्थापन करण्यात आली आहे.


शाळा व्यवस्थापन समिती SMC रचना व कार्ये

सखी सावित्री समिती रचना व कार्ये 

महिला तक्रार निवारण समिती/ अंतर्गत तक्रार समिती रचना व कार्ये

विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकासन समिती रचना व कार्ये


त्यानुषंगाने, राज्यातील सर्व शाळा व महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना नशामुक्ती मार्गदर्शन व समुपदेशन केल्यास विद्यार्थी व समाजातील इतर घटकांमध्ये अंमली पदार्थ व इतर प्रकारच्या व्यसनांविषयी जनजागृती निर्माण होऊ शकते. याकरिता शालेय स्तरावर नशामुक्ती मार्गदर्शन व समुपदेशन समिती स्थापन करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे.


तथापि, शासन निर्णय क्रमांक 16 एप्रिल 2026 अन्वये, सध्या शाळास्तरावर कार्यरत समित्या पुढीलप्रमाणे आहेत:

१. शाळा व्यवस्थापन समिती

२. सखी सावित्री समिती

३. महिला तक्रार निवारण समिती / अंतर्गत तक्रार समिती

४. विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती

शाळा स्तरावरील विविध समित्यांची रचना व कार्ये - Click Here



यातील शाळा व्यवस्थापन समितीकडे शालेय परिसर हा तंबाखू मुक्त होण्यासाठी कार्यक्रम अंमलबजावणीवर देखरेख आणि सनियंत्रण करण्याची जबाबदारी आहे. त्यास अनुसरुन शाळा व्यवस्थापन समितीकडे नशामुक्ती मार्गदर्शन व समुपदेशन कार्य सोपवण्याबाबतची बाब शासनाच्या विचाराधिन होती.


शासन निर्णयः-

शासन निर्णय 16 एप्रिल 2026 अन्वये गठित करण्यात आलेल्या शाळा व्यवस्थापन समितीकडे नशामुक्ती मार्गदर्शन व समुपदेशन करण्याचे कार्य सोपविण्यात येत आहे. याअनुषंगाने समितीने पुढीलप्रमाणे कार्य करावे.

१. सदर समितीची प्रमुख जबाबदारी ही विद्यार्थ्यांमध्ये व्यसनांविषयी नियमित जनजागृती करणे, ही राहील.

२. नशामुक्ती क्षेत्रात कार्यरत संस्था/ तज्ञ / अधिकारी व या क्षेत्रासंबंधी अनुभवी व्यक्ती यांना संपर्क करून शाळेमध्ये त्यांचे सत्र आयोजित करावी.

३. विद्यार्थ्यांचे वेळोवेळी समुपदेशन करणे, वर्तनातील बदल ओळखणे, आवश्यकतेनुसार पालकांशी समन्वय साधणे.

4. तसेच गरज भासल्यास संबंधित तज्ज्ञांकडे विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी संदर्भित करणे.




सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२६०७२८१७५२१३९६४९ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.


नशामुक्ती मार्गदर्शन व समुपदेशन करण्याचे कार्य शाळा व्यवस्थापन समितीकडे सोपविणेबाबत शासन निर्णय - Click Here 

Post a Comment

0 Comments

close